..किती लौकरच आज उजाडलं बाई..
लेखनविषय:
..किती लौकरच आज उजाडलं बाई..
सजणाच्या मिठीमध्ये कळालच नाही
किती लौकरच आज उजाडलं बाई...
सजणाच्या प्रेमाला ह्या नाही वेळ काळ
झोपलयं पहा कसं कुक्कुलसं बाळ..
झोपमोड त्याची मला करवत नाही..
चांदण्यात न्हालो दोघे काल पुरी रात्र..
अमृताने तृप्त झाली,हर एक गात्र..
वाटे सकाळच कधी उगवणार नाही..!
तसा आहे आज छान रविवार सुस्त..
घ्यावी गडे अजुनिया..झोप थोडी मस्त...
लावले मी दूर त्याला पिटाळुन बाई..
सजणाच्या प्रेमालाही काळवेळ नाही...
किती लौकरच आज उजाडलं बाई
+ कानडाऊ योगेशु
वाचने
2804
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
खी खी खी!
In reply to खी खी खी! by रातराणी
यात खी खी करण्यासारखे काय आहे बाॅ ?
In reply to यात खी खी करण्यासारखे काय आहे by सस्नेह
सगळंच कसं इस्क्टुन सांगायच तै. मला लाज वाट्टे ना.
=))
पाभेंच्या कवितांची आठवण झाली.
In reply to =)) by प्रचेतस
धन्यवाद प्रचेतस... तुम्ही जागवलेल्या माझ्या आठवणींखातीर माझा काव्यात्मक प्रतिसाद.....
मेण्टेण्ड ठेवा की हो जरा दर्जा आणि काय ते...!
- (रावसाहेब) Sandy
In reply to कायो by चांदणे संदीप
गपा अण्णा गपा! ;)
रच्याकने : इथे श्रूंगारीक लावणी लिहायचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे विषय कम दर्जाचा निवडला आहे असा (गैर) समज होऊ शकतो.!
In reply to गपा अण्णा गपा! ;) by कानडाऊ योगेशु
सगळ्या प्रकारचे प्रयत्न झालेच पाहिजेत! येऊद्या अजून!
बेस्ट ऑफ लुच्क!!
Sandy
पाच दिसांचा आठौडा असल्यांची !!!
वल्लींची दादही दिलखुलास (का काय म्हणत्तात) तशी आहे.
निरिक्षक नाखु
धन्यवाद रातराणी,प्रचेत,चांदणे संदीप आणि नादखुळा!
In reply to धन्यवाद रातराणी,प्रचेत,चांदणे by कानडाऊ योगेशु
अर्र्र ते प्रचेत च्या ऐवजी प्रचेतस असे हवे होते.!
खी खी खी!