मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वयम् अपि कवय:॥

सूड · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मक्षिकेपरि चिवट। मनी मुळी बोथट॥ काव्य पाडुनि ओषट। संवेदना दाखवि॥१॥ मांडुनि भावनांचा बाजार। घेई फुकाचा कैवार॥ यासि शतोत्तरि चार। जोडे मोजुनि मारावे॥२॥ ऊर बडवि धडधडा। सदा फोडितसे हंबरडा॥ जणु एकटाचि बापुडा। सर्वांमाजि॥३॥ प्रसिद्धीची वखवख। मुखवटे घेई सुरेख॥ साहित्यशेतीचा काळोख। उजेड म्हणोनि दाखवि॥४॥ डास उडे पखियांपरि। काजवे तार्‍यांपरि॥ हा निव्वळ यमके करि। म्हणोनि कवि जाणावा॥५॥

वाचने 19146 वाचनखूण प्रतिक्रिया 47

स्पा Mon, 07/25/2016 - 15:43
अगागा बर्याच दिवसांनी मनसोक्त बाजार उठीवलास

In reply to by रुपी

"जोड़े मारणे" वगैरे हे काय रस्त्यावरचं भांड्न आहे का ? लोकांच्या टाळ्या मिळवायच्या असल्या तर त्या कुठेही मिळतील. पण टीका शत्रुलाही आवड़ली पाहिजे. रचना शैली उच्च दर्जाची पण त्या ओळीने अतिशय गल्लीतल्या भांडनासारखं स्वरूप वाटलं बाकी काही नाही. पण रचना मला आवडलीच आहे. (ती ओळ सोडून) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे Tue, 07/26/2016 - 21:35
आता तुमचा "मुटे" होणार हे नक्की. अहो. मिसळपाववर काही झुंडीच्या टीकास्त्राचे भक्ष व्हायचे नसेल तर असं मनातलं बोलू नका. त्यांना काय आवडते, याचा विचार करून लिहावे, हाच सौदा फ़ायद्याचा राहू शकतो.

टवाळ कार्टा Mon, 07/25/2016 - 15:53
कं लिव्लय कं लिव्लय रं बाला...सूडक्याकडे सरस्वती पाणी भरायला आलेली काय रे? बाकी नक्की बाण कोणाला मारलाय याबाबत संभ्रम निर्माण केलेला आहे =))

In reply to by टवाळ कार्टा

पगला गजोधर Mon, 07/25/2016 - 15:56
बाकी नक्की बाण कोणाला मारलाय याबाबत संभ्रम निर्माण केलेला आहे =))
तळ्टिप पहा : अभय गझल

अभ्या.. Mon, 07/25/2016 - 15:58
भारीच रे सुडक्या. आवडले शब्दप्रभुत्व. .
हा निव्वळ यमके करि। म्हणोनि कवि जाणावा
हे तर जबरदस्तच. बाकी अगदी विडंबनास परफेक्ट असा माल टाकलायस. ;)

In reply to by आदूबाळ

रुपी Tue, 07/26/2016 - 00:30
याची आठवण झाली. यात "वृंदगान" नावाचा एक कहर प्रकार होता. >> हेच लिहायला आले होते.. :) शब्दांवरची पकड भारी आहे..

In reply to by विवेकपटाईत

गंगाधर मुटे Mon, 07/25/2016 - 22:00
हृदयापर्यंत कसले पोचतात हो असले बाण. मोहिमेवर निघणारा कवच कुंडले परिधान करूनच निघत असतो मोहिमेवर.

