प्रतिजैविके समज आणि गैरसमज.
प्रतिजैविके
समज आणि गैरसमज.
सर्वप्रथम सूक्ष्म जीव म्हणजे काय?
सर्वात सूक्ष्म म्हणजे विषाणू किंवा व्हायरस. हा सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर असलेला, जीव आणि रसायन यामधील अवस्था. याचे स्फटिकिकरण करता येते आणि हे स्फटिक युगानू युगे तसेच राहू शकतात. हा फक्त दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागात सक्रिय होऊ शकतो अन्यथा एखाद्या रसायनासारखा मृतप्राय असतो. उदा पोलियो एड्स कांजिण्या इ
यानंतरचे काही जीव रिकेटसिया आणि क्लॅमिडिया हे जिवाणू आणि विषाणू यांच्या मध्ये आहेत.
यानंतर येतात ते जिवाणू (म्हणजे बॅक्टेरीया) हे एक पेशीय जीव असून यात चयापचय क्रिया (metabolism) चालू असते. उदा स्टॅफिलोकॉकस, टायफॉईड याचे जंतू.
या बरोबरच एकपेशीय बुरशीची निर्मिती झाली. उदा यीस्ट/ किणव
जगाची सुरुवात झाली तेंव्हा सर्व प्रथम एक पेशीय वनस्पती आणि प्राणी तयार झाले. आणि त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली.
यात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधण्यास सुरुवात केली. जिवाणू आणि बुरशी (fungus) यांनी त्याच अन्नासाठी स्पर्धा सुरू केली यावेळेस बुरशीच्या पेशींनी जिवाणूची वाढ होऊ नये म्हणून काही गुंतागुंतीची रसायने निर्मिती सुरू केली.आणि ही रसायने त्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचे पाझरून तेथे असणाऱ्या जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करीत हीच रसायने म्हणजे अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके.
यातील पाहिले प्रतिजैविक म्हणजे पेनिसिलीन. याचा शोध डॉ अलेक्झांडर फ्लेमिंग यांना योगायोगानेच लागला.
जिवाणू जगत असताना त्याच्या पेशीभिंतीची(cell wall) ची झीज चालू असते. ही झीज तो जिवाणू दुरुस्त करीत असतो. पेनिसिलीन ही झीज दुरुस्त करण्याच्या कामात लागणाऱ्या रसायनांच्या कामात अडथळा आणते. यामुळे जिवाणूच्या भिंती सच्छिद्र बनतात त्यामुळे त्याची पेशी बाहेरील अतिरिक्त पाणी शोषून फुगून येते आणि जिवाणूंचा मृत्यू होतो. प्राण्यांच्या शरीरात पेशींना असलेली भिंत नसतेच तर फक्त एक पटल (membrane) असते त्यामुळे पेनिसिलिनचा प्राण्यांच्या( मानवाच्या) शरीरावर अजिबात परिणाम होत नाही. यामुळे पेनिसिलीन आणि त्याच्या गटातील किंवा तशाच तर्हेचे असलेलं केफ्लॉस्पोरीन गटातील प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर परिणाम अत्यंत नगण्य होतो.
१) विषाणू हे दुसऱ्या पेशींच्या अंतर्भागातच सक्रिय असल्यामुळे त्यांच्यावर प्रतिजैविकांचा मुळीच परिणाम होत नाहीत. यामुळेच प्रतिजैविके ही फक्त जिवाणूजन्य रोगात वापरली जातात विषाणूजन्य रोगात नाही.
२) आपल्याला झालेला रोग हा जिवाणूजन्य आहे की विषाणूमुळे आहे की बुरशीमुळे झालेला आहे हे समजून येण्यासाठी साडेपाच वर्षांचा एम बी बी एस हा कोर्स केलेले आणि त्यावर अनेक वर्षे अनुभव घेतलेले डॉक्टर असतात.
दुर्दैवाने केवळ लक्षणे पाहून लोक स्वतः औषधे घेतात, कारण मागच्या वेळेस शेजारच्या गण्याला किंवा आपल्या बंडूला अशाच लक्षणांसाठी आपल्या डॉक्टरने हीच औषधे दिलेली असतात.
