लिंब, धोम, भोगावमधील काही क्षण
मध्यंतरी भुईंजनजीकच्या किकलीगावात तिथले अप्रतिम कोरीवकाम असलेले भैरवनाथाचे मंदिर आणि शेदीडशे वीरगळ पाहिलेले होते. त्याच दिवशी नंतर शेरी लिंब येथील बारा मोटेची विहिर आणि धोम-भोगावची पण सफर झाली होती त्याची ही चित्रमय झलक.
वाटेवरच्या लिंब गोवे गावातील दुर्लक्षित वीरगळ
लिंबची विहिर पहिल्या शाहूमहाराजांच्या पत्नी वीरूबाई ह्यांनी बांधवून काढली. ह्या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे.
१२ मोटेच्या विहिरीचं प्रथमदर्शन.
विहिरीच्या प्रवेशद्वारावरील शरभ
वीरुबाईसाहेबांचा शिलालेख
ही विहीर पायर्यांची आहे.
मोटेखालती असलेले शरभ
शेरी लिंबवरुन पाचवड मार्गे वाईला गेलो. जवळच असलेल्या मेणवलीचा पेशवेकालीन घाट आणि तिथला नाना फडवणीसांचा वाडा पाहून धोमला गेलो. धोम गाव बहुत सुंदर. वृक्षदाटीत वसलेलं. तिथं नृसिंह मंदिर आणि शिवपंचायतन आहे.
नृसिंह मंदिराचं प्रवेशद्वार
शिवमंदिरासमोरचा नंदीमंडप. हा पुष्करिणीतल्या दगडी कासवावर उभारलेला आहे.
तिथल्या मंदिरातही वीरगळ दिसला
लक्ष्मी नृसिंह
शिवमंदिराचा टिपीकल पेशवेकालीन शैलीतला कळस
धोम गावाच्या पाठीमागेच धोम धरणाची भिंत एका डोंगररांगेच्या आधाराने उभी केलीय. त्या टेकाडावर चढून जाताच धोमचं अथांग पाणी, डावीकडे पाचगणी, समोर कमळगड, उजवीकडे केंजळगड आदी तालेवार ठिकाणे दिसतात.
ह्याच झाडीत धोम गाव आहे.
भिंतीवरुन दिसणारा आजूबाजूचा परिसर
समोर आहे तो कमळगड
धरणावर बराच वेळ गप्पाटप्पा करुन परत निघालो. धोमच्या अलीकडे भोगाव. तिथे कृष्णाकाठावर वामनपण्डिताची समाधी त्याच्या कुण्या एका भक्ताने बांधलेली आहे.
समाधीच्या अलीकडेच एक दुर्लक्षित शिवमंदिर बघायला मिळालं. मूळ स्तंभ खूप जुने, यादवकालीन आहेत तर वरचा अर्धा भाग पेशवेकाळात बांधला गेलाय असे त्याच्या मिश्र शैलीवरुन सहजच दिसते.
यादवकालीन स्तंभ
तिथेच झाडोर्यांत एक दुर्ल़क्षित वीरगळ आहे. तो बघून परतीचा मार्ग गाठला.
वाचने
21017
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
भारीय.
भारीये
तुम्ही कुठून शोधून काढता हो हे सगळं ?
In reply to मस्तच ! by माम्लेदारचा पन्खा
मला असं वाटतं की त्यांना बोलावणं येतं आणि मग ते त्या दिशेने सुटतात आणि मग असले लेख आणि अप्रतिम फोटो टाकतात! मस्तच! रच्याकने पहिले शाहूमहाराज म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराजांचे नातू आणि संभाजीमहाराज आणि येसूबाई यांचे पुत्र का? का अजून दुसरे कुणी?
In reply to असेच म्हणतो. by बोका-ए-आझम
हो.
थोरले शाहू छत्रपती. संभाजी महाराज आणि येसुबाई ह्यांचे पुत्र. स्वस्तीश्री शके १६४१ पवनाम संवत्सरे म्हणजे इसवी सन १७१९ मध्ये ही विहीर बांधली गेली.
