दन दन दनाट झिंगाट सैराट..
In reply to ओवरहाईप पण ... by नंदा
In reply to ओवरहाईप पण ... by नंदा
In reply to जरा कन्फ्युजन झाल्यासारखं वाटतंय by समीरसूर
In reply to हे पाहा by मराठी कथालेखक
In reply to हो, असं मी ऐकलं आहे खरं by समीरसूर
'श्वास' हा व्यावसायिक पातळीवर अगदी मर्यादित यश मिळवू शकला.मान्य.
र्थात, नीटनेटके सादरीकरण, चांगली पटकथा, सकस अभिनय इत्यादी बाबींवर 'श्वास'ने मोठी मजल मारून निदान त्या बाबतीत तरी मराठी चित्रपटांना थोडे हलवून अधिक जागे केले हे मान्य आहेच!मला पण हेच म्हणायचे आहे. श्वासला सुवर्ण कमळ मिळाले होते 'श्वास बघायलाच हवा (भले पायरेटेड सीडी मिळवून)' या भावनेने अनेकांनी तो पाहिला, अर्थात मल्टिप्लेक्स वगैरेतून मिळणारा भरपूस पैसा श्वासला नाही मिळाला पण पायरसीतून का होईना पण चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहीला गेला आणि तिथून बदलाची सुरवात झाली. मला वाटतं व्यावसायिक यशाच्या बाबतीत 'दे धक्का' महत्वपूर्ण ठरला. विकीपीडीयावरील माहितीनूसार 'दे धक्का' ने सहा कोटींचा धंदा केला. सैराटच्या साठ कोटींची पायाभरणी केली अस म्हणता येईल..
In reply to 'श्वास' हा व्यावसायिक पातळीवर by मराठी कथालेखक
"वळू"ला... ज्याचे मला खूप वाईट वाटलेले त्यावेळी! Sandy
In reply to दे धक्का by चांदणे संदीप
In reply to दे धक्का फारसा काही चांगला by मराठी कथालेखक
प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात.हे मस्तच. मोठ्या दिमाखात आलेल्या अनेक चित्रपटांनी पुरती निराशा केली. केवळ चांगला विषय किंवा नावाजलेले कलाकार घेतले की पटकथा, एडिटिंग, संवाद, सशक्त व्यक्तीरेखा या चित्रपटाच्या मुख्य भागांकडे दुर्लक्ष केले तरी चालते असा खाक्या दिसून येतो. हिंदीचे ही तेच, ’पा’ किंवा ’तारे..’ सारखे गाजलेले चित्रपटही त्यात ठळक दिसून येणारा अभिनिवेशामुळे खूप आवडले नाहीत. ("बा प्रेक्षका, आम्ही ही महान गोष्ट सांगतोय" असा आव) अगदी ’प्रकाश आमटे’ किंवा ’कट्यार..’ सारख्या सिनेमातही पात्रांच्या स्वभावाची व्यवस्थित मांडणी, स्वाभाविक अभिनय यावर काहीही मेहनत घेतल्याचं जाणवलं नाही. नुसतं नवीन तंत्रज्ञान आणि चकचकीतपणा काय कामाचा? "मी शिवाजीराजे.. ", काकस्पर्श डोंबिवली फास्ट ह्यासारखे सिनेमे मला आक्रस्ताळी वाटतात. ’कोर्ट’ खूप आवडलेला. पण तो वेगळया प्रकारचा होता. ’मसाला’ हा सुद्धा एक चांगला सिनेमा होता तो मी टीव्हीवर पाहिला तरी आवडला होता. ’फॅन्ड्री’ सुद्धा टीव्हीवर आणि तो ही सलग पाहिला नसल्याने फार बोलू नाही शकणार पण तेवढ्यातही तो आवडला होता असं आठवतय. ’रात्र आरंभ’ हा असाच एक काळाआधी आलेला चांगला चित्रपट. टीव्हीवरच पाहिलाय दोनदा. पण अलिकडे बरेचदा जेवढा गाजावाजा केला जातो तेवढा सिनेमा चांगला नसतो असं बरेचदा होतं. एलिझाबेथ एकादशी आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी हे ही असेच खूप आवडलेले सिनेमे. पण त्यातील विषयाच्या वेगळेपणा हा त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट