मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(या क्वार्टरवेळी)

चतुरंग · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मिपावरती कातरवेळा अवतरल्या, प्रतिसादातून कोणीकोणी क्वाटरवेळाचाही उल्लेख केला, मग काय ईर्शाद... साक्षात गदिमांच्या कातरवेळी ला आम्हाला असं 'कातरावं' लागलं! ;) या क्वार्टरवेळी, पाहिजेस तू जवळी! दिवस जाय बुडुन पार तिष्ठत किती यार चार फुकत एक चारमिनार खुलवि 'ओल्ड मंक' कळी! शेष धूम्र वलय वलय पावे 'टमि' सहज विलय कसले जरि वाटे भय एक तूच रम उजळी! घेइ, बैस, ये समीप अधिरे हे अधर टीप दोन खडे एक सीप मंद सभा मग सगळी! (ओल्डमंक)चतुरंग

वाचने 5748 वाचनखूण प्रतिक्रिया 20

चौथा कोनाडा Fri, 05/27/2016 - 12:00
:-))) लै भारी, क्वॉर्टरवेळी ! चला, विकांत आला, तयारी सुरू या वेळे साठी ! :-))) मस्त विडंबन !

चौकटराजा Fri, 05/27/2016 - 12:59
अता अभ्या याना क्वार्टरवेळ या शबदाबद्द्ल प्रज्ञामुल्य द्य्वावे लागणार .... अभ्या कंचा ब्र्यान्ड हवा मित्रा ... रोयल्टी म्हून ??

In reply to by रमेश भिडे

वपाडाव Mon, 05/30/2016 - 08:39
ते दुरदर्शनचे वृत्तसमालोचक प्रदीप भिडे आपले भौ का? बाकी, रंगाकाका फार्मात...!

In reply to by आदूबाळ

अभ्या.. Fri, 05/27/2016 - 19:38
अरे आपल्या गविनी त्याचे वर्णन असेच कायतरी केलेले. फ्रेन्च पॉलिश, खोकल्याचे कफ सिरप असा काहीतरी मिक्स वास म्हणून. बाकी रंगाकाका बोर्डावर जोमात, तिकडे रंगीकाकू फळ्यावर. एकदम विल्स जोडी (मेडफारिचदर ओ)