मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जेव्हा माझ्या कर्जांना (एका बँकरचे गार्‍हाणे) - विडंबन

मंदार दिलीप जोशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जेव्हा माझ्या कर्जांना उधळी मुजोर माल्ल्या माझा न राहतो मी हरवून हा 'सहारा' काँग्रेस भाळ होते, होती प्रफुल्ल दक्षी ओढून कर्ज घेते, हे राष्ट्रवादी पक्षी शरदास सिंचनाच्या नाही मुळी फवारा | जेव्हा माझ्या कर्जांना... डोळे मिटून घेतो, पण व्याजही फिटेना हे कर्ज कोट्यावधींचे, लाखांतही चुकेना देऊन थकलो मी सारखा तुला इशारा | जेव्हा माझ्या कर्जांना... नोटांस हा बिअरचा, का सांग वास येतो जिवंत कॅलेंडराचा, नुसताच भास होतो केव्हा किंगफिशरचा उगवेल सांग तारा | जेव्हा माझ्या कर्जांना... (इतरत्र पूर्वप्रकाशित)

वाचने 2906 वाचनखूण प्रतिक्रिया 12

गामा पैलवान 24/05/2016 - 17:07
मंदार दिलीप जोशी, अगोदर वाचलेली तुमच्या अनुदिनीवर. तरीपण परत वाचून खूप हसलो. आ.न., -गा.पै.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर 24/05/2016 - 21:02
कवितेचा आशय चांगला आहे,पण फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच का? मल्ल्याकडून सगळ्यांना मलई मिळाली आहे,तो दिवसाढवळ्या पळुण जातो ही नरेंद्र मोदींना नामुष्की आणणारी गोष्ट आहे.यात सर्व पक्ष गुंतलेले आहेत.

चांदणे संदीप 25/05/2016 - 13:28
खूपच आवडलंय! वर्जिनल आणि हे, दोनो! Sandy