मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी बी काय तरी लिहीन म्हणतो : औरंगाबाद तडका. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(प्रेरणा) मूळ कवीची क्षमा मागून. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. पांढर्‍या कागदावर काळे शब्द पाहीन म्हणतो. मीबी काही तरी लिहिन म्हणतो. कवितेला रास्त प्रतिसाद भेटले काय, न भेटले काय कवीला उपासमारीत जगायची सवयच हाय तरीबी मी आपलं जमवून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहीन म्हणतो. कवीला मूक्ती भेटली काय, न भेटली काय कवीला स्वप्नात जगायची जन्मजात सवयच हाय मी तरी वास्तव जगात जगून घेईन म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेतून सामाजिक प्रश्न सुटलेत काय, न सुटलेत काय या कवींना अजिबात काय कळतच नसतं. कविता पेनड्राइव्ह मधे भरुन पुस्तक काढीन म्हणतो, मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेशी प्रतारणा करुन कथा लिहिता येते, कवितेशी इमान राखणारे घरात कुढत बसतात, कवीचे नाव फक्त संदर्भापुरते घ्यायचे, काम झाले की वार्‍यावर सोडायचे पण,कवितेतून नवं काय मांडावे म्हणतो. मीबी काय तरी लिहिन म्हणतो. कवितेला कंटाळून कोण तरी म्हणतं भाऊ 'दिलीपला' कोणी तरी दोन घोट 'पाजा'भाऊ.

वाचने 22351 वाचनखूण प्रतिक्रिया 67

In reply to by कविता१९७८

उगा, कुठलेही संदर्भ याला जोडू नका म्हणतो. मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या म्हणतो, मी बी काय तरी लिहीन म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संजय पाटिल Sun, 07/24/2016 - 11:09
मोकळ्या मनाने प्रतिसाद द्या म्हणतो,>>> किती करायचेत बोला? ४००? ५००?.. बादवे विडंबन आवडले!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता१९७८ Sun, 07/24/2016 - 12:23
आव डाक्टरसायेब स्वत:चे धागे सोडुन कधीबी अन कुटबी प्रतिसाद देणार्‍या आयडीने इथे प्रतिसाद द्यावा तो ही पहीलाच यातच सगळ आल की

In reply to by कविता१९७८

आता त्यांच्या रचनेची आम्ही मोड़तोड़ केली आता त्यांनी येऊन बघितलं, आता त्यावर ते काय बोलले तर तो माझा दोष का ? असो, आपल्याला वाटलं ना, त्यांचं माझं कनेक्शन आहे, तर आहेच म्हणतो. कशाला नाय म्हणू.....(तसं माझं जवळ जवळ सर्वच मिपाकरांशी कनेक्शन आहे) आपल्या विचाराला मी थांबवू शकत नाही. आपला रविवार सुखात जावो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by कविता१९७८

नूतन सावंत Mon, 07/25/2016 - 11:31
कविता,100%सहमत,स्वतः चाच ढाव्यावर निम्म्यापेक्षा जास्त प्रतिसाद देऊन शिळे वाङ्मय पुन्हा प्रसारित करणार्यांचा पहिलाच इतरांच्या धाग्यावरचा प्रतिसाद पहिला,

In reply to by कविता१९७८

गंगाधर मुटे Sun, 07/24/2016 - 14:09
होय. डॉ. प्रा. बिरुटे आणि माझं साताजन्माचं कनेक्शन हाय. १) कलियुगात मी त्यांचा खापरजोबा आहे आणि ते माझे पणतू आहेत. २) संतयुगात ते तुकाराम होते आणि मी जगनाडे ३) कृष्णयुगात ते बलराम होते आणि मी दुर्योधन ४) रामयुगात ते साक्षात रामच होते मी कुंभकर्ण एवढं मुखोद्गत झालं की सांगा नंतर मी त्याआधीचे ३ कनेक्शन सांगतो. d

In reply to by गंगाधर मुटे

कविता१९७८ Sun, 07/24/2016 - 17:21
धागा बिरुटेजीन्चा आहे, मी प्रतिसाद त्यानाच दिलेत आणि उत्तराची अपेक्षाही बिरुटेजीकडुनच आहे, दुसर्‍याने उगाच बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना होउ नये.

