दन दन दनाट झिंगाट सैराट..
मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं.
वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात.
यामुळे मराठी चित्रपट बघण्यापेक्षा एखादा अॅनिमेशन चित्रपट बघितलेला बरा.
पण इथे ‘सैराट’ ची लैच चर्चा चालली तसं कुतूहल उड्या मारू लागलं. मराठी चित्रपटांचे वर दिलेले सगळे पैलू सहन करून हा चित्रपट बघणेबल असेल का याचा साधक बाधक विचार करून अखेर ठरवले, चित्रपट बघायचा.
पण चित्रपट बघितला आणि अहो आश्चर्यम ! यापैकी एकही पैलू टोचला नाही. ना नाटकी कथानक, ना रंगवलेले पडदे, ना पुस्तकी थाटाचे संवाद. आणि अभिनयाबद्दल काय बोलावं ? पडद्यावरची ष्टोरी आपण बघत नसून तुमच्या आमच्या आजूबाजूला घडणारा रोजच्या बघण्यातलाच किस्सा वाटून गेला राव.
तर, ‘सैराट’ भन्नाट आवडला. आता का आणि कसा याचा पंचनामा करायचा म्हणजे त्यातली मज्जा घालवण्यासारखंच. पण तरीसुद्धा काही प्लस मायनस इथे मांडल्याशिवाय राहवत नाही. विशेषत: ‘सैराट’ फ्यान क्लबसाठी
पाटलाची लाडकी लेक अर्ची आणि कोळ्याचा झिंगाट पोर परशा यांची ही जमिनीवरचीच प्रेमकथा. पाटलाची दहशत अतिशय सूचकपणे दाखवली आहे. त्या दहशतीची जाणीव नायक आणि नायिका दोघेही बाळगून आहेत. कोवळ्या वयात फुलणारे प्रेम त्या दहशतीने कोमेजून न जाता त्यातूनच वाट शोधत जाते. दोघांमधली सामाजिक आणि आर्थिक विषमता पावलोपावली प्रेक्षकांच्या समोर येत राहते आणि तरीही प्रसंगांचे वळण कुठे खटकत नाही. अखेरीस अर्ची आणि परशा ठेचा खात खात पळून जाण्यात यशस्वी होतात. हा पूर्वार्ध अतिशय रोचक झाला आहे.
उत्तरार्ध बऱ्याच जणांना भावला नाही. पण तोसुद्धा पूर्वार्धाप्रमाणेच वास्तवाशी इमान राखून आहे. एकीकडे कुटुंबाबद्दलची घराबद्दलची ओढ आणि परशाबद्दलचे नैसर्गिक आकर्षण यात होणारी रस्सीखेच रिंकू राजगुरू या नवोदित मुलीने अतिशय प्रगल्भपणे दाखवली आहे. संपन्न घरात वाढलेली असल्याने विपन्न्तेचा, बकालतेचा सामना करताना हरणारी हिम्मत शर्थीने सावरून धरणारी अर्ची रिंकूने अगदी समर्थपणे उभी केली आहे. त्यामानाने उत्तरार्धात आकाशचा अभिनय तिच्यापुढे काहीसा फिका पडलासा वाटते. पडत झाडत, ठेचा ठोकरा खात अखेर त्या दोघांचे प्रेम सगळ्या कसोट्यांना पुरून उरते हा भाग खरोखर बघण्यालायक झाला आहे.
आणि शेवट मात्र पूर्ण कलाटणी देणारा. केवळ सुन्न !
हा शेवट म्हणजे रुढीप्रियतेच्या मानसिकतेवर आणि ती सहन करणाऱ्या समाजमनावर सन्नकन मारलेली चपराक आहे ! ! !
ग्रामीण ष्टुरी असूनसुद्धा सैराट मध्ये ‘ग्राम्य’पणा अधोरेखित केलेला नाही. शहरी लोकांच्या कल्पनेतले ‘ग्राम्य’ वातावरण मुद्दाम निर्माण केलेले नसून खरोखरच्या ग्रामजीवनातले सरळ चित्रण आहे. कथानक सहज पुढे जात राहते. कुठेही कृत्रिम चढ-उतार, नाट्यमय झटके दिलेले नाहीत. पात्रे कृत्रिम वाटत नाहीत. तरीही प्रेक्षकांच्या मनातली उत्कंठा सातत्याने राखून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. नायिका अर्चना उर्फ अर्ची ही सरासरी मराठी चित्रपट नायिकेच्या परंपरेला धक्के देणारी आहे. तरीही बोल्ड वाटत नाही. ओढूनताणून आणलेला शहरी सुधारकपणा तिच्यात नाही. पण तरीही कुठल्याही हिंदी चित्रपटाच्या नायिकेपेक्षासुद्धा ती मॉड आहे. तिचा बिनधास्तपणा कसल्याही सो कॉल्ड मॉडर्नपणा पेक्षा आकर्षक आहे. सौंदर्याचे कुठलेही पारंपारिक निकष तिला लागू होत नसूनही ती सुंदर वाटते यात निवळ कॅमेर्याचे यश नसून तिची अदा, अंदाज आणि दिग्दर्शकाचे कौशल्य यांचाही मोठा वाटा आहे.