याबाबत एक कहाणी रोचक आहे. शाहूमहाराजांची दोन लग्ने १७०३ साली औरंगजेबाच्या कैदेत झाली. मानसिंग जाधव (नक्की सांगता येत नाही) ह्याच्या २ कन्या. राजसबाई आणि कुणी एक.
दिल्लीतली प्रथा म्हणजे नव्या नवरा नवरीने बादशहाच्या मांडीवर बसून त्याने दिलेला उष्टा विडा खायचा. छत्रपतींच्या सुनेने उष्टा विडा तो देखील बादशहाचा कसा खावा म्हणून येसूबाईंनी राजसबाईंइतक्याच वयाच्या वीरुबाईस बादशहासमोर उभे केले. ह्या प्रसंगानंतरही वीरुबाईंस राणीचा मान दिला गेला. मुख्यराणी जरी नाही तरी राजांची उपराणी म्हणून ती मानली गेली.
लै भारी
वा. तसेच मग पांडवगड-कमळगड करून यायचे ना. कावेची विहीर छान आहे.
बारा मोटेची विहीर आवडली. आतली रंगरंगोटी खरवडून काढली पाहिजे. नृसिंह मंदिरातले कासव आणि नंदीमंडप रेखीव. वृक्षराजी डोळे निवविणारी.
In reply to वा. तसेच मग पांडवगड-कमळगड by एस
एकाच दिवशी किकली, शेरी लिंब, वाई, मेणवली, भोगाव आणि धोम केल्यानं इतर काही जमलं नाही. कमळगडावर पूर्वी गेलो होतो.
बाकी ही विहीर १२ मोटांची नसून १५ मोटांची आहे. तीन मोटा अलीकडच्या (वरच्या) पातळीत आहेत. विहीर पूर्ण भरल्यावर अतिरिक्त पाणी मुख्य विहिरीतून वरच्या पातळीत असणाऱ्या आडांत येतं. त्यावर ह्या ३ मोटा आहेत. पण तिथवर पाणी यायची वेळ अगदी क्वचित म्हणजे ३०/४० वर्षातनं एकदा अशीच येत असावी.
क्लासच
पुष्करणीतल्या कासवाची आयडीया आवडली. पाणी असताना ते कासव नंदीमंडप तोलून पोहत असलेले वाटत असणार. भारीच.
In reply to पुष्करणीतल्या कासवाची आयडीया by अभ्या..
येग्झॅटली! हेच मनात आलेले तो फोटो बघून. आणि त्या डोंगरावर ढगांची माया अगाध!
अप्रतिम वल्लीदा! __/\__
Sandy
पुष्करणीतल्या कासवावरचा नंदीमंडप काय देखणा आहे!
विहीर पण छान आहे.छान भटकंती.
पुष्करणीतल्या कासवावरचा नंदीमंडप, विहिर, लक्ष्मी नृसिंह, कासव, सभोवतालची वनराई सगळेच सुरेख.
आपले पूर्वज खरोखर रसिक होते. कोणतीही यांत्रिक आयुधे नसताना त्यांनी देखणी जिवंत शिल्पे उभी केली. साधी विहीर ती काय आणि तिलाही कसे कलाकुसरीने नटवले आहे !
सुंदर लेख छान फोटो
+१००
छान.
उत्तम लेख.
बारा मोटवाल्या विहीर बघायला, लिंब गावाला कसे जायचे?
In reply to नेहमीप्रमाणेच... by मुक्त विहारि
काय मुविकाका...!
लेख कुठे लिहिलाय? नुसते फोटो टाकलेत.
शेरी लिंबला जायला पुणे - सातारा रस्त्यावरील पाचवड गावातनं फाटा आहे. पाचवड पासून साताठ किमी.
In reply to काय मुविकाका...! by प्रचेतस
सातार्याच्या आधी लिम्ब खिन्ड आहे. गौरी शन्कर कॅम्पसच्या अलिकडे लिम्ब- गोवेला जाणारा फाटा फुटतो ( आनेवाडी टोलनाका ओलान्ड्ला की डावीकडे आहे. विचारत विचारत गेल्यास सोइचे होईल.