काही लोक मागच्या वेळेस हगवण लागली असताना डॉक्टरांनी एंटेरो क्विनॉल किंवा तत्सम औषध दिले होते म्हणून दुसर्या वेळेसही "स्वतःच" ते औषध घेतात.
दुर्दैवाने त्याच्या मागील कार्यकारण भाव माहीत नसल्याने ते काही वेळेस होमियोपथिक डोस घेतात जो झुरळाला किंवा डासाला पुरेल इतका असतो
नाहीतर व्हेटरनरी डोस घेतात. ६० किलोच्या माणसाला लागणारा डोस ऐवजी ४०० किलोच्या रेड्याला लागणारा डोस घेतात.
३) किंवा जवळच्या केमिस्टकडे जाऊन त्याच्या कडून घसा फार दुखतो किंवा हगवण लागली आहे या लक्षणांसाठी अशी औषधे मागून घेतात. केमिस्ट सुद्धा आपलं धंदा चालवण्यासाठी किंवा स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याच्या मागे असल्याने सर्रास अशी औषधे देतात. १००% डॉक्टर असे केमिस्टकडे अर्धवट औषधे घेऊन आलेले रुग्ण रोज पाहत असतात आणि जवळ जवळ १००% केमिस्ट अशी औषधे देतात. अर्ध्य हळकुंडाने पिवळे होण्याचे यापेक्षा दुसरे उदाहरण नाही. १० नंतर २ वर्षे डिप्लोमा केलेले (डी. फ़ार्म) केमिस्टच्या दुकानात बसून डॉक्टरकी करत असतात. ना त्यांना त्यातील रसायन शास्त्राचा गंध असतो ना त्यामागील जीवशास्त्रीय प्रक्रियेचा.
४) लोक सुद्धा अशी औषधे का घेतात. -सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डॉक्टरच्या फी चे पैसे वाचवणे. यानंतरची कारणे -- तेथे लागणारा वेळ वाचवणे आणि कधी कधी डॉक्टर बाहेरचे अरबट चरबट खाल्ले, दारू पिऊन नको त्या गोष्टी केल्या म्हणून आपली हजेरी घेतील या भीती मुळे.
५) मुद्दामहून पसरविले गैरसमज - बहुसंख्य होमियोपॅथ (८०% च्या वर आपल्या पाथीचा प्रचार करण्यासाठी सर्रास असे सांगताना आढळतात की ऍलोपॅथीचे डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊन रोग "तिथल्या तिथे दाबून टाकतात". होमियोपॅथी मध्ये आम्ही रोगाचा मुळापासून नायनाट करतो म्हणून आमची औषधे स्लो असली तरी परिणामकारक असतात. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करण्याची ही हीन प्रवृत्ती आहे. याबद्दल मला अजून काही म्हणायचे नाही.
६) अँटीबायोटिक्स "उष्ण" पडतात. आयुर्वेदाच्या वैद्यांनी हा एक जाणून बुजून पसरविलेला गैरसमज आहे. ऍमॉक्सीसिलीन सारखेच प्रतिजैविक साधारण २५० ते ५०० मिग्रॅ (कॅप्सूल) दिवसात तीन वेळेस दिले जाते. परंतु गनोरिया सारख्या गुप्तरोगावर जेंव्हा रुग्ण परत येण्याची शक्यता कमी असे तेंव्हा आम्ही एक वेळेस ३.५ "ग्राम" म्हणजे २०५ मि ग्रॅम च्या १४ कॅप्सूलच्या समकक्ष औषध रुग्णास द्रवस्वरूपात देत असू शिवाय ते औषध (शरीरात जास्त काळ राहावे) मूत्रपिंडातून बाहेर पडू नये म्हणून २ ग्रॅम प्रोबेनेसीड हे दुसरे औषद्ध देत असू. शेकडो रुग्णांना असा एकच डोस देऊन त्यांचे गुप्त रोग बरे झालेले मी स्वतः पाहिलेले आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे की औषध "उष्ण" पडते हा मुद्दाम पसरवलेला गैरसमज आहे.
