जेव्हा माझ्या कर्जांना (एका बँकरचे गार्हाणे) - विडंबन
लेखनविषय:
काव्यरस
जेव्हा माझ्या कर्जांना उधळी मुजोर माल्ल्या
माझा न राहतो मी हरवून हा 'सहारा'
काँग्रेस भाळ होते, होती प्रफुल्ल दक्षी
ओढून कर्ज घेते, हे राष्ट्रवादी पक्षी
शरदास सिंचनाच्या नाही मुळी फवारा | जेव्हा माझ्या कर्जांना...
डोळे मिटून घेतो, पण व्याजही फिटेना
हे कर्ज कोट्यावधींचे, लाखांतही चुकेना
देऊन थकलो मी सारखा तुला इशारा | जेव्हा माझ्या कर्जांना...
नोटांस हा बिअरचा, का सांग वास येतो
जिवंत कॅलेंडराचा, नुसताच भास होतो
केव्हा किंगफिशरचा उगवेल सांग तारा | जेव्हा माझ्या कर्जांना...
(इतरत्र पूर्वप्रकाशित)
वाचने
2906
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
=)) बेक्कार
In reply to =)) बेक्कार by स्पा
धन्यवाद
अगोदर वाचलेली
In reply to अगोदर वाचलेली by गामा पैलवान
धन्यवाद गा पै
ह्म्म्म.....
In reply to ह्म्म्म..... by अनिरुद्ध प्रभू
बुवा का आवडली म्हणे तुम्हाला?
ह्म्म्म.....
कवितेचा आशय चांगला आहे,पण
In reply to कवितेचा आशय चांगला आहे,पण by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
आलात का!
In reply to कवितेचा आशय चांगला आहे,पण by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
तुम्ही त्यावर कविता लीहायला
=))
लै भारी!