होता. (यादी लिहीता लिहीता मी स्नेहांकिताच्या मताशी फारकत घ्यायला लागलेय. आहेत हो मराठीतही मोजके असले तरी चांगले सिनेमे. ) मात्र व्यावसायिकतेशी तडजोड करूनही, नेहमीच्याच गोष्टीत आपल्याला हवं तेच परिणामकारकपणे मांडणं यात हा सिनेमा बाजी मारून जातो. इथे काहीजणांच्या प्रतिक्रियेत राष्ट्रिय पातळीवर दखल घेतले गेलेले म्हणजे चांगले असा सूर दिसतोय. असे कित्येक पुरस्कारप्राप्त, पण न बघवले जाणारे सिनेमे आहेतच. सैराटमध्ये मात्र पात्रांचे स्वभाव फार व्यवस्थितपणे मांडले आहेत. यात आर्चीचा बिनधास्त, बेधडकपणा सुरुवातीच्या विहिरीच्या सीनपासून ते शेवटच्या "माझ्या माहेरची माणसं आहेत, तू नेऊन दे चहा" असं परश्याला सांगेपर्यंत तोच आहे, आणि अर्थात परश्याचंही तसंच. आर्चीची खूप स्तुती होतेय, पण परश्यानेही (आकाश ठोसर) खुप छान काम केलय. त्याचे डोळे फार सुंदर आहेत. ही आपल्या भोवताली घडणारी (थोडी आपलीही) प्रेमकथा वाटते. मी लहानपणातील सुटीचे दिवस वगळता गावी राहिलेले नाही. ज्या गावी राहिले ती तळकोकणातली गावं, त्यात असं वातावरण नव्हतंच. ही भाषाही फारशी परिचयाची नाही. पण ग्रामिण जीवनावर बेतलेल्या चित्रपटातल्या कृत्रिमपणे बोललेल्या ग्रामिण ढंगापेक्षा यातली भाषा रसरशीत आणि जिवंत वाटली. गाणीही आवडली विशेषत: त्याचं चित्रीकरण. मी सिनेमा आवर्जून दुसर्यांदा पहात नाही. पण एकेकांची मतं ऐकून हा आपल्यालाच कसा काय एवढा आवडला अशी शंका आली (आणि अनायसे वेळही मिळाला) म्हणून दुसर्या वेळी पाहिला. तेव्हाही आवडलाच. ज्या जोड्यांमध्ये पुरुष थोडा हळवा असतो आणि स्त्री थोडी बोल्ड त्या जोड्या मला प्रत्यक्षात आणि पडद्यावरही आवडतात तशी ही परश्या- आर्चीची जोडी आवडली. ते स्वभाव सिनेमाभर -परिस्थिती बदलूनही- कायम राहिले म्हणूनही आवडला. छोटे आणि परिणामकारक संवाद. "लसूण सोलता यीना व्हय तुला" सारख्या एकेका वाक्यातून फुलत जाणार्या व्यक्तीरेखा आणि प्रसंग. सुरुवातीच्या भागात स्वप्नाळू वाटणारे परश्याचे डोळे उत्तरार्धात विझू-विझू दिसतात, आईशी बोलताना आर्चीच्या डोळयात पाणी येतं असे कितीतरी प्रसंग सिनेमाचे हायपॉईंट आहेत. मी सिनेमा पाहिला तेव्हा त्यावर एवढी चर्चा होत नव्हती म्हणून शेवट माहिती नव्हता पण त्याने सुन्न केलं. "हे बरोबर नाहीय" ह्याची जाणीव काहीजणांना नक्कीच झाली असेल एवढा प्रभाव हा शेवट पाडून जातो. अवांतर: इथे त्या छोट्या मुलाची रिऍक्शन वैगेरे गोष्टींवर आक्षेप आहेत, त्यांना कट्यार पहाताना "असं रेकॉर्डींग करता येत होतं का? टेकडीवर ग्रामोफोन कसा काय वाजत होता? काजव्यांना मानवी रेंजमधले आवाज ऐकू येतात का? खाँसाहेबाचा स्वभाव नक्की कसा आहे? " इत्यादी प्रश्न पडले होते का? (हे प्रश्न मला सिनेमा बघताना पडत होते आणि असे प्रश्न पडू न देणे यात सिनेमाचं यश असतं. सैराटमध्ये हे प्रश्न मला नाही पडले.). अगदी ’गाभ्रीचा पाऊस’ मध्ये सोनाली कुलकर्णी कोणत्या बाजूने शेतकर्याची आणि ती ही परिस्थितीने गांजलेली बायको वाटत होती?