७) आम्हाला अतिशय अशक्तपणा, चक्कर येणे, घाम येणे उलटीची संवेदना होणे किंवा तोंडाला चव नसणे अशी लक्षणे औषध घेतल्यावरच का होतात? आम्ही काय खोटं बोलतो का असे रुग्ण विचारतात. याचे साधे उत्तर असे आहे की आपल्या शरीरात जंतूंनी प्रवेश केलेला असतो तुमची प्रतिकार शक्ती जेंव्हा जंतूंचा नाश करण्यास कमी पडते तेंव्हाच तुम्हाला रोग होतो आणि हे शरीरात शिरलेले जंतू दर २४ तासात दुप्पट या वेगाने प्रजनन करीत असतात. तुमच्या शरीरातील खर्वनिखर्व जंतू जेंव्हा प्रतिजैविके दिल्यावर मृत्यू पावतात तेंव्हा त्यांच्या पेशीतील विषे तुमच्या शरीरात पसरतात. आणि यामुळे तुम्हाला अतिशय आजारी असल्याची ही सर्व लक्षणे दिसू लागतात. देवनारच्या कचरा मुंबई भर पसरलं तर मुंबईची काय परिस्थिती होईल तशीच ही परिस्थिती आहे. जोवर या सर्व कचर्याचा निचरा होत नाही तोवर आपल्याला आजारी असल्याची संवेदना असते. दुर्दैवाने बहुसंख्य आधुनिक डॉक्टरना या गोष्टी समजावून सांगायला
(आणि रुग्णांना समजावून घ्यायला) वेळच नसतो. यामुळे काय होते रुग्ण दोनच दिवस औषध घेऊन बंद करतात आणि रोगाचे जंतू पूर्ण नष्ट व्हायच्या अगोदरच
प्रतिजैविक बंद केल्याने शरीराच्या प्रतिकारशक्तीवर जंतुनाशाच्या अतिरिक्त कामाचा ताण पडतो आणि रुग्णाला अजूनच अशक्तपणा जाणवतो. या आगीत तेल ओतायला आणि आपली पोळी भाजून घ्यायला होमियोपाथ किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञ तयारच असतात.
८) प्रतिजैविके ही शेवटी रसायनेच असतात त्यांचा आपला जसा परिणाम असतो तसे काही दुष्परिणाम असतोच. पण हे साईड इफेक्ट्चे तुणतुणे इतर पॅथीचे लोक इतके वाजवतात की लोकांना तेच जास्त खरे वाटू लागते.
काही प्रतीजैविके यकृत (लिव्हर) मूत्रपिंड (किडनी) वर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्या रोगात कोणते औषध घ्यायचे हे सुशिक्षित डॉक्टर ला नक्की माहिती असते. अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित केमिस्ट कडून किंवा सर्वज्ञ रुग्णाने स्वतः अशी प्रतिजैविके घेतल्यास त्याला जबाबदार कोण?
"अँटी बायोटिक च्या सेवनाने कीडनि निकामी होऊ शकते".हे अत्यंत अपुऱ्या माहितीवर केलेले अज्ञान मुलक विधान आहे. हे जर खरे मानले तर मूत्रपिंडाच्या संसर्गाला(urinary tract infection-- UTI ) कोणते औषध देणार? हा रोग ३३% स्त्रियांना केंव्हाना केंव्हा तरी होतोच.
९) औषध कंपन्या , केमिस्ट आणि डॉक्टर यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ही गोष्ट "नवीन" नाही. पण यात "अँटीबायोटिकच जास्त" घेतले जाते असे नसून बऱ्याच वेळेस झिंक सेलेनियम सारखी सूक्ष्म द्रव्ये किंवा जीवनसत्त्वे आणि खनिजे जिनसेंग, स्पायरुलीना सारखी सुपर फूड याचा मोठा वाटा आहे.शिवाय ही औषधे जीवनावश्यक वर्गात मोडत नसल्याने त्याच्या किमतीवर नियंत्रण नाही. याविरुद्ध बरीच प्रतिजैविके हिची जीवनावश्यक श्रेणीत असल्याने त्यांच्या किमतीवर निर्बंध आहेत. अशा टॉनिक सारख्या औषधांचा डोस कितीही दिवस देता/ घेता येतो. अँटीबायोटिक तुम्ही फार तर पाच दिवस घ्याल.
