इकडची तिकडची खादाडी, अर्थात, अन्न हे पूर्णब्रह्म..!
राम राम मिपाकरहो,
आंतरजालावर उत्तमोत्तम पाककृतींचे आज अनेक ब्लॉग्ज उपलब्ध आहेत. तिथे मुशाफिरी करतांना विविध पाककृतींनी नटलेला, खाद्य संस्कृतीची सुंदर उधळण करणारा असा एखादा ब्लॉग सहजच दृष्टीस पडतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं, जीव तृप्त होतो!
हे सदर केवळ अश्या ब्लॉगांसाठीच! त्या तमाम बल्लवाचार्यांच्या आणि सुगरणींच्या पाककलेची नोंद घेणे, त्याला मनमुराद दाद देणे व त्याची माहिती इतरांना करून देणे हे तुम्हाआम्हा खाद्यपंढरीच्या वारकर्यांचे परमकर्तव्य आहे असे आम्ही मानतो व त्याकरताच हे सदर आम्ही सुरू करत आहोत..
मिपाकरांनी येथे त्यांना भावलेल्या विविध पाककृतींच्या ब्लॉगांचे दुवे अगदी अवश्य द्यावेत आणि खाद्यधर्माचा प्रसार व प्रचार करावा ही विनंती!
खाद्यधर्म हा जगातला असा एकच धर्म आहे की जिथे कुठलेही वाद नाहीत, हेवेदावे नाहीत! मिसळपाव डॉट कॉम या खाद्यधर्माची बांधिलकी मानून जगातल्या सर्व ज्ञात-अज्ञात खाद्यधर्मगुरूंना या सदराद्वारे अभिवादन करत आहे, त्यांच्या पाककलेस सलाम करत आहे!
आपला,
तात्या अभ्यंकर,
संस्थापक, मिसळपाव धर्म.
आमच्यापासून सुरवात करतो..
१) मिपाकर चकली यांचा सुरेख खाद्यब्लॉग.
२) मीरा नावाच्या कुणा अन्नपूर्णेचा हा खाद्यब्लॉगही पाहण्याजोगा!
चला तर मंडळी, लागा कामाला आणि द्या उत्तमोत्तम खाद्यब्लॉगांचे दुवे! :)
आपला,
(रसिक) तात्या.
वाचने
10056
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
वदनी कवळ
In reply to वदनी कवळ by भाग्यश्री
तात्या,
छान उपक्रम
अजून काही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हे सगळे
वा..छान
In reply to वा..छान by लिखाळ
तसेच
In reply to तसेच by विसोबा खेचर
पांथस्थरा
In reply to पांथस्थरा by llपुण्याचे पेशवेll
होय, पण.....
In reply to होय, पण..... by पिवळा डांबिस
थोडक्यात
In reply to थोडक्यात by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
स्पीकिंग ऑफ एफ.पी.
In reply to तसेच by विसोबा खेचर
धन्यवाद.
धन्यवाद!
मस्तच
सुरेख
thecookscottage
खूपच छान
In reply to खूपच छान by स्वातीदेव
असे लिहायचे
एकच उत्तर ..
मायक्रोव्हेव मधे