रांजण खळगी
पुण्यापासून अंदाजे 80 किमी वर आहे अहमदनगर जिल्हयातील टाकळी हाजी व निघोज हे गाव. आणी ह्या दोन गावांच्या दरम्यान आहेत आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक रित्या तयार झालेली खळगी (रांजण खळगी) ज्याची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहेत. बरीच वर्ष जाऊ जाऊ करत होतो पण इथे जाणे काही होत न्हवते. शेवटी मे महिन्यात अचानक एके दिवशी गेलो बघायला.
शेकडो वर्षे कुकडी नदीच्या पाण्यातून येणारे दगड गोटे ह्या नदीपात्रातील बसाल्ट खडकावरून 'वर्तुळाकार पद्धतीने' फिरल्याने ही सर्व खळगी तयार झाली असावीत असा भूगर्भ शास्त्रन्यांचा कयास आहे. ही क्रिया सतत चालूच असल्याने खळग्यान्चा आकार वाढतच चालला आहे. गावकऱयांच्या मते काही खळगी 100 फूट देखील खोल आहेत. सर्व खळग्यान्चा आतील भाग तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतका गुळगुळीत आहे.
खाली काही फोटो.
खळग्यामुळे तयार झालेले दरवाजे.
ही खळगी इतकी विस्मयकारक आहेत की त्या जागी उभे असताना आपण दुसऱ्याच कुठल्या तरी ग्रहावर आलो असू असेच वाटते.
पाहण्याची योग्य वेळ -
1) दोन वेळा जावे. एकदा रिमझिम पाऊस असताना आणी नंतर फेब्रुवारीच्या दरम्याने.
हलक्या पावसात ह्या खळग्यातून वाहणारे पाणी खूप सुंदर दिसत असेल. तर पावसाळा संपल्यावर काही दिवसांनी एकदम खोलवरची खळगी देखील नीट दिसतील.
पावसाळयात विशेष काळजी घ्यावी. कारण कुठले खळगे किती खोल असेल ह्याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
आम्ही मे महिन्यात गेलो होतो तेव्हा बरीच खळगी घाणीने भरली होती. लोकांनी जुने कपडे, थर्मोकोलच्या प्लेट्स, घरातील नको असलेल्या देवांच्या मूर्ती फेकून ही जागा बरीच खराब करून ठेवली होती. ह्या वर्षी झालेल्या दमदार पावसाने ही सगळी घाण वाहून गेली असेल त्यामुळे खळग्यान्चा आस्वाद खूप चांगल्या रीतीने घेता येऊ शकेल.
ह्या ठिकाणा पासून पुढे 25 की.मी वर वडगाव दर्या गाव आहे जिथे लवणस्तंभ आहेत असे एकदा कट्ट्याच्या वेळी शांतीप्रिय बोलले होते. पण वेळे अभावी तिथे जाऊ शकलो नाही.
परतीच्या प्रवासात वढू येथील संभाजी महारांजाची समाधी देखील पाहू शकता.

वाचने
8873
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
खूप छान.
फोटो आणि माहिती आवडली ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhol Tasha- Sivamani's Jugalbandi with the Percussionistsछान फोटो.
खळगी वाजतात का?
उत्तम फोटो
छान फोटो
@कंजूस काका,
मस्त फोटो...
In reply to मस्त फोटो... by मुक्त विहारि
हो. स्वत:चं वाहन असलं तर सहज
In reply to हो. स्वत:चं वाहन असलं तर सहज by प्रचेतस
स्वत:चं वाहन असलं तर सहज
भारी आहे हे...
गावकऱयांच्या मते काही खळगी
In reply to गावकऱयांच्या मते काही खळगी by किसन शिंदे
जर ह्या जागेचे कुणी संशोधन
आयला!
रांजण खळगी
In reply to रांजण खळगी by जयन्त बा शिम्पि
खूप जास्त अपेक्षा ठेवून जाल
In reply to खूप जास्त अपेक्षा ठेवून जाल by किसन शिंदे
+११
ही रांजणखळगी आणि वडगाव