मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

बोका-ए-आझम · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे! ***************************************** तारीख - ३ जुलै,रविवार कट्ट्याचे ठिकाण-नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, सेक्टर १A,एम जी एम हाॅस्पिटल समोर, वाशी वेळ- दुपारी बारा वाजता जेवण अडीच पर्यंत उपलब्ध असेल.तिथे चांगले रेस्टाॅरंट आहे.आॅर्डरप्रमाणे बनवून मिळेल. रविवारसाठी एका वेळी 40 लोकं बसू शकतील इतकी जागा 12 ते 4 या वेळेसाठी आरक्षित केली आहे. निवांत बसायची सोय आहे.तेव्हा मिपाकरांनी मोठया संख्येने सहकुटुंब हजर रहावे ही विनंती! NMSA च्या आवारातच पार्किंगची व्यवस्था आहे. दुचाकीसाठी फी नाही. चार चाकीसाठी प्रवेश करतांनाच 20 रु. भरून पावती घ्यावी.

वाचने 92341 वाचनखूण प्रतिक्रिया 382

योगी९०० गुरुवार, 06/30/2016 - 11:57
यावेळी शक्य नाही.नेमके ३ लाच बरोड्याला चाललो आहे. कट्ट्याला शुभेच्छा आणि वृत्त्तांत वाचण्यास व फोटो बघण्यास उत्सुक.

अनिरुद्ध प्रभू गुरुवार, 06/30/2016 - 15:59
खर तर हा माझा पहिला कट्टा ठरला असता पण तस होण नाहीए. २८जुन पासुन मी नेमका कोकणात आहे........ कट्ट्यासाठी शुभेच्छा, व्रुतांत आणि छायाचित्रे पाहण्यास उत्सुक राहिन.... अनिरुद्ध....

पैसा Fri, 07/01/2016 - 09:42
३०० नको का? आता काय दुसरा धागा येणार नाय. निदान ३०० तरी करा! शिका कायतरी पुणेकरांकडून.

In reply to by पैसा

धनंजय माने Fri, 07/01/2016 - 11:12
अरे कोन म्हंतो करनार नाय, केल्याशिवाय रहानार नाय आरे आव्वाssssssssज कुनाचा ...... (ज़रा बसलाय या कमळीच्या नादात) -उपगट प्रमुक सानपाडा शाका क्रमांक २५६

टवाळ कार्टा Sat, 07/02/2016 - 12:28
आत्ता पर्यंत खालील आयडींनी नक्की येतोय असे कळवले आहे...यापैकी कोणी टांग दिल्यास पुढला कट्टा त्यांना पाँसर करावा लागेल...यादीत कोणाचे नाव नसल्यास इथे कळवा मिपाकर बोका-ए-आझम (आयोजक) विपा (NMSA च्या आत घेउन जाणारे संयोजक) मी प्रचेतस सतिश गावडे "सर" गणामास्तर नाखु"न" अंकल डॉ.सुबोध खरे माझीही शँपेन किसन शिंदे संदीप डांगे अत्रन्गि पाउस पक्षी मंदार भालेराव पिंगू सुश मय अदि मारवा प्रणवजोशी हेमन्त वाघे अनाहिता ग्यांग अजया त्रिवेणी मनिमौ सुरन्गी लीमाउजेट "उमा जेटली" उल्का मीता कुटुंबे मुक्त विहारि आणि सौ. मुवि स्वीट टॉकर आणि स्वीट टॉकरीणबाई माम्लेदारचा पन्खा आणि सौ. माम्लेदारचा पन्खा निलापी आणि बेटर हाफ जमल्यास उशीरा येणारे गॅरी ट्रुमन सुनील

In reply to by टवाळ कार्टा

किसन शिंदे Sat, 07/02/2016 - 12:33
अनाहिता ग्यांग अजया त्रिवेणी मनिमौ सुरन्गी लीमाउजेट "उमा जेटली" उल्का मीता
=)) =)) अजया ताई, बघताय नं?