यानंतर एक फार महत्त्वाचा विषय मी मांडू इच्छितो-- "अँटी बायोटिकला प्रतिकार करणाऱ्या जिवाणूंची वाढ"
मुळात तुम्ही जेंव्हा दोन दिवस प्रतिजैविक घेता तेंव्हा सुरुवातीला त्याला सर्वात जास्त संवेदनशील(SENSITIVE) असणारे जिवाणू मरतात आणि जे जिवाणू त्या प्रतिजैविकाला कमी संवेदनशील(resistant) असतात ते जिवंत राहतात. यानंतर आपण जर प्रतिजैविक बंद केले तर हे कमी संवेदनशील(resistant)जिवाणू शरीरात जिवंत राहतात आणि त्यांची पुढची पिढी मुळात त्या प्रतिजैविकास कमी प्रतिसाद देणारी (resistant)जन्मास येते. ही प्रक्रिया वारंवार घडल्याने प्रतिजैविकास अजिबात दाद ना देणारे जिवाणू शिल्लक राहतात आणि जे संवेदनशील असतात ते जिवाणू नष्ट होतात. असे करत करत अनेक प्रतिजैविकाना दाद न देणारे(multi drug resistant) जिवाणू नैसर्गिक निवड तत्वाने(natural selection) जिवंत राहतात. अशा जिवाणूंचा फार वेगाने प्रसार होतो. अशाच जिवाणूची एक जात म्हणजे NDM १
पहा https://en.wikipedia.org/wiki/New_Delhi_metallo-beta-lactamase_1
१०) एकंदरीतच अँटी बायोटिक चे अनेक वाईट दूरगामी परिणाम असतात हा परत बऱ्याच इत्तर पॅथीच्या व्यावसायिकांनी जाणून बुजून पसरविलेला अत्यंत दुर्दैवी गैरसमज आहे. १९४२ मध्ये पेनिसिलिनचा वापर सुरू होण्याच्या अगोदर लोक शेकड्यानीच नव्हे तर हजारांनी प्लेग, कॉलरा, हगवण किंवा विषमज्वर या रोगांनी मरत होते. या काळात आयुर्वेद किंवा होमियोपॅथी सारख्या इतर पद्धती होत्याच परंतु त्यांना या कोणत्याही रोगाचा प्रसार थांबवता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. कित्येक अकाली मृत्यू त्यांना थांबवता आले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारून ते एकंदरीतच अँटी बायोटिकला शिव्या देताना आढळतात यापेक्षा दैवदुर्विलास दुसरा नसेल.
बालविधवांच्या पिढ्याच्या पिढ्या अशा रोगांमुळे दुःखात खितपत पडलेल्या अशा कथा त्या कालच्या साहित्यात सहज वाचायला मिळतात.प्रत्येक एकत्र कुटुंबात अशी एखादी बालविधवा सर्रास असे.
प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर करणार्यात केवळ इतर पॅथीचे व्यावसायिक केमिस्ट आणि स्वतः औषधे घेणारे रुग्णच नव्हे तर आधुनिक डॉक्टरही दिसतात याची काही कारणे
१) रुग्णाला आजच्या झटपट काळात एक दिवसात बरे व्हायचे असते त्यामुळे तो डॉक्टरवर दबाव टाकताना दिसतो. :"डॉक्टर परवा माझे प्रेझेन्टेशन आहे तेंव्हा परवापर्यंत काहीही करून मला बरे करा. नवीन व्यवसाय सुरू केलेल्या डॉक्टरला याला नकार देणे शक्य नसते. आणि जुन्या डॉक्टरला नेहमी येणार माणूस असेल तर त्याला नकार देणे वैयक्तिक संबंधामुळे शक्य नसते
२) जेंव्हा रोग निदान नक्की नसते की हा विषाणूमुळे रोग झाला आहे का जिवाणूमुळे अशा वेळेस डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेचा उपाय( to be on safer side) अँटीबायोटिकचा एक कोर्स लिहून देतात.रुग्ण दोन दिवसात बरा झाला तर अर्ध्या वेळेस स्वतः हून औषध थांबवतो.
