मी मारलेल्या एकूण माश्या
लेखनविषय:
मी मारलेल्या एकूण माश्या
सत्तावीस
मोजण्यात खूप वेळ जातो
खिडकीचा एक ग्रील तुटला आहे
त्याच्या जरासं खाली
एक झुरळ फिरते आहे
बघण्यात खूप वेळ जातो
कंटाळा आल्यावर मी
एखादी कविता लिहायला घेतो
शब्द?
शोधण्यात खूप वेळ जातो
आरसा फुटलाय माझ्याकडचा
रोज उठून कोण बघणार त्यात?
साला,
जगण्यात खूप वेळ जातो
आयुष्य !
ही तर एक शिक्षाच आहे
भोगण्यात खरंच खूप वेळ जातो
-जव्हेरगंज
वाचने
7006
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
In reply to अच्च जालं तल!! by खालीमुंडी पाताळधुंडी
लोल! =))
In reply to अच्च जालं तल!! by खालीमुंडी पाताळधुंडी
अशा काही कविता आणि त्यावरचे अभिप्राय वाचले की हसण्यात छान वेळ जातो. :)
आवडल्या गेली आहे!
Sandy
पैजारबुवा, रातराणी, नीलमोहर इ. दिग्गजांच्या प्रतीक्षेत. ;-)
:)
आयुष्य सुंदर आहे हो...जगता यायला पाहिजे ! ते आयुष्य म्हणजे शिक्षा वगैरे विचारसरणी अज्जिबात आवडत नाही. आपल्यापेक्षा अतिशय कमी संसाधनामधे, अगदी एक हात, पाय , डोळे नसलेले लोक पण सुंदर आयुष्य जगतात. दिवसाचे उत्पन्न ५० रुपये असलेले लोक पण एंजॉय करतात. मग आपण का उगाच मला हे नाही , मला ते नाही असे म्हणत जगायचे ? प्रत्येक क्षण जगा. प्रत्येक क्षण साजरा करा. :-)
In reply to आयुष्य सुंदर आहे हो...जगता by उगा काहितरीच
तुम्हाला मुद्दा समजलेला नाही
In reply to तुम्हाला मुद्दा समजलेला नाही by जव्हेरगंज
कविता आणि प्रतिसाद आवडला,
किपीटप
In reply to तुम्हाला मुद्दा समजलेला नाही by जव्हेरगंज
ओक्के! समजवा मग...
(अजाण बालक) उका ;-)
In reply to ओक्के! समजवा मग... by उगा काहितरीच
नागराज मंजुळे एकदा म्हणाले होते,
वर्षभर अभ्यास करा, रात्री जागवा, मेहनत करा, घाम गाळा, मग शेवटी परिक्षाकेंद्रात तीन तास पेपर द्या.
खरंतर एवढ्यावरच भागलं पायजे ना, तर नाय.
त्या पेपर तपासनिकाकडे जाऊन कॅलक्युलेटर घेऊन बसा. त्याला २+२=४ हेच कसं बरोबर आहे पटवून द्या. मग मार्क घ्या. हे म्हंजे कैच्याकै.
याला काय अर्थ नाय.
उगाच ते मोठे जाळे घेऊन कशाला आलात एवढ्याशा लहान माशा पकडायला उका?
In reply to उगाच ते मोठे जाळे घेऊन कशाला by कंजूस
जव्हेरभाऊ म्हणजे लै मोठ्ठा मासा आहे मिपावरचा. म्हणून फुल्ल तयारीने आलो होता. असो. विकांताला मछली फ्राय! हाकानाका
आवडली.
:)
कंटाळा आला की मिपा वाचायला घेते.मग असे काहीतरी सापडतेच ;)
आयुष्य !
ही तर एक शिक्षाच आहे
भोगण्यात खरंच खूप वेळ जातो
...हे आवडले
In reply to जबरदस्त by समाधान राऊत
+1
In reply to जबरदस्त by समाधान राऊत
हेच नाही आवडले . बाकी कविता मस्त आहे. ;-)
सैराटचा रिव्ह्यु लवकर येउ दे .
लिहित राहा. अजून थोडी दीर्घ राहीली असती तरी चालली असती.
-दिलीप बिरुटे
जबरदस्त : ))
अच्च जालं तल!!