मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी मारलेल्या एकूण माश्या

जव्हेरगंज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मी मारलेल्या एकूण माश्या सत्तावीस मोजण्यात खूप वेळ जातो खिडकीचा एक ग्रील तुटला आहे त्याच्या जरासं खाली एक झुरळ फिरते आहे बघण्यात खूप वेळ जातो कंटाळा आल्यावर मी एखादी कविता लिहायला घेतो शब्द? शोधण्यात खूप वेळ जातो आरसा फुटलाय माझ्याकडचा रोज उठून कोण बघणार त्यात? साला, जगण्यात खूप वेळ जातो आयुष्य ! ही तर एक शिक्षाच आहे भोगण्यात खरंच खूप वेळ जातो -जव्हेरगंज

वाचने 7006 वाचनखूण प्रतिक्रिया 21

आयुष्य सुंदर आहे हो...जगता यायला पाहिजे ! ते आयुष्य म्हणजे शिक्षा वगैरे विचारसरणी अज्जिबात आवडत नाही. आपल्यापेक्षा अतिशय कमी संसाधनामधे, अगदी एक हात, पाय , डोळे नसलेले लोक पण सुंदर आयुष्य जगतात. दिवसाचे उत्पन्न ५० रुपये असलेले लोक पण एंजॉय करतात. मग आपण का उगाच मला हे नाही , मला ते नाही असे म्हणत जगायचे ? प्रत्येक क्षण जगा. प्रत्येक क्षण साजरा करा. :-)

In reply to by उगा काहितरीच

जव्हेरगंज 21/05/2016 - 20:38
नागराज मंजुळे एकदा म्हणाले होते, वर्षभर अभ्यास करा, रात्री जागवा, मेहनत करा, घाम गाळा, मग शेवटी परिक्षाकेंद्रात तीन तास पेपर द्या. खरंतर एवढ्यावरच भागलं पायजे ना, तर नाय. त्या पेपर तपासनिकाकडे जाऊन कॅलक्युलेटर घेऊन बसा. त्याला २+२=४ हेच कसं बरोबर आहे पटवून द्या. मग मार्क घ्या. हे म्हंजे कैच्याकै. याला काय अर्थ नाय.

In reply to by कंजूस

जव्हेरभाऊ म्हणजे लै मोठ्ठा मासा आहे मिपावरचा. म्हणून फुल्ल तयारीने आलो होता. असो. विकांताला मछली फ्राय! हाकानाका

अजया 21/05/2016 - 10:55
:) कंटाळा आला की मिपा वाचायला घेते.मग असे काहीतरी सापडतेच ;)