In reply to by कविता१९७८

श्री मुटे आणि कविता १९७८ यांना विनंती की आपण माझ्या विंडंबनाला दाद दिली त्याबद्दल मन:पूर्वक आभार. बाकी काही चर्चा करायच्या असतील तर दोघांनीही माझ्या खरडवहीचा वापर करावा ही लम्र विनंती. नवीन प्रतिसाद आला की माझ्या मोबाइलवर ट्याव ट्याव असा टोन वाजून नोटिफिकेशन येतं. नवीन प्रतिसादात कोणी कौतुक केलं असं बघायला धावत येतो. (आत्ता बाथरुम मधे घुसत होतो परत यावं लागलं) आणि अवांतर बघून मूड जातो. प्लीज सहकार्य कराल अशी अपेक्षा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता१९७८ Sun, 07/24/2016 - 18:11
कायेना बिरुटेजी नको खरडवही.करु की तुमच्या धाग्याचे पण ५०० .आपल्या माणसाला मदत करावी म्हणून हो .तुम्ही मला पुस्तक नाही का पाठवणार ? मुटेंचा काय तो पंचनामा आणि जनम जनम का कनेक्शन कळु दे की सर्वाना. उगाच का मुटे राहतात बोका सारखा आयडी जातो

In reply to by कविता१९७८

आपण माझ्या धाग्याचा खरडफळाच कारायचाच ठरवला तर.. आपणास मन:पूर्वक शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे Sun, 07/24/2016 - 18:22
माझी सपशेल माघार. तुमच्या इच्छेचा माझ्याकडून मान राखला जाईल. या धाग्यावर माझ्याबद्दल कोणी कसेही बोलले तरी मी बोलणार नाही. मात्र अधून मधून वाचून आनंद मिळवायला नक्कीच येणार.

In reply to by गंगाधर मुटे

सामान्य वाचक Sun, 07/24/2016 - 18:26
तुमच्या धाग्यावर फक्त 'लोकांच्या' प्रतिक्रियांच वाचायला जातो त्याच काय त्या चांगल्या, अभ्यासू, माहितीपूर्ण आणि 'अ'अपमानस्पद असतात

कोण आहे रे तिकडे? बिरुटे सरांनाही दोन घोट द्या बरे? सर अजुन काही हवे असले तर नि:संकोच सांगा. बाकी तुमच्या कविते बद्दल म्या पामराने काय बरे बोलावे? आवडली..... पैजारबुवा,

विनायक प्रभू Sun, 07/24/2016 - 11:12
फार फार क्रिटिक लिहीता बॉ. जरा सरळ समजेल असे लिहा बॉ. टिकल्या सांडल्या ना बॉ. तुम्ही सी.ई.टी. दिली नव्हती का प्रा. डॉ.?

हेमन्त वाघे Sun, 07/24/2016 - 12:12
डॉक्टर आपण दिलं खुश केलात असा दोन घोट नाही तर क्वार टर चा मजा आला जसा मुंबईत येण्याचा काही प्लॅन ? थोडे "बसू" , आणि बोलू!

In reply to by सतिश गावडे

कॉफीचे दोन घोट रे बाबा ! पुढच्या भेटीत कॉफी घेत घेत माझं कुठे कुठे कनेक्शन आहेत त्यावरही लिहीन म्हणतो... ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतिश गावडे Sun, 07/24/2016 - 19:33
तुम्ही पुण्याला या. तुम्हाला सीसीडीची कॉफी पाजू. अट एकच, कॉफी प्यायल्यानंतर "यापेक्षा टपरीवरील चहा बरा" अशी नावे ठेवायची नाहीत. ;)

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस Sun, 07/24/2016 - 20:08
कोणी यापूर्वी अशी नावे ठेवली आहेत का हो? विडंबन म्हणून कविता छान. मूळ प्रेरणा वाचली असल्याने त्याबाबत पास.

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु Mon, 07/25/2016 - 08:36
आधी टपरीवर चहा पाजून मग सी सी डी त (मुद्दाम) नेल्यास आपण इथे कॉफी साठी (मुळीच) आलो नाहीत हे वल्लींबरोबर राहून प्रा डाँना माहीत नसेल असे मला वाटत नाही. देव त्या दिवशी सी सी डीत उपयुक्त गर्दी ठेवो हीच प्रार्थना.. अता कवितेबद्दल ही कवीता कवींच्या व्यथेबद्दल भाष्य करते की प्रथेबद्दल यावर मुवींनी एक समीक्षण लेख लिहावा ही विनंती.शकयतो याच धाग्यात, मला प्रा डाँ चा एकतरी धागा पंच्शतकी पहायचाच आहे. मूळ अवांतर :(नेहमी प्रमाणे शेवटी) कवीता मस्त आहे पण उपमा मुद्दम सौम्य करून वापरल्या आहेत ते जाणवते (प्रत्यक्ष प्रा डाँना भेटलो असल्याने) अश्या "शाक भाजीची" अपेक्षा ठेवली नव्हती. मिपा वारकरी नाखु