In reply to हुश्श. सैराटची सगळी परिक्षणं/ by अंतरा आनंद
In reply to चित्रपट हे मनोरंजनाचे साधन by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to मराठी चित्रपट आणि सैराट. by सस्नेह
In reply to मजाच आहे! by शब्दबम्बाळ
In reply to Men to left. by रमेश भिडे
100
सैराटची पायरेटेडे सीडी देवून स्नेहांकिता ताईंचा सत्कारIn reply to सैराट - काही न पटलेले by सप्तरंगी
In reply to सैराट - काही न पटलेले by सप्तरंगी
In reply to सप्तरंगीचा हा प्रतिसाद मला by समीरसूर
In reply to सैराट सैराटच by मित्रहो
In reply to एक दुरुस्ती by समीरसूर
In reply to एक दुरुस्ती by समीरसूर
In reply to सैराट आणी बाहुबली by सिरुसेरि
In reply to सैराट आणी बाहुबली by सिरुसेरि
In reply to सैराट - वेगळेपणाचा अट्टहास by मराठी कथालेखक
परवा पाहिला, पण टाळ्या आणि शिट्ट्यांनी प्रभावित वातावरण टाळून (म्हणजे पायरेटेड कॉपी आणून) पाहिला. आणि म्हणूनच सिनेमाकडे 'फक्त एक सिनेमा' म्हणून पाहात रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला.टेक्निकली, सोशिअली आणि लॉजिकली आणि अजून कसल्यातरी "कली" हा फ़ाऊल आहे! रसग्रहण करायला रसिकता लागते तीच मुळात मिसिंग आहे इथे! आ. न. Sandy
In reply to :) by चांदणे संदीप
In reply to टाळ्या शिट्ट्यांनी भरलेलं by मराठी कथालेखक
टाळ्या शिट्ट्यांनी भरलेलं वातावरण टाळणं म्हणजे रसिकता नसणं ??हे मी कुठ म्हटल जर दाखवता का..... हा शुद्ध आरोप आहे!!! Sandy
In reply to ओ मकासर by चांदणे संदीप
सग्रहण करायला रसिकता लागते तीच मुळात मिसिंग आहे इथे!याचा अर्थ काय मग ?
In reply to सग्रहण करायला रसिकता लागते by मराठी कथालेखक
In reply to तुम्ही लावाल तो अर्थ असल्यावर by चांदणे संदीप
In reply to तुम्ही लावाल तो अर्थ असल्यावर by चांदणे संदीप
चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन बघायचा असतो असा साधा सरळ अर्थ होताहो पण असा अर्थ पहिल्या प्रतिसादात सरळ व्यक्त झाला नाही. बरं असा अर्थ घेवूनही मी हेच म्हणेन की चित्रपट चित्रपटगृहात पाहिला नाही म्हणजे रसिकतेने पाहिला नाही असं म्हणणं योग्य होणार नाही. थिएटरमध्ये चित्रपट बघणे हा एक खास अनुभव असतो आणि चांगल्या चित्रपटासोबत तो खासच आनंददायी असतो हे मी मान्य करतो. पण त्याशिवाय रसग्रहण होवू शकत नाही हे मात्र अमान्य. चित्रपट मन लावून , डोळे आणी कान लावून पाहणे/ऐकणे खूप महत्वाचे. येता-जाता, काम करता करता पाहू नये. मी सैराट नीट बसून दिवे मालवून ३२" टीवी पाहिला. मी तलवार घरीच पाहिला (पायरेटेड) आणि खूप आवडला, मितवा (मराठी) , दगडी चाळ, बदलापूर हे काही अलिकडे घरीच बघितलेले (तेही संगणकाच्या १९" स्क्रीनवर) आणि आवडलेले चित्रपट. पुर्वी काही चित्रपट तर मी मोबाईलच्या ४.५" किंवा टॅबलेटच्या ७" स्क्रीनवर पाहिलेत..