(ही 'तिची' माझीच आहे गोष्ट अन...)
Taxonomy upgrade extras
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'ही तुझी माझीच आहे गोष्ट पण...' ही सुंदर गजल कालपासून मनात रुंजी घालत होती आणि आज शेवटी समर्पक शब्द सापडताच आम्ही कान पकडले! ;)
गाल हा सारे खरे ते सांगतो
याचसाठी चुंबने मी टाळतो
बायको नडणार अंती जाणतो
का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो?
कोंडली मी वादळे पोटामधे
गुरगुराटाने पहा घायाळतो!
'होल वावर, इज अवर' असता इथे
मी कुणाची वाट कसली पाहतो!
यायची असतेस तेव्हा का मला
घोळ थोडा जाहल्यागत वाटतो
एकही सीधा दिसेना प्रश्न मज,
लाटण्याचा मग सुगावा लागतो!
ही 'तिची' माझीच आहे गोष्ट अन
कान मी पकडून आता सांगतो!
मी इथे हल्ली गळ्यातच छानसा
लेउन पट्टा चामड्याचा हिंडतो!
चतुरंग
वाचन
2507
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
काय माणूस आहेस रे !!
या
झक्कास....
>> गाल हा सारे खरे ते सांगतो याचसाठी चुंबने मी टाळतो >> बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो यायची असतेस तेव्हा का मला घोळ थोडा जाहल्यागत वाटतो वा वा ......
गाल हा
ह्म्म..
In reply to ह्म्म.. by केशवसुमार
तो घोळ
हाहाहा..
प्रतिसाद देणार्या आणि न देणार्या सर्वांचे आभार!