(या क्वार्टरवेळी)
लेखनविषय:
मिपावरती कातरवेळा अवतरल्या, प्रतिसादातून कोणीकोणी क्वाटरवेळाचाही उल्लेख केला, मग काय ईर्शाद...
साक्षात गदिमांच्या कातरवेळी ला आम्हाला असं 'कातरावं' लागलं! ;)
या क्वार्टरवेळी, पाहिजेस तू जवळी!
दिवस जाय बुडुन पार
तिष्ठत किती यार चार
फुकत एक चारमिनार
खुलवि 'ओल्ड मंक' कळी!
शेष धूम्र वलय वलय
पावे 'टमि' सहज विलय
कसले जरि वाटे भय
एक तूच रम उजळी!
घेइ, बैस, ये समीप
अधिरे हे अधर टीप
दोन खडे एक सीप
मंद सभा मग सगळी!
(ओल्डमंक)चतुरंग
वाचने
5748
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
=)))
:-)))
वावावा!
वा वा चला बसुया
भन्नाट !!
;)
अता अभ्या याना
In reply to अता अभ्या याना by चौकटराजा
वनेन्डोनली ओल्ड मंक,
वाह !! बर्याच दिवसांनी
In reply to वाह !! बर्याच दिवसांनी by सूड
चांगलं?
In reply to चांगलं? by रमेश भिडे
??
=))
=))
वा काय जमीय! वा वा!
In reply to वा काय जमीय! वा वा! by आदूबाळ
अरे आपल्या गविनी त्याचे वर्णन
मस्त हो...
सुरस! रसपूर्ण!
झकास जमले विडंबन! =))
झकास
या क्वार्टओळींनी मनाची अवस्था कातर कातर झाली