३) मोठ्या शल्यक्रियेनंतर सर्जन परत उगाच धोका( why take chances) नको म्हणून एकदम उच्च दर्जाचे प्रतिजैविक देतात. antibiotic resistanceची चिंता मी कशाला करू हा विचार त्यामागे असतो.
४) दीड शहाणे किंवा सर्वज्ञ रुग्ण डॉक्टरवर दबाव टाकतात आणि सांगतात की मला चांगले अँटी बायोटिक द्या. अशा वेळेस डॉक्टर "माझ्या बापाचे काय जाते" म्हणून लिहून देतात.
हा विषय कित्येक पी एच डी करता येईल इतका खोल आणि विस्तृत आहे. त्यात खोलवर जाण्याची माझी लायकी नाही यास्तव इथेच थांबतो.
वाचने
129749
वाचनखूण
प्रतिक्रिया
349
In reply to धागा भरकटू न देणे महत्त्वाचे by शान्तिप्रिय
धागा भरकटू न देणे महत्त्वाचे
In reply to धागा भरकटू न देणे महत्त्वाचे by शान्तिप्रिय
=))
In reply to =)) by असंका
त्या लेखातली मते काही
अतिशय सुंदर माहिती आहे.
In reply to अतिशय सुंदर माहिती आहे. by कानडा
आयुर्वेदिक औषधांमध्ये धातू
In reply to आयुर्वेदिक औषधांमध्ये धातू by सतिश गावडे
कशा कशाचे भस्म नाही ऐकले का?
In reply to आयुर्वेदिक औषधांमध्ये धातू by सतिश गावडे
सुवर्ण भस्म असतं की. पारा
"झाडपाला" चे साईड ईफेक्ट नाही हे सुद्धा खोटे आहे.
अतिशय उपयोगी माहिती
फारच सरसकटीकरण करणारे
In reply to फारच सरसकटीकरण करणारे by अप्पा जोगळेकर
Aappa,Tumhi Dombivlikar Ka ho
In reply to Aappa,Tumhi Dombivlikar Ka ho by विजय_आंग्रे
जिवदानी हॉस्पिटल, देसाई गाव.
In reply to फारच सरसकटीकरण करणारे by अप्पा जोगळेकर
डिग्र्यादेखील दोन्ही आहेत की
In reply to डिग्र्यादेखील दोन्ही आहेत की by अनुप ढेरे
आयुर्वेदिक डॉक्टरला मॉडर्न
In reply to आयुर्वेदिक डॉक्टरला मॉडर्न by अप्पा जोगळेकर
अप्पासाहेब
In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे
...
In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे
दिल्लीत जर आयुष
In reply to दिल्लीत जर आयुष by अप्पा जोगळेकर
आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन
In reply to आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन by अप्पा जोगळेकर
मॉडर्न मेडिसिन सत्य आणि बाकी
In reply to मॉडर्न मेडिसिन सत्य आणि बाकी by गवि
+१
In reply to +१ by अनुप ढेरे
बेसिकली कुठल्याही पॅथीचे
In reply to बेसिकली कुठल्याही पॅथीचे by गंम्बा
वरिल तिन्हि प्रतिसादाना बाडिस
In reply to आणि माफ करा पण मॉडर्न मेडिसीन by अप्पा जोगळेकर
व्हय जी!
In reply to व्हय जी! by आनंदी गोपाळ
एकाच प्रतिसादात भंकस, चुतिया
In reply to दिल्लीत जर आयुष by अप्पा जोगळेकर
दिल्लीबाहेर आयुरेवेदिक औषध
In reply to दिल्लीबाहेर आयुरेवेदिक औषध by गंम्बा
>> अमेरीकेत होमिओपाथी गोळ्या
In reply to >> अमेरीकेत होमिओपाथी गोळ्या by सतिश गावडे
हो,
In reply to फारच सरसकटीकरण करणारे by अप्पा जोगळेकर
अप्पासाहेब
In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे
वर एका महाशयांनी आयुर्वेदाला
In reply to वर एका महाशयांनी आयुर्वेदाला by अप्पा जोगळेकर
आधी पुरावा नसताना बदनामी
In reply to वर एका महाशयांनी आयुर्वेदाला by अप्पा जोगळेकर
स्पेशलायझेशन करता अमक्या
In reply to अप्पासाहेब by सुबोध खरे
अर्धवट ज्ञान !
