जन का म्हणतिल, 'हाय हाय !'????
केलेच नाही तर राहिल कार्य काय ?
.
पोस्टा तळपतिल, फोटु झळकतिल;
फेसबुके अपुला क्रम आचरतिल,
असेच वाद संवाद पुढे चालतिल,
नसशी तु फरक पडेल का?
.
वाद वर्षतिल, डोके पिकतिल,
गेट टुगेदर हे जोरात चालतिल
कुणा काळजी की न तळतिल,
पुन्हा जिलब्यांचे हे घाणे?
.
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा लेख कविता लिहितिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
तु सोडले फेसबुक त्यांचे काय जाय ?
.
अभासी जगास्तव काय कुढावे !
मोहिं लाईक्स च्या का गुंतावे ?
डोके पिकवुनी का विन्मुख व्हावे ?
ख-या जगतातील आनंदास???
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2837
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोहिं लाईक्स च्या का गुंतावे
अजून एक राहिले हो!
@मग काय अटकले अकुशिवाय ? ›››
In reply to अजून एक राहिले हो! by प्रदीप
अकु काका आज त्वांड गोड कराच
तुम्हाला नेहमीच होतात.
In reply to अकु काका आज त्वांड गोड कराच by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to तुम्हाला नेहमीच होतात. by प्रचेतस
आभासी जगात रमायच, कविता
मस्त कविता...
कधीपासून होतंय असं? चूर्ण
मग दर दिवसातून तीन चार
In reply to कधीपासून होतंय असं? चूर्ण by कैलासवासी सोन्याबापु
...
केलेच नाही तर राहिल कार्य काय