In reply to by बोका-ए-आझम

वाह भारी एकदम कट्टा एकदम बोभाटा -कट्टा होणार म्हणजे , आम्ही पण येतोय फुल गॅंग घेऊन , टकाच्या घरच कार्य असल्यावानी (वर टाकलीत नाव)

In reply to by प्रचेतस

नाखु Sat, 07/02/2016 - 17:16
आलो असतो कट्ट्यास जर नसत्या दुसर्या उचापती. वदले मनापासून टकाश्री रावास छत्रपती ! महाकट्ट्यास भरघोस शुभेच्छा... अखिल मिपा पुणे महानगर मित्रमंडळ आणि नाखुन परिवार

In reply to by प्रचेतस

खंडाळ्याच्या घाटातील आगोबा.. पावसाळी आगोबा. भिजलेला आगोबा. थंड धुंद आगोबा. आगोबा उर्फ ... =)) असो! ;)

कंजूस Sat, 07/02/2016 - 18:08
उद्या कुर्ला ते वाशी ट्रेन्स बंद-- //Mega Block on 3.7.2016 KURLA-VASHI UP AND DN HARBOUR LINES FROM 11.30 AM TO 3.30 PM. Dn Harbour line services to Panvel/Belapur/Vashi leaving Chhatrapati Shivaji Terminus from 10.41 am to 3.25 pm and Up Harbour line services for Chhatrapati Shivaji Terminus leaving Panvel from 10.29 am to 2.57 pm will remain suspended. However special local trains will run o­n Chhatrapati Shivaji Terminus - Kurla and Vashi - Panvel sections during the block period. ///

मज्जाय बाबा लोकांची ! कट्ट्याला हजेरी लावणार्‍यांची जंगी यादी झालीय. खा लेको, खा टोभा, मटारची उसळ, शिक्रण ! मजा करा ! कट्ट्याला अनेकानेक शुभेच्छा ! सचित्र वृत्तांत जरूर टाका :)

आज सोनियाचा दिनु! मला उगाच शाळेत 26 जानेवारी ला किंवा 15 ऑगस्टला फुलांची रांगोळी काढून मोठ्या भोंग्यावर लावलेली उस्ताद बिस्मिल्ला खानांची शहनाई आठवली!!

सतिश गावडे Sun, 07/03/2016 - 08:13
मी, गणामास्तर आणि आपल्या साऱ्यांचे लाडके दर्पणसुंदरीहृदयसम्राट, पुरातन मंदिरे आणि लेणी अभ्यासक कातरवेळ फेम प्रचेतस सर पुण्याहून क्षमस्व चिंचवड वरून निघालो आहोत.

चौकटराजा Sun, 07/03/2016 - 08:47
बुवा अले नाहीत त्याला कार्न पांदू नाही येणार म्ह॑णून नाही तर .............. संसार मंदिरी या आनंद नाचतो गं ह्य गाने हाय !

अजया Sun, 07/03/2016 - 09:10
:) ग्यांगमध्ये स्वागत आहे ताई!

धनंजय माने Sun, 07/03/2016 - 10:09
टक्या, एवढे लोक्स जमत आहेत, जागा पण आहे, जेवण सुद्धा आहे . . . बघ की एखादी तिथल्या तिथे आणि करुन सोड की काय म्हणतात ते....लग्न बिग्न!

In reply to by टवाळ कार्टा

धनंजय माने Sun, 07/03/2016 - 10:31
मी तिथल्या लोकांमध्ये नाही म्हणालो, तिथल्या तिथे म्हणालो. त्या भालेरावांना गाठ की! ते पण लग्नोत्सुक आहेत. शोध म्हणजे सापडेल एखादी अस्मिता. (पहा फ़क्त झी मराठी वर)

धनंजय माने Sun, 07/03/2016 - 10:09
टक्या, एवढे लोक्स जमत आहेत, जागा पण आहे, जेवण सुद्धा आहे . . . बघ की एखादी तिथल्या तिथे आणि करुन सोड की काय म्हणतात ते....लग्न बिग्न!

In reply to by सतिश गावडे

पद्मावति Sun, 07/03/2016 - 13:46
कट्टा सुरू झाला..वाह!!. माझा उगाचंच बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना झालाय.... तिथे मुंबईत कट्टा आणि मला इथे घरी बसून तीथे काय काय मज्जा चालली असेल हा विचार करूनच मस्तं वाटतंय:))

नीलमोहर Sun, 07/03/2016 - 13:21
कट्टेकऱ्यांना ( सेफ डिस्टन्स वरून) नमस्कार आणि शुभेच्छा !! कृपया सर्वांनी मिळून त्या लाडोबा (टकाला) भरपूर फटके द्यावेत ही अति नम्र विनंती. त्या हृद्य प्रसंगाचे फोटोही काढल्यास चितळयांची बाकरवडी आणि आंबाबर्फी ( कधी ना कधी) भेट देण्यात येईल. :)

In reply to by नीलमोहर

अभ्या.. Sun, 07/03/2016 - 14:21
हाणा तेला खरंच. प्रत्येकाने निदान ४-५ तरी वाजवाव्यात. सुधारायचं न्हाय त्याशिवाय. वाटल्यास ब्लँकेट टाकून हाणा म्हणजे त्याला कळणार नाही. ;)