In reply to लिम्ब खिन्डिच्या अलिकडे by दुर्गविहारी
पुणे-सातारा, ह्या मार्गावर का?
In reply to सातार्याच्या आधी लिम्ब खिन्ड आहे. by मुक्त विहारि
हो.
ह्हूं !
.
.
.
.
.
.
दू दू दू!
.
.
.
.
लोकहो , आगोबा एक टाच गेल्ता बर का, ति कडे! 

सर्वच छायाचित्र अप्रतिम आलेली आहेत. एकापेक्षा एक सुंदर. माहिती डकवायला जरा कंजुशी केल्यासारखी वाटली.
पण, चित्रमय भटकंती आवडली. लिहित राहा. आपल्यामुळेच दगडांना बघायची एक नवी दृष्टी मिळाली हे कितीतरी वेळा सांगितलंय. मनःपूर्वक आभार. लो यू. :)
अवांतर : वल्ली, सैराट मधील ती दोघं शेरीलिंबच्याच पायर्यांवर बसलेली आहेत का ? का माझ्या डोक्यातून अजून सैराट गेलं नाही. :(
-दिलीप बिरुटे
In reply to सर्वच छायाचित्र अप्रतिम आलेली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहायचा हल्ली कंटाळा येतो हो.
शेरीलिंबवर ५/६ महिन्यांपूर्वी अर्धवट खरडलं होतं. पण मनासारखं उतरेना म्हणून लेखन खोडून फ़क्त चित्रं टाकली.
अवांतराबद्दल - सैराट पाहिला नाही त्यामुळे त्या दोघांबद्दल काहीच सांगू शकत नाही. :)
In reply to लिहायचा हल्ली कंटाळा येतो हो. by प्रचेतस
सैराट मधली विहीर करमाळ्याची आहे. बहुतेक सर्व शुटिन्ग त्याच परिसरातील आहे. बाकी वल्लीदा तुम्ही सैराट बघीतला नाही त्यामुळे समर्थकान्च्या हल्ल्याला तयार रहा. ;)
In reply to लिहायचा हल्ली कंटाळा येतो हो. by प्रचेतस
सारखा कसा हो कंटाळा येतो तुम्हास
बाकी फोटू नेहमीप्रमाणे छान छान
In reply to सारखा कसा हो कंटाळा येतो by स्पा
आपणास नाही का पुण्याला यावयाचा कंटाळा येत?
तसच आहे हे...पांडुब्बा!
तसच आहे हे...पांडुब्बा! सुरेख!
दोन महिन्यापूर्वी गेलो होतो ही विहीर बघायला. ऐन उन्हाळ्यात बर्यापैकी पाणी होतं. दुपारच्या वेळेला रिकामं पब्लिक लै दंगा घालत होतं. उंचावरून उड्या वगैरे.
फोटो सुरेख!
खूप सुंदर ठिकाणे आहेत सर्वच,
अशी लक्ष्मी नृसिंह मूर्ती प्रथमच पाहिली,
सुंदर फोटो !
कासव खास आवडले... त्याच्या सुबकतेसाठी आणि कुंड पाण्याने भरल्यावर ते पाण्यात पोहत आहे असे दिसेल या कल्पकतेमुळेही.
असं काही पाहिलं की, "जुन्या काळात किल्ले-देवळे-वाडे-विहिरी बांधण्याचं मराठी हातात असलेलं हे कौशल्य आजकाल कुठे गायब झालं आहे ?" असा प्रश्न वारंवार मनात येतो. :(
लिहिताना कंजूसी केली आहे. ये ना चॉलबे. तुमच्या नवीन लेखणीचे बरेच चाहते निर्माण झाले आहेत हे विसरू नका :)
वाईला एकूण सात वर्षे वास्तव्य असल्याने तेथील व आजूबाजूचे बहुतेक देवालये पाहिली आहेत. भद्रेशवर, वाकेश्वर,व्यंकटेश, लक्ष्मी नारायण , काशी विश्वेश्वर अशी एकसे एक व मोठी देवालय वाईत आहेत. बाकी ढोल्या गणपती हे सर्वाना माहित आहेच.