गंगाधर मुटे Mon, 07/25/2016 - 21:35
v हा धागा वाचला आणि हायसे वाटले. आपल्यासंबंधी (एखाद्या व्यक्ती विशेषासंबंधी) स्वतंत्रपणे सात-आठ धागे निघतात आणि तेही मिसळपावसारख्या अग्रणी संकेतस्थळावर माझं मलाच लई कौतूक वाटलंय राव. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ अवांतर : जोडे मोजुनि मारावे >>>> हे भडक शब्द टाळुनही रचना टोकदार करता आली असती. त्यामुळे असा शब्दप्रयोग टाळणे चांगले राहिले असते, असे मलाही वाटते. बाकी रचना ठीकठाक. पुलेशू

विवेकपटाईत Tue, 07/26/2016 - 15:08
अवांतर म्हणून, कुणाला जोडे मारणे सौपे असते. मी स्वत:कृषी भवन मध्ये १३ वर्ष आणि प्रधानमंत्री कार्यालयात शेती हा विषय बघणाऱ्या अधिकार्याच्या खाली किमान ३ वर्ष तरी कार्य केले आहे. सरकारी नीती मुळे आपल्या देशातील शेती चौपट होते आहे, हे निदान मला तरी कळते. ग्राहक हिताच्या नावाने परदेशी पामोलीन (७०%) ग्राहकांच्या गळ्यात ओतले जात आहे. दुग्ध क्रांतीच्या नावावर गोपालकांचा व्यवसाय चौपट केला (हि क्रांती घडली नसती तर आज कदाचित भारत दुग्ध निर्यातक असता) ( या वर एक लेख लवकरच लिहिणार आहे). आता डाळी विदेशातून येणार. पण किती दिवस असे चालेल. आपल्या देशाची लोक संख्या बघता या व्यवसायात आपल्याला आत्म निर्भर होणे गरजेचे आहे. ग्राहक हिताच्या नावाने शेतकर्यांचे शोषण करणे सोडण्याची गरज आहे. प्रती हेक्टरी शेतकर्याला किमान भाव किती मिळाला पाहिजे हे निर्धारित करणे गरजेचे आहे. मुटे साहेबांची तळमळ मला तरी कळते.

In reply to by विवेकपटाईत

स्पा Tue, 07/26/2016 - 15:16
सातवा आयोग खून वर सरकारलाच शिव्या देणाऱ्या निष्क्रिय* सरकारी बाबूंची तळमळ आम्हाला कळेल तो सुदीन *सक्रीय बाबूंनी उगा अंगावर येऊ नये

In reply to by विवेकपटाईत

मोदक Tue, 07/26/2016 - 15:31
दुग्ध क्रांतीच्या नावावर गोपालकांचा व्यवसाय चौपट केला हे अमुल ला उद्देशून आहे का? यावर आवर्जुन लिहा. मुटे साहेबांची तळमळ मला तरी कळते. ओके मान्य. पण यावर आमच्यासारख्या असंवेदनशील शहरी लोकांना कळेल अशा भाषेत प्लीज लिहा आणि आम्ही मूर्खासारख्या शंका विचारल्या तर आमच्या बुद्धीवर शंका घेवू नका. कसे आहे.. आंम्हाला पण अनेक प्रश्न पडतात. ते पडतात कारण आंम्ही पूर्णवेळ शेती करत नाही. त्यामुळे नक्की काय? कसे? असे विचारल्यानंतर "मग शेती करा आणि उत्तरे मिळवा" असे उत्तर देणे सोपे असते पण त्याने आमचे प्रश्न अनुत्तरीतच राहतात आणि (कदाचित) खरी असणारी तळमळ रडगाणे वाटू लागते. तुमच्याकडून एका अभ्यासपूर्ण लेखमालेच्या प्रतिक्षेत.

खटपट्या Tue, 07/26/2016 - 21:58
लयंच भारी. गंडा बांधला पायजे. दोन वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक. तांब्याकाव्य = गुर्जी आसूडकाव्य = सूड

अभ्या.. Tue, 07/26/2016 - 22:16
सुडक्या लेका आज ते गाडीच्या साईडबाराला गुंडाळण्यासाठी दोर आनायाला बाजारात गेलेलो, तिथे बैलांसाठी चाबूक पण होते. ब्रँडेड बरंका. बालाजी नाथ चाबूक नावाने. खाली मजबूत आणि मुलायम असे छापलेले चक्क. च्यायला तुझ्या कवितांची आठवण आली. ;)