In reply to by नाखु

आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार. कोणतीही कविता असो, लेख असो, माणूस असो, नवरा असो की बायको असो, की मिपा असो ते कोणाचंही पूर्णपणे समाधान करू शकत नाही. ;) आपलं माझ्या रचनेने समाधान झालं नाही, आपणास उच्च आनंद मिळाला नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी आपल्याला माझ्या लेखनातून आनंद देण्याचा नक्की प्रयत्न करीन. असाच लोभ आणि आशीर्वाद असू द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. :) -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

बाबा योगिराज Sun, 07/24/2016 - 22:38
आवड्यास. सर आवाज द्या. पयली कोप्पी माह्याकडूनच. . . एक अती अवांतर गोष्ट, आता सरच कॉपीच्या बाता करू रायले म्हणल्यावर... (पळ भौ) बाबा योगीराज

नीलमोहर Sun, 07/24/2016 - 23:11
भारी लिहीलेत सर, पण त्यामुळे घोळ झाला ना, एवढी छान कविता पाहून आम्हालाबी एक सोडून दोन कविता लिहाव्या लागल्या.

In reply to by नीलमोहर

दोन्ही वाचल्या. (एकावर ज़रा अवांतर केलं सॉरी हं) खरं तर एकच विडंबन करायला हवं होतं. दोन्ही चांगल्या जमल्या. पण मग वाचकांचा फोकस कमी होतो. शुभेच्छा. आणि प्रतिसादाबद्दल आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by पैसा

Thank u.... प्रतिसाद हार्टली नै आला हं पण (राग आलाय तुमचा) च्यायला, एक तर मी काव्य प्रकारात पडत नै, अन भरवशाच्या मिपकारांनी असा तुटक प्रतिसाद दिल्यावर लिहाव वाटतं नाही. ;) दिलीप बिरुटे

विड़ंबन आवडल्याचं आवर्जून लिहिल्याबद्दल सर्व मिपाकरांचे मनपूर्वक आभार. आपल्या प्रतिसादांनी लिहीण्याचा उत्साह वाढतो आणि आनंदही वाटतो. विडंबनावर प्रतिसाद लिहायचं सोडून अवांतर प्रतिसाद दिले त्यांचेही आभार, त्यांच्यामुळेही लिहीण्याची खुमखुमी वाढली आहे. मिपा वाचकांचेही आभार. मिपा संपादक, व्यवस्थापन यांचेही आभार त्यांनी मला अभिव्यक्त होण्याची संधी दिली. मी आपल्या ऋणातच राहु इच्छितो. कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने आभार मानायचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. -दिलीप बिरुटे

In reply to by अभ्या..

एकदा आभार मानल्यावर पुन्हा माइक वर सूचना द्यायचं म्हटलं की मला जीवावर येत. पण धन्या आणि तुम्ही माझे मित्र म्हणून पुन्हा एकदा सूचना देतो. संगमवाड़ीच्या पूला समोर जिथे बस उभ्या राहतात तिथे एक छोटी टपरी आहे तिथे सर्वांची चहा, दूध , मेदूवडा आणि इडलीची व्यवस्था केली आहे. कूपन दिले आहेतच. मुगाचा शिरा मिळणार नाही. अवांतर प्रतिसाद देणा-या मिपाकरांना वरील मेनूसोबत महालक्ष्मीच्या कहाणी आणि आरतीची पुस्तकं देण्यात येतील. ;) ता.क. : बाकीचं वाट्सपवर बोलू. संजय क्षीरसागर ओळखीचे असतील तर मिपावर प्रा.डॉ. आपली वाट पाहात आहेत असा निरोप द्या प्लीज. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतिश गावडे Tue, 07/26/2016 - 11:33
संगमवाड़ीच्या पूला समोर जिथे बस उभ्या राहतात तिथे एक छोटी टपरी आहे तिथे सर्वांची चहा, दूध , मेदूवडा आणि इडलीची व्यवस्था केली आहे. कूपन दिले आहेतच.
तिथे मसाला दुध छान मिळते. आणि रस्त्याच्या कडेला बसून बाजूने वाहने भरधाव जात असताना मसाला दुध पिण्याची मजा काही औरच आहे.