वाईखेरीज मेणवलीचा घाट व देवालय खास करून या धाग्यात आलेला नंदिमंडप हे सारेच सुरेख.
माझ्या मते वाई मेणवली , औध संग्रहालय अशी कट्टा कम सहल मस्त होऊ शकते.
धोम धरणाची येतील चित्रे मस्त आलीयत. मी याच भिंतीवरून कृष्णा नदीवर पडलेले काठापासून काठापर्यंत असे अर्ध गोलाकृति इन्द्रधनुष्य पाहिलेय.
सुरेख फोटो आणि माहिती.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhol Tasha- Sivamani's Jugalbandi with the Percussionistsअत्यंत जबरदस्त फोटो. विषेशतः तो कासवावरचा नंदीमंडप फारच आवडला.
ती विहिरही कसली प्रशस्त आणि देखणी बांधलीय....
मान गये आपकी पारखी नजर और इतिहास का ग्यान दोनोको
पैजारबुवा,
लिम्बच्या शिवमन्दिराजवळ नदीपात्रात कोलमनर बेसाल्ट पाहण्यासारखे आहेत. असेच कोलमनर बेसाल्ट मुम्बईमध्ये अन्धेरीला गिल्बर्ट हिलला आहेत. अर्थात ते प्रन्चड उन्च आहेत. लिम्बचे अतिशय छोटे आहेत. या शिवाय लिम्ब गावात नदीवर बान्धलेला घाट आणि काठावरची मन्दीरे आणि तेथिल भित्तीचित्रे बघण्यासारखी आहेत. लिम्बचे पेरुही सुप्रसिध्द आहेत.
In reply to कोलमनर बेसाल्ट by दुर्गविहारी
तिथनं तीनचारदा जाणं येणं झालं पण हे सर्व पाहाणे हुकलं. पुढच्या फेरीत हे पाहावे लागेल आता.
वा...
फोटो आणी माहीति दोन्ही छान.
आमाला पण सांगत चला राव जाताना, भीमाशंकरला जाऊन आलो त्यालाही दोन वर्ष होतील आता. करा राव प्लान.
In reply to आमाला पण सांगत चला राव जाताना by सूड
सुचनेला
आणि माहीती आवडली वल्ली, अता तुमच्या कंटाळ्याचे निराकरण लवकर व्हावे म्हणजे तुम्ही गुरु मार्गावरून धावाल.
In reply to +११ by नाखु
सिंहगड रोडला गुरूमार्ग कधी केले बुवा(?) ? बाकी नाणेघाट व भिमाशंकर येकाच दिसात होणे शक्य आहे का ?
In reply to गुरू मार्ग ....? by चौकटराजा
नाणेघाट व भिमाशंकर येकाच दिसात होणे शक्यच नाही. दोन्ही ठिकाणी निवांत वेळ द्यायला लागतो. नाणेघाटाच्या गुहेत बसून इतिहासाच्या आठवणी जागवत गप्पा मारायला खूप छान वाटते तर नानाच्या अंगठ्यावर जाऊन अफाट पसरलेला सह्याद्री बघत अगदीच शांत बसावेसे वाटते.
भीमाशंकरला मात्र तंगडतोड करावी लागते. गुप्त भीमाशंकर, नागफणी, कोंढवळ ही ठिकाणे आवर्जून पाहावी अशीच आहेत.
नेहेमीप्रमाणेच मस्त माहीती आणी फोटो.
मी सतिश, प्रचेतसजी खरंच आपल्या लेखमाला अत्यंत महत्वपूर्ण व खूप खोलवर माहितीपूर्ण असतात.मला फार काही लिहीता येत नाहीं .
तुझ्या लिखाणातून आणि फटुतून या गोष्टी अजूनच सुंदर दिसतात.
भारीय.