In reply to अर्धवट ज्ञान ! by चंपाबाई
चंपाबाई / मोगा
होमिपदीचा अनुभव वाईट आहे.
In reply to होमिपदीचा अनुभव वाईट आहे. by पिलीयन रायडर
हो पण हे ही महत्वाचं आहे की
हा लेख लिहिल्याबद्दल
In reply to हा लेख लिहिल्याबद्दल by नगरीनिरंजन
नगरीनिरंजन ह्यांच्या
In reply to हा लेख लिहिल्याबद्दल by नगरीनिरंजन
मला वाटते की
In reply to मला वाटते की by चौकटराजा
१९८१ चे सुमारास प्रसिद्ध
In reply to १९८१ चे सुमारास प्रसिद्ध by मार्मिक गोडसे
आभार पण.....
In reply to आभार पण..... by चौकटराजा
शिकले सवरलेले लोक
In reply to १९८१ चे सुमारास प्रसिद्ध by मार्मिक गोडसे
१९८३ मध्ये वैज्ञानीक HIV ला
अतिशय उपयुक्त माहिती. वाचनखूण
आयुर्वेदिक वैद्यांनी, आधुनिक
In reply to आयुर्वेदिक वैद्यांनी, आधुनिक by कैलासवासी सोन्याबापु
बापूसाहेब
In reply to बापूसाहेब by सुबोध खरे
उत्तर अतिशय आवडले डॉक्टर
कदाचित असे असेल.....
In reply to कदाचित असे असेल..... by चौकटराजा
बी जे मेडिकल कॉलेजच्या
In reply to बी जे मेडिकल कॉलेजच्या by आनंदी गोपाळ
आता बघा...
In reply to आता बघा... by असंका
वा! काय कन्क्लूजन आहे. शाब्बास्स!
In reply to वा! काय कन्क्लूजन आहे. शाब्बास्स! by आनंदी गोपाळ
मर्यादेत रहा.... माझ्या
In reply to मर्यादेत रहा.... माझ्या by असंका
समजवून असं व्यवस्थित लिहा.
In reply to समजवून असं व्यवस्थित लिहा. by धनंजय माने
मीही तुम्ही म्हणता तसंच
In reply to मीही तुम्ही म्हणता तसंच by असंका
तयाचं काये, की समजनेवाले को
In reply to तयाचं काये, की समजनेवाले को by आनंदी गोपाळ
चुक.
In reply to कदाचित असे असेल..... by चौकटराजा
त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ
In reply to त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ by गवि
हा हा हा
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
नाही ना.
In reply to नाही ना. by गवि
आतापर्यंत सुरु न होणारी गाडी
In reply to आतापर्यंत सुरु न होणारी गाडी by असंका
उत्तम प्रश्न आहे.
In reply to उत्तम प्रश्न आहे. by गवि
मान्य...
In reply to मान्य... by असंका
त्यांना तर हे सगळं कालानुरुप
In reply to त्यांना तर हे सगळं कालानुरुप by कानडा
अच्छा? आपण काय म्हणत आहात ते
In reply to अच्छा? आपण काय म्हणत आहात ते by असंका
जाऊ द्या. प्रोबॅबिलिटी चा
In reply to जाऊ द्या. प्रोबॅबिलिटी चा by कानडा
कुणाला काय समजण्यासाठी कुणाला
In reply to कुणाला काय समजण्यासाठी कुणाला by असंका
अच्छा च्या पुढे " ? " नसता तर
In reply to अच्छा च्या पुढे " ? " नसता तर by कानडा
जाउ देत नाही असं मी म्हणलं
In reply to अच्छा? आपण काय म्हणत आहात ते by असंका
"५०% केस मध्ये गॅरेजवाले (हाय
In reply to "५०% केस मध्ये गॅरेजवाले (हाय by गवि
तो पेढा इकडे द्या बघू आधी....