नायक परशा हासुद्धा पारंपारिक नायकाच्या चौकटीत बसत नाही. धाडसी असूनही काहीसा बुजरा. त्याच्या वावरण्यात ष्टाईल आहे पण ‘अॅक्शन’ नाही. धीटपणा आहे पण कसलेही ग्लॅमर नाही. आणि तरीसुद्धा अर्चीचे त्याच्याकडे आकर्षित होणे अगदी नैसर्गिक वाटते. आकाश ठोसरने परशा अगदी यथार्थ उतरवला आहे.
एकूणच मांडणीमध्ये कुठेही भडकपणा नाही इतकेच नाही तर साधेपणासुद्धा कुठेच ‘अधोरेखित’ केलेला नाही. चित्रपट मांडण्याचा हा सहजपणाच मला भावून गेला.
आणखी एक अतिशय उल्लेखनीय विशेष म्हणजे व्हायोलन्सच्या सर्व प्रसंगात पार्श्वसंगीत शून्य आहे ! ना कर्णकर्कश्श वाद्यमेळ ना तारस्वरातील किंचाळ्या ना ड्रम्सचा टिपेचा धडधडाट. पण कोणताही बटबटीत म्युझिक इफेक्ट न देताही त्यातली हिंसा जाणिवांना हादरवून जाते.
अजय अतुल यांचे सुश्राव्य आणि मधुर संगीत ‘याड’ लावून जातं. सर्वच गीते अतिशय मेलोडियस आणि हार्मनीयुक्त आहेत. एक ‘झिंगाट’ सोडलं तर इतर कुठलेही गीत प्रत्यक्षपणे नायक नायिकेच्या मुखी उमटलेले नाही. पण त्या त्या प्रसंगातील नायक नायिकेच्या भावना संगीत आणि दृश्य माध्यमातून अगदी चपखलपणे उतरल्या आहेत.
मात्र एक विसंगती मला खटकली. चित्रपटातून वेगळी काढून डोळे मिटून ही गाणी इन्स्ट्रुमेन्ट्ल मोडमध्ये ऐकली तर ती खरंच अवीट गोडी देतात. पण संगीताचा पाश्चात्य धर्तीचा बाज आणि वाद्यमेळ यांच्यामुळे ग्रामीण मराठी शब्द त्यात ‘फिट्ट’ होत नाहीत. खऱ्या अर्थानं ही ‘गावाकडची गाणी’ वाटतच नाहीत. सुमधुर असूनही ही गाणी चित्रपटात वरून दिलेल्या देखण्या पॅचेससारखी वाटतात.
तसेच अर्चीच्या घराचे वातावरण प्रतिगामी असूनही एकट्या अर्चीलाच बुलेट, ट्रॅक्टर चालवणे, कधीही कुठेही भटकणे हे स्वातंत्र्य दिलेले आहे. तसेच परशा आणि अर्ची यांची प्रेमकहाणी आख्ख्या गावाला दिसत असूनही अर्चीच्या घराच्या लोकांना समक्ष दिसेपर्यंत समजत नाही. या किरकोळ चित्रपटीय विसंगती सोडल्या तर बाकी सर्व चित्रपट जवळ जवळ वास्तवाला धरून आहे.
एकूण, सगळी बेरीज-वजाबाकी करूनही मला ‘सैराट’ भन्नाट आवडला आहे. आणि सैराट फ्यान क्लबच्या आग्रहास्तव इथे माझंबी मत लिवलं आहे. :)
वाचने
42378
वाचनखूण
प्रतिक्रिया
158
ओवरहाईप पण ...
In reply to ओवरहाईप पण ... by नंदा
सहमत.
In reply to ओवरहाईप पण ... by नंदा
आपली प्रतिक्रिया
मस्त प्रतिसाद
आणखी एक अतिशय उल्लेखनीय विशेष
एखादी मुलगी जास्त आवडली
छन लिहिलय
छान लिहिलंय
जरा कन्फ्युजन झाल्यासारखं वाटतंय
In reply to जरा कन्फ्युजन झाल्यासारखं वाटतंय by समीरसूर
हे पाहा
In reply to हे पाहा by मराठी कथालेखक
हो, असं मी ऐकलं आहे खरं
In reply to हो, असं मी ऐकलं आहे खरं by समीरसूर
'श्वास' हा व्यावसायिक पातळीवर
In reply to 'श्वास' हा व्यावसायिक पातळीवर by मराठी कथालेखक
दे धक्का
In reply to दे धक्का by चांदणे संदीप
दे धक्का फारसा काही चांगला
In reply to दे धक्का फारसा काही चांगला by मराठी कथालेखक
दे धक्का अतिशय टुकार चित्रपट
हुश्श. सैराटची सगळी परिक्षणं/
In reply to हुश्श. सैराटची सगळी परिक्षणं/ by अंतरा आनंद
@अंतरा आनंद, बऱ्याच
इतर मराठी चित्रपट
चित्रपट हे मनोरंजनाचे साधन
In reply to चित्रपट हे मनोरंजनाचे साधन by खालीमुंडी पाताळधुंडी
या काहीजणांना वास्तववादी
मराठी चित्रपट आणि सैराट.
