बैदा रोटी
गेल्या वर्षी पावसाळ्यातच एके रात्री बडेमियाँला भेट दिली. त्यावेळी हा पदार्थ पहिल्यांदा चाखला. खरपूस भाजलेली ती बैदा रोटी अन रिमझिम बरसणारा पाऊस कायम आठवणीत राहिल.
काल ते जुने फोटो चाळताना, लेकीने फरमाईशवजा प्रश्न टाकला 'बाबा तुला बैदा रोटी येते का रे?'
गेले दोन आठवडे इथे पाऊस ठाण मांडून बसलाय. मनात म्हटलं मौका है, मौसम भी है, फिर दस्तुर तो निभानाही पडेगा ना. :)
साहित्यः
रोटीसाठी
१ कप मैदा.
१ लहान चमचा मीठ.
१ अंडे
२-३ चमचे तेल.
सारणासाठी
२ मध्यम कांदे बारीक चिरलेले.
२ लहान चमचे जीरं पुड, धणे पुड, लाल तिखट, मसाला, तेल, आलं-लसुण वाटण प्रत्येकी.
कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आवडी नुसार.
१/२ किलो खिमा.
२ अंडी.
पातीचा कांदा आणि टॉमेटो. (आवडत आसल्यास.)
कृती :

एका भांड्यात मैदा चाळून घ्यावा. त्यात चवीनुसार मीठ घालून, एक अंडे फेटुन घालावे. थोडे थोडे पाणी घालत मैदा मळून घ्यावा.
(मी अंड घालायला विसरलोय हे लेकीने नजरेस आणून दिले. )
मैदा ओल्या कापडाखाली झाकून, सारणाच्या तयारीला लागावे.
कढईत तेलावर कांदा मिरची परतून घ्यावी. आलं-लसणाचं वाटण टाकून त्याचा कच्चट वास जाई पर्यंत परतावं.
कांदा गुलाबी झाल्यावर मग त्यात सर्व मसाले टाकून बाजून तेल सुटेपर्यंत परतावं. चवीनुसार मीठ घालावं.
नंतर त्यात खिमा टाकून मोठ्या आचेवर ४-५ मिनिटं ढवळावं. खिमा अन मसाला व्यवस्थित एकजीव झाला की आच लहान करावी. भांड्यावर झाकण ठेवून खिमा शिजवून घ्यावा.
झणझणीतपणा वाढवण्यासाठी मी २ चमचे कोल्हापुरी मसाला टाकला. झाकण काढल्यावर जर आत पाणी सुटलं असेल तर आच वाढवून पाणी आटवावं. वरुन कोथिंबीर पेरुन गॅस बंद करावा.

दोन अंडी फेटून बाजूला ठेवावी. आवडीनुसार पाती कांदा, टॉमेटो बारीक चिरुन ठेवावा.


ओट्यावर थोडं तेल लावून त्यावर मैद्याचा एक लहान गोळा ठेवून हाताने त्याची पातळ रोटी करावी.
त्यावर डाव-दोन डाव(मोठा चमचा) खिमा पसरवावा. टॉमेटो, पातीच कांदा टाकावा. त्यावर २-४ चमचे फेटलेलं अंडं घालावं.
रोटीच्या कडा आत मुडपून हवा तो आकार द्यावा.