In reply to तो पेढा इकडे द्या बघू आधी.... by धनंजय माने
तुम्ही आधी इस्रायलहून
In reply to तुम्ही आधी इस्रायलहून by गवि
आपण कोण?
In reply to आपण कोण? by धनंजय माने
हा शुद्ध हलकटपणा आहे माने.
In reply to हा शुद्ध हलकटपणा आहे माने. by गवि
वाट बघा!
In reply to त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ by गवि
ओ म्हणून
In reply to त्यांचे कडे प्रिन्सिपलस ऑफ by गवि
हा हा हा, पेढ्याची उपमा
खरे डॉक्टरांना एक प्रश्न....
In reply to खरे डॉक्टरांना एक प्रश्न.... by गामा पैलवान
गामा साहेब,
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
डॉक्टर काका स्नायपर वाटायला
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
सुखसाहेब, तुमच्या संयमाने
In reply to सुखसाहेब, तुमच्या संयमाने by गवि
बरे तुम्ही काय म्हणता म गवी,
In reply to बरे तुम्ही काय म्हणता म गवी, by स्पा
काहीच नाही करायचं रे स्पा.
In reply to काहीच नाही करायचं रे स्पा. by गवि
फक्त समजून घ्यायचं आणि
In reply to काहीच नाही करायचं रे स्पा. by गवि
असो
In reply to असो by स्पा
=))
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
कावीळ होण्याचे सर्वात प्रमुख
In reply to कावीळ होण्याचे सर्वात प्रमुख by टवाळ कार्टा
माझ्या माहितीप्रमाणे
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
आडवे पडणे व एन्झाईम्स
In reply to आडवे पडणे व एन्झाईम्स by चौकटराजा
यकृत हा शरीरातील रासायनिक
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
स्वानुभव असा आहे की ....
In reply to स्वानुभव असा आहे की .... by गामा पैलवान
आनगापै
In reply to आनगापै by आनंदी गोपाळ
डॉक्टर
In reply to गामा साहेब, by सुबोध खरे
डॉक्टर साहेब,
In reply to डॉक्टर साहेब, by अप्पा जोगळेकर
अप्पासाहेब
होमिओपदीची औषधे एवढी छान असते
In reply to होमिओपदीची औषधे एवढी छान असते by अनुप ढेरे
तुम्हाला माहित नाही? अहो हे
In reply to होमिओपदीची औषधे एवढी छान असते by अनुप ढेरे
ढेरे साहेब
तुम्हाला माहित नाही? अहो हे
एका सुरेख घुमजाव साठी डॉक्टर
In reply to एका सुरेख घुमजाव साठी डॉक्टर by वेल्लाभट
झोपी गेलेला जागा झाला
डॉक्टर साहेब, धाग्याच्या
In reply to डॉक्टर साहेब, धाग्याच्या by धनंजय माने
ससुरे तोहर कारण हमर अंतडीया
In reply to ससुरे तोहर कारण हमर अंतडीया by कैलासवासी सोन्याबापु
इ का कहत हो बापू? मिलिटरी
In reply to इ का कहत हो बापू? मिलिटरी by आनंदी गोपाळ
लो तेरी तो! आपको का बताए
ज्या रोगांमुळे माणसे मरतात
In reply to ज्या रोगांमुळे माणसे मरतात by टवाळ कार्टा
तुम्ही कुठून आले!!!
In reply to तुम्ही कुठून आले!!! by असंका
म्हणजे ज्या रोगांमुळे माणसे
In reply to म्हणजे ज्या रोगांमुळे माणसे by टवाळ कार्टा
म्हणजे जे रोग प्राणघातक
In reply to म्हणजे जे रोग प्राणघातक by असंका
एका साध्या विचारलेल्या
In reply to एका साध्या विचारलेल्या by टवाळ कार्टा
तुम्ही मला थोडीच विचारत होतात
In reply to तुम्ही मला थोडीच विचारत होतात by असंका
तुम्ही तुमचे प्रश्न विचारत
In reply to तुम्ही तुमचे प्रश्न विचारत by टवाळ कार्टा
आपलं पहिलं वाक्य तर्क
In reply to आपलं पहिलं वाक्य तर्क by असंका
"तुम्ही कुठून आलात" म्हणजे
In reply to "तुम्ही कुठून आलात" म्हणजे by असंका
आमचाही दिल साफ असतो. अगदी क्लीन!