काही आवडलेत तर काही नाही बाकी चॅनेलवर आलेले आणि जाहिरातींच्या असंख्य अडथळ्यांसकट बघितलेले अनेक चित्रपटही आवडलेले आहेतच (माझा सर्वात आवडीचा सुंबरान आणि अनेक). माझ्या वयाच्या अनेकांनी शोले ही असाच बघितला असेल. पायरेटेड कॉपी जरी असली तरी मी प्रिंट चांगली (high resolution आणि बाकीही चांगल्या प्रतीची ) असेल तरच बघतो नाहीतर चांगली कॉपी येईपर्यंत वाट बघतो. मी सेन्सर कॉपी डाऊनलोड केली होती पण तीच रिसोल्यूशन खूप कमी होतं म्हणून थांबलो. मग चांगली कॉपी मिळाल्यावर रात्री दिवे मालवून पाहिला. कुणीही गप्पा मारत नव्हते. मला वाटतं चित्रपटाचं रसग्रहण करण्याकरिता इतकं पुरेसं असावं (स्पेशल इफेक्ट्स बाजूला ठेवले तर , निदान कथा, पटकथा , संवाद, अभिनय , चित्रिकरण यांचे रसग्रहण करण्यात अडथळा येत नाही). बाकी सैराट न आवडण्याची मी जी कारण लिहिली आहेत त्यात थिएटर की टीवी यामुळे फारसा फरक पडेल असे वाटत नाही. बाकी चित्रपट बेकार असेल तर थिएटरमध्ये तो बघणे अधिकच त्रासदायक वाटते (उदा: Finding fanny, Fan, Ra-One , अनवट ई काही अलिकडे पाहिलेले).. पटकथा , संवाद यांत दम नसल्याने मला बाहूबली थिएटरमध्ये पाहूनही फारसा नाही आवडला.
तर, मुद्दा हा आहे की रसग्रहण करण्यासाठी पायरेटेड कॉपी आणून पाहणे म्हणजे ...म्हणजे चोरी.. माहीत आहे मला... पुन्हा एकदा दंडवत देण्याचा मोह आवरतो (तुम्ही बुवा उगाच मनाला लावून घेता) .. पण मला खरंच सांगा तुमच्याकडे असलेली , तुमच्या संग्रहातली सगळी गाणी खरंच ओरिजिनल सीडीवरुन घेतली आहेत का तुम्ही ? इंटरनेटवरुन डाऊनलोड केलेली गाणी नाहीतच का ? माझ्यकडे तर सगळिच अशी आहेत आणि जर मी ओरिजिनल सीडी आणून गाणी ऐकावी असं ठरवलं तर मला कित्येक गाणी बाजारात अजिबात मिळणारच नाहीत. अवांतर :एसपी कोण हो ? खरेच माहीत नाही म्हणून विचारत आहे.
In reply to चित्रपट हा चित्रपटगृहात जाऊन by मराठी कथालेखक
अवांतर :एसपी कोण हो ? खरेच माहीत नाही म्हणून विचारत आहे.आता दंडवत देण्याची पाळी माझी :) बाकी इतर सर्व मुद्द्यांवर, धाग्याचा काश्मीर होऊ नये यास्तव थांबतो. मोशीत या... दोस्ती हॉटेलात जाऊ, निवांत...गिरे भेळ खाऊ आणि चर्चा करू! एसपी = एस. पी. बालसुब्रमण्यम! Sandy
In reply to आता दंडवत देण्याची पाळी माझी :) by चांदणे संदीप
In reply to आता दंडवत देण्याची पाळी माझी :) by चांदणे संदीप
In reply to आता दंडवत देण्याची पाळी माझी :) by चांदणे संदीप
In reply to टाळ्या शिट्ट्यांनी भरलेलं by मराठी कथालेखक
In reply to तुम्ही एकदा थिएटरला जाउन पहा by _मनश्री_
In reply to मराठी कथा लेखकांसाठी असलेला by _मनश्री_
In reply to तुम्ही एकदा थिएटरला जाउन पहा by _मनश्री_
In reply to आत्तापर्यंत चार वेळा पाहिला by _मनश्री_
In reply to महाराष्ट्र दुष्काळग्रस्त by रमेश भिडे
In reply to सिनेमा आणि दुष्काळाच काय by _मनश्री_
In reply to मला सैराट चांगला वाटला नाही by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to कट्यार आणि बालगंधर्व by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
फीलॉसॉफरहम्म...
In reply to कट्यार आणि बालगंधर्व by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
In reply to सैराट सामाजिक आहे हा एक गैरसमज by मराठी कथालेखक
In reply to शेवट बघण्यासाठी लोक गर्दी by रमेश भिडे
In reply to सैराट सामाजिक आहे हा एक गैरसमज by मराठी कथालेखक
ओवरहाईप पण ...