दोन मूठ राख
अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...
म्हणालं
"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"
अस्तित्व हसलं......
म्हणालं
"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....
पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय
माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
पण स्वतःचं अस्तित्व तयार कर...
आणि
अभयपणे हे सुद्धा लक्षात घे की
मी संपलो तरी, मी नाहीच सरणार
माझी दोन मूठ राख तरी
नक्कीच उरणार....!"
पण
बिनमायबापाच्या लेकरा तुझं काय?????
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...
म्हणालं
"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"
अस्तित्व हसलं......
म्हणालं
"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....
पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय
माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
पण स्वतःचं अस्तित्व तयार कर...
आणि
अभयपणे हे सुद्धा लक्षात घे की
मी संपलो तरी, मी नाहीच सरणार
माझी दोन मूठ राख तरी
नक्कीच उरणार....!"
पण
बिनमायबापाच्या लेकरा तुझं काय?????
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4054
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
कहर... जब्रा कविता मुटेसर. लै
काहीच कल्ले नाही, डांगे
In reply to कहर... जब्रा कविता मुटेसर. लै by संदीप डांगे
आवडली कविता
आवडली कविता
छान
कविता आवडली छान आहे.
सुरेख कविता!
सुंदर !
कडक!!!!
200 प्रतिसाद
कविता म्हणुन ठीक आहे... पण.....
आणि तशीही अस्तित्वाने
In reply to कविता म्हणुन ठीक आहे... पण..... by ज्ञानोबाचे पैजार
हम्म... हे देखिल बरोबरच आहे
In reply to आणि तशीही अस्तित्वाने by सतिश गावडे
दोन मूठ राख कि किमत तुम क्या
In reply to हम्म... हे देखिल बरोबरच आहे by ज्ञानोबाचे पैजार
कविता म्हणून ठीक आहे... पण..
गावडे मास्तर
In reply to कविता म्हणून ठीक आहे... पण.. by सतिश गावडे
मस्त कविता, काळाचे बंधन नाहीच
मला या कवितेत लागलेले अर्थः
In reply to मस्त कविता, काळाचे बंधन नाहीच by अभ्या..
कविता छान!