In reply to "तुम्ही कुठून आलात" म्हणजे by असंका
"तुम्ही कुठून आलात" म्हणजे
In reply to आपलं पहिलं वाक्य तर्क by असंका
काही कसर राहिली असेल तर
In reply to काही कसर राहिली असेल तर by आनंदी गोपाळ
मी काय दांभिकपणा केलाय?
In reply to मी काय दांभिकपणा केलाय? by असंका
आपल्या पहिल्या प्रतिसादापासून
In reply to आपलं पहिलं वाक्य तर्क by असंका
आपलं पहिलं वाक्य तर्क
In reply to तुम्ही कुठून आले!!! by असंका
तुम्ही जिथून आले, तिथूनच तेही आलेत. आईच्या पोटातून.
In reply to तुम्ही जिथून आले, तिथूनच तेही आलेत. आईच्या पोटातून. by आनंदी गोपाळ
वरील प्रतिसाद 'असका' नामक
In reply to वरील प्रतिसाद 'असका' नामक by आनंदी गोपाळ
इतके समजते हो डॉक्टर ;)
In reply to इतके समजते हो डॉक्टर ;) by टवाळ कार्टा
तुम्हाआम्हाला समजते,
In reply to तुम्हाआम्हाला समजते, by आनंदी गोपाळ
इतकी घाण भाषा?
In reply to इतकी घाण भाषा? by असंका
यात नक्की काय घाण आहे?
In reply to यात नक्की काय घाण आहे? by आनंदी गोपाळ
ते "खाली ते एक चुकीचा अर्थ
In reply to ज्या रोगांमुळे माणसे मरतात by टवाळ कार्टा
ह्यँ!
..
In reply to .. by चंपाबाई
... दुरुस्ती
In reply to .. by चंपाबाई
मोगाखानहोमिओपथीची एखादी वॉटर
In reply to मोगाखानहोमिओपथीची एखादी वॉटर by सुबोध खरे
+१
In reply to .. by चंपाबाई
टीबी ट्रेनिंगमध्ये
In reply to .. by चंपाबाई
जामोप्या,
In reply to जामोप्या, by आनंदी गोपाळ
अरे हो,
In reply to अरे हो, by आनंदी गोपाळ
मला राग नाही हो.
In reply to मला राग नाही हो. by चंपाबाई
"सरकारमान्य"
In reply to "सरकारमान्य" by आनंदी गोपाळ
हो.
In reply to हो. by चंपाबाई
तुमच्या इच्छेचे सरकार आणण्यास
In reply to "सरकारमान्य" by आनंदी गोपाळ
लोकां सांगे ....
In reply to मला राग नाही हो. by चंपाबाई
..
चंपाबाई असे प्रतिसाद देऊन काय
In reply to चंपाबाई असे प्रतिसाद देऊन काय by अजया
+111
होमिओपॅथीचं माहित माहित नाहि...
In reply to होमिओपॅथीचं माहित माहित नाहि... by अर्धवटराव
माझा एक होमिओपाथ मित्र आणि
In reply to माझा एक होमिओपाथ मित्र आणि by सतिश गावडे
अत्यंत आभारी आहे.
In reply to अत्यंत आभारी आहे. by अर्धवटराव
सगळेच पेशंट कार्यकारण
In reply to अत्यंत आभारी आहे. by अर्धवटराव
अर्धवटराव साहेब
In reply to अर्धवटराव साहेब by सुबोध खरे
डॉक्टर साहेब...
In reply to डॉक्टर साहेब... by अर्धवटराव
...
प्रतिजैविकांची चर्चा बाजूला
In reply to प्रतिजैविकांची चर्चा बाजूला by अप्पा जोगळेकर
.