मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????

अविनाशकुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
जन का म्हणतिल, 'हाय हाय !'???? केलेच नाही तर राहिल कार्य काय ? . पोस्टा तळपतिल, फोटु झळकतिल; फेसबुके अपुला क्रम आचरतिल, असेच वाद संवाद पुढे चालतिल, नसशी तु फरक पडेल का? . वाद वर्षतिल, डोके पिकतिल, गेट टुगेदर हे जोरात चालतिल कुणा काळजी की न तळतिल, पुन्हा जिलब्यांचे हे घाणे? . सखेसोयरे डोळे पुसतिल, पुन्हा लेख कविता लिहितिल उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल तु सोडले फेसबुक त्यांचे काय जाय ? . अभासी जगास्तव काय कुढावे ! मोहिं लाईक्स च्या का गुंतावे ? डोके पिकवुनी का विन्मुख व्हावे ? ख-या जगतातील आनंदास???

वाचने 2837 वाचनखूण प्रतिक्रिया 12

In reply to by प्रचेतस

किती तो पाठीचा पु रा वा....काय मिळवणार शेवटी? एक जिल्बी!! =)) एक जिल्बी और दो... अखिल्भार्तीय्मिपाजिल्बीपाड्संघटनेचेनाखुसकार्य्क्रत्यांवर्नजरठेऊनअस्लेला Sandy

विवेकपटाईत 17/07/2016 - 15:43
आभासी जगात रमायच, कविता करायची, साद-प्रतिसादाची अपेक्षा ठेवायची, तुमच्यासाठीच... आभासी जगात जीव रमतो साद प्रतिसादात आनंद मिळतो खर्या जगात न जिलीब्या लाडू मग का करता हाय हाय राव.

ह्या गाण्याला गोपी किशन मधल्या "हाय हुकु हाय हुकु हाय हाय" या गाण्याची चाल एकदम फिट बसते. लाभार्थींनी ह्या कवितेचे शब्द डोळ्यासमोर ठेउन वरीगीनल गाणे ऐकावे (स्वतःच्या जबाबदारीवर हा प्रयोग करावा कोणत्याही प्रकारच्या नुकसानाचे दायित्व प्रतिसादकर्ता घेत नाही याची पुर्ण जाणीव ठेवावी) पैजारबुवा,

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नाखु 19/07/2016 - 16:27
धागा वेटोळी येईल त्याचे काय? मिपा रोच्क ते वचक एक मिपासाक्षर नववाचक चळवळ आणि "मिपा जलयुक्त शिवार " योजनेचा संयुक्त प्रकल्प