मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पावसात अडकल्यावर तुमची काय करता ?

वाल्मिक · · काथ्याकूट
1) कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे 2) सरळ भिजत जाणे 3) कायापा 4) भिजलेल्या साड्यांचा SALE बघणे ( अनाहिता यांची माफी मागून पण अकु गिरी शिवाय राहवत नाही ) 5) चहा किंवा कणीसाची गाडी शोधणे 6) रेडिओ मिरची ऐकत बसने किंवा 7) खिशात शाम्पू आणि साबण आहे का बघणे 8) भिजलेलं कपडे वाळत टाकणे 9) शेजारचा भिजणार पण मिपा वर आहे का विचारणे

वाचन 15417 वाचनखूण प्रतिक्रिया 90

In reply to by राजाभाउ

अभ्या.. गुरुवार, 07/07/2016 - 17:44
राजाभाउ, थ्यांकू बर्का. पण लै कौतुक झाले ह्या वाल मिकचे. हे उठलेला वाल मार्ट सोडा आणि मिपा बप्पा स्पर्धेचा धागा आलाय तिकडे बघा. ;)

In reply to by धनंजय माने

राजाभाउ Fri, 07/08/2016 - 11:43
ह्या ह्या ह्या !!! हायला अस झाल व्हय . एक कान्यान सगळा गोंधळ केला कि. चुक दाखवुन दिल्याबद्दल घन्यवाद हो धमा (आयला धमु आठवला).

In reply to by वाल्मिक

नीलमोहर Wed, 07/06/2016 - 22:32
स्व-शोधाच्या मार्गातील पहिली पायरी म्हणजे 'मला बदलायचे आहे' आहे ही जाणीव होणे, पुढे काय, कसे बदलायचे ते अर्थात तुमच्याच हातात, मात्र ही जाणीव होणे हेही नसे थोडके.

In reply to by वाल्मिक

सूड गुरुवार, 07/07/2016 - 14:51
संपादक मंडळ हा आयडी शोधा आणि त्यांना तुम्हीच व्यनि करा!! इथे येऊन चार ओळी खरडल्यात त्या तिथे खरडा.

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 07/07/2016 - 17:38
ओल्यागच्च, दांडीवर असलेल्या ओलसर, कपाटात असलेल्या करकरीत वाळलेल्या, अश्या गंजीफ्रॉक अन जॉकीच्या चड्यांचा हिशोब मांडतो, घरी गेल्यावर भजी मिळतील का बोल ती शक्यता तपासतो अन मग सगळे गणित जमत आले तर(च) पावसाची मजा घेतो

यसवायजी Fri, 07/08/2016 - 21:40
कार्यलयात येताना किंवा जाताना पावसात अडकले तर सारखे घड्याळ बघणे कार्य लयात आले? ब्वॉर्र्र्र्र्र.. पण पावसात कसे अडकले? :)) तसेही कार्यं लयात आली की घड्याळ बघूच नये.

In reply to by अभ्या..

धनंजय माने Sat, 07/09/2016 - 22:54
आमच्या एका मित्राने त्यातल्या टॅग लाइनसकट म्हणून दाखवलं होतं एका अंताक्षरी मध्ये.... खिखिखि खुखुखु वगैरे पासून ट्ठो सगळे प्रकार ऐकले.