ही रोटी अलगद उचलून तापलेया तव्यावर मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावी.
गरमागरम बैदा रोटी, आवडीच्या डीप सोबत सर्व्ह करावी.
वाचने
67035
वाचनखूण
प्रतिक्रिया
94
हायला!! भारी! कधी येऊ?
कसलं भारी दिसतंय! आम्ही
In reply to कसलं भारी दिसतंय! आम्ही by अजया
+१
In reply to +१ by पद्मावति
+२
In reply to +२ by किसन शिंदे
+३
In reply to +३ by चाणक्य
+४
In reply to +४ by रुस्तम
+५
In reply to +५ by प्रचेतस
+६
In reply to +५ by प्रचेतस
+६
In reply to +६ by अनन्न्या
करुन पाहिला
In reply to करुन पाहिला by पिलीयन रायडर
हा फोटो दिसतोय का?
In reply to हा फोटो दिसतोय का? by पिलीयन रायडर
मस्तच
In reply to मस्तच by गणपा
येस!
भारी बनली आहे बैदा रोटी..
_/\_
मस्त!
..
गंपा दुत्त आहे!
अरे काय छळ आहे रे.. कुठे
In reply to अरे काय छळ आहे रे.. कुठे by गवि
हाहा
क्या बात है.केलीय एकदा.फोटो
In reply to क्या बात है.केलीय एकदा.फोटो by नूतन सावंत
अत्यंत धन्यवाद.
In reply to अत्यंत धन्यवाद. by गवि
आधी जाऊन या,न् मग धन्यवाद
In reply to अत्यंत धन्यवाद. by गवि
तिथे बडे मियां म्हणालात तर कळणार नाही हं कोणाला!
In reply to अत्यंत धन्यवाद. by गवि
आयला, गविंसारख्या खवैय्याला
अय!
लाहौलविलाकुवत!
लाहौलविलाकुवत!
In reply to लाहौलविलाकुवत! by धनंजय माने
सौ हो गयी जी.
In reply to सौ हो गयी जी. by नूतन सावंत
अब क्या बताये मोहतरमा, नाचीज
अप्रतिम..
मस्त रेसिपि. पुणयात हौटल सुरू
In reply to मस्त रेसिपि. पुणयात हौटल सुरू by त्रिवेणी
नको, मुंबईतच करु देत. पुणेकर
रेसीपी बद्दल धन्यवाद ...
भयावह अप्रतिम!
In reply to भयावह अप्रतिम! by बोका-ए-आझम
चालेल काय धावेलही.
लै भारी.लवकरचं करून बघण्यात
एकदम अहाहा .. तुमची रेसिपी
In reply to एकदम अहाहा .. तुमची रेसिपी by बाळ सप्रे
आणि हो ते चिकट चिकट पीठ दिसतय
ओये !!
अतिशय वाईट्ट मनुक्ष आहे हा.
ही पाकृ चिकन / मटण / फिश /
In reply to ही पाकृ चिकन / मटण / फिश / by मृत्युन्जय
एक राहीलं.. ही पाकृ अंड न
हायला.
सुंदर पाकृ!!
भारी
भारी..!!!!
अहो...
In reply to अहो... by सरल मान
हेमंत लाटकर यांच्याशी संपर्क
In reply to अहो... by सरल मान
जर शक्य असेल तर रुमाली
मी धागा उघडला नाही.
खत्तरनाक!
मस्त..
पोटात गोळा आला ..
जबरदस्त!
जबराट.. जबराट.. जबराट.. :)
बैदा रोटी
बैदा रोटी
In reply to बैदा रोटी by दिगोचि
बैद रोटि
या अन आधीच्या धाग्यावर हजेरी
मस्तच
रोटी छान दिसते आहे
मस्त
वा, करून बघीतली पाहीजे.
जबराट दिसतय...
जबरदस्त. ह्या संडेला करावीच
सुंदर. नजाकतदार.
मस्तय.
मस्तं दिसतेय. करून बघेन.
वल्लाह!
बोले तो क ड क !!!!
गणपा भाऊ
वॉरंट काढून तुम्हाला अटक
मी कणीकेची रोटी आणि पनीरचं
In reply to मी कणीकेची रोटी आणि पनीरचं by सूड
फोटो?
In reply to फोटो? by यशोधरा
ज्या मोबिले मध्ये घेतला होता
कांद्याचे कमळ
In reply to कांद्याचे कमळ by तेजस आठवले
कांद्याचे कमळ(फुल)
लै भारी!
आमचा केविलवाणा प्रयत्न.
In reply to आमचा केविलवाणा प्रयत्न. by आनंदी गोपाळ
रुमाल वल्ला झाला राव...
In reply to आमचा केविलवाणा प्रयत्न. by आनंदी गोपाळ
गोपाळराव फक्कड झाल्यात की वर
अरेरे
In reply to अरेरे by तिमा
लाळ गळून सगळा की बोर्ड खराब
काल बैदारोटी करुन पाहिली.
In reply to काल बैदारोटी करुन पाहिली. by यशोधरा
वाह!! तुझ्याही रोटी उत्त्म
In reply to काल बैदारोटी करुन पाहिली. by यशोधरा
क्या बात है
In reply to क्या बात है by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कधी आहे कट्टा? ३ धागे तरी
In reply to कधी आहे कट्टा? ३ धागे तरी by यशोधरा
कट्टा बरेचदा खाजगी असतो.
In reply to कट्टा बरेचदा खाजगी असतो. by प्रचेतस
काय उपेग?