In reply to मराठी चित्रपट आणि सैराट. by सस्नेह
मजाच आहे!
In reply to मजाच आहे! by शब्दबम्बाळ
Men to left.
In reply to Men to left. by रमेश भिडे
परफेक्ट भिडेसाहेब
.
100
सैराटची पायरेटेडे सीडी देवून स्नेहांकिता ताईंचा सत्कारIn reply to . by भोळा भाबडा
:)
पायला आवडला. बास.
सैराट - काही न पटलेले
In reply to सैराट - काही न पटलेले by सप्तरंगी
जे आवडले नाही त्याची चर्चा
In reply to सैराट - काही न पटलेले by सप्तरंगी
सप्तरंगीचा हा प्रतिसाद मला
In reply to सप्तरंगीचा हा प्रतिसाद मला by समीरसूर
चित्रपटात प्रबोधन असेलच
सैराट सैराटच
In reply to सैराट सैराटच by मित्रहो
एक दुरुस्ती
In reply to एक दुरुस्ती by समीरसूर
पण श्वासच्या लोकप्रियतेत
In reply to एक दुरुस्ती by समीरसूर
बरोबर
सैराट आणी बाहुबली
In reply to सैराट आणी बाहुबली by सिरुसेरि
असू दे असू दे... :)
In reply to सैराट आणी बाहुबली by सिरुसेरि
?? बरं असू दे.
छान प्रतिसाद आण चर्चा...
सैराट - वेगळेपणाचा अट्टहास
In reply to सैराट - वेगळेपणाचा अट्टहास by मराठी कथालेखक
:)
In reply to :) by चांदणे संदीप
टाळ्या शिट्ट्यांनी भरलेलं
In reply to टाळ्या शिट्ट्यांनी भरलेलं by मराठी कथालेखक
ओ मकासर
In reply to ओ मकासर by चांदणे संदीप
सग्रहण करायला रसिकता लागते
In reply to सग्रहण करायला रसिकता लागते by मराठी कथालेखक
तुम्ही लावाल तो अर्थ असल्यावर
In reply to तुम्ही लावाल तो अर्थ असल्यावर by चांदणे संदीप
मा. संदीपराव
In reply to तुम्ही लावाल तो अर्थ असल्यावर by चांदणे संदीप
चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन
In reply to चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन by मराठी कथालेखक
आता दंडवत देण्याची पाळी माझी :)
In reply to आता दंडवत देण्याची पाळी माझी :) by चांदणे संदीप
दंडवत राहिलाच ;)
In reply to आता दंडवत देण्याची पाळी माझी :) by चांदणे संदीप
एस. पी. बालसुब्रमण्यम माहीत
In reply to आता दंडवत देण्याची पाळी माझी :) by चांदणे संदीप
बाकी तुम्ही फक्त अवांतरवर
In reply to टाळ्या शिट्ट्यांनी भरलेलं by मराठी कथालेखक
तुम्ही एकदा थिएटरला जाउन पहा
In reply to तुम्ही एकदा थिएटरला जाउन पहा by _मनश्री_
मराठी कथा लेखकांसाठी असलेला
In reply to मराठी कथा लेखकांसाठी असलेला by _मनश्री_
चालतंय ओ
In reply to तुम्ही एकदा थिएटरला जाउन पहा by _मनश्री_
मी सेन्सर कॉपी वाला नाही
आत्तापर्यंत चार वेळा पाहिला
In reply to आत्तापर्यंत चार वेळा पाहिला by _मनश्री_
महाराष्ट्र दुष्काळग्रस्त
In reply to महाराष्ट्र दुष्काळग्रस्त by रमेश भिडे
सिनेमा आणि दुष्काळाच काय
In reply to सिनेमा आणि दुष्काळाच काय by _मनश्री_
ऐन दुष्काळात हा सिनेमा ,
'याड लागल' व 'सैराट झाल'
मला सैराट चांगला वाटला नाही
In reply to मला सैराट चांगला वाटला नाही by खालीमुंडी पाताळधुंडी
कट्यार आणि बालगंधर्व
In reply to कट्यार आणि बालगंधर्व by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
फीलॉसॉफर हम्म...
In reply to कट्यार आणि बालगंधर्व by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
सैराट सामाजिक आहे हा एक गैरसमज
In reply to सैराट सामाजिक आहे हा एक गैरसमज by मराठी कथालेखक
शेवट बघण्यासाठी लोक गर्दी
In reply to शेवट बघण्यासाठी लोक गर्दी by रमेश भिडे
That's सामाजिक U see!
In reply to सैराट सामाजिक आहे हा एक गैरसमज by मराठी कथालेखक
मुळात 'आंतरजातीय विवाहाला
जंत