... काय म्हणतील!
... काय म्हणतील!
आमच्या बायकोचा हा पेटंट डायलॉग. टिम्बटिम्ब च्या जागी कधी आई (माझी आई, तिची सासू. तिला आई म्हणायची कल्पना तिचीच. कारण आई काय म्हणतील!), कधी शेजारी, कधी भाउजी, कधी मैत्रीण असे सगळे आलटून पालटून हजेरी लावत असतात.
मी काय म्हणेन याचं जर का एक शतांश जरी टेंशन माझ्या बायकोला कधी आलं असतं ना तर शपथ हा लेख/मनोगत/मुक्तक/दर्दभरी कहाणी लिहलीचं नसती. पण तेवढे आमचे ग्रह काय मजबूत नाहीत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा, म्हणजे मी तिच्या रडारवर सहसा नसतो असा मी त्याचा सोयीस्कर अर्थ लावून घेतला आहे.
समजा चुकून तुम्ही रडारवर आलात, तिकडची फ्रीक्वेंसी- इकडची फ्रीक्वेंसी नाही जुळली तर कमीत कमी 2 दिवस आणि जास्तीत जास्त आठवडाभर खड़खडाट ऐकण्याची तुमची तयारी असली पाहिजे. नॉइज कॅनसलेशन साठी मग काही कारण नसताना शॉपिंगला घेऊन जाणे, पैसा नाम शोहरत सब मोहमाया है हे स्वतःला बजावून एखादी सरप्राइज सहल काढणे, त्यात डिनरला बाहेरच थांबणे ( सरप्राईज सहलीला नेल्यावर परत येताना काही नाही रात्री खिचडीच केलीस तरी चालेल असं म्हणणं म्हणजे आतापर्यंत कमावलेल सगळ पुण्य अक्कलखाती जमा करणे) अशी सगळी कसरत करावी लागते. एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं एरवी घरात या भिंतीच त्या भिंतीला ऐकू जाणार नाही ही काळजी घेणाऱ्या बायका नवऱ्याशी भांडताना मात्र कोण काय म्हणेल याच्याशी त्यांना अजिबात घेणंदेणं नसतं.
अशा एखाद्या अनुभवातून गेलेले सगळे नवरे लोक मंदिरात देवापुढे शांत हात जोडून नमस्कार करतात. मनोभावे प्रार्थना करतात तुझं सुरक्षाकवच असंचं बरोबर राहू दे. तिथं जर तुम्ही सुंदर दिसते म्हणून बायकोकडे ( किंवा इतर कुठे) टक लावून बघत बसलात तर तिथल्या तिथे "अहो काय हे मंदिरात आलोय आपण. देव/देवी काय म्हणेल?" असा प्रश्न कम विधान आलंच म्हणून समजा. हा प्रश्न आहे असं चुकूनही समजू नका. आजकाल मी माझ्या बायकोशी बोलताना ती मला प्रश्न विचारत नाही, विधानचं करतीये असं ग्रुहीत धरतो. त्यामुळे माझे बरेच प्रश्न सॉल्व झालेत असं मला वाटतं.
तर या काय म्हणतील अध्यायात बरेचदा लोक काय म्हणतील हे आवर्तन येतं. यात लोक म्हणजे कोण हे मला आजतागायत कळलेले नाही. म्हणजे बघा बायकोला आवडती म्हणून कधी भेळ घेऊन या घरी. त्याचं कौतुक नसतं त्यांना. त्यांना काळजी कुठल्या गाडीवरून आणली, लिफ्टमधुन येताना वरच्या मजल्यावरच्या सोनीनी तर नाही पाहिले, दार उघडताना शेजारनीने तर नाही पाहिले या. बर आता या काय समस्या आहेत का? तुम्हीच सांगा ऑफीसजवळच्या गाडीवरून आणली म्हणाव तर काय म्हणतील ऑफीसमधले लोक. घराजवळच्या गाडीवरून आणली तर काय म्हणतील बिल्डिंगमधले लोक! सोनीसारखी फिगर नाही म्हणून सोनीजवळ रडताना तिन सांगितल म्हणून जंक फुड टाळायचं माझ्या बायकोने केलेलं प्रॉमिस मला कसं माहीत असेल. अशा वेळी तिला मी दिसलो भेळपुरीचं पुडक नाचवताना तर ती टवळीची आपलं ते हे चवळीची शेंग म्हणजे सोनी काय म्हणेल. शेजारीन तर टपलेलीचं असते टोमणे मारायला.
"काय ग लकी आहेस! तुझ्या ह्यांच्या बरं बाई लक्षात रहात असं काहीबाही आणायला. आमचे हे तर कुठं म्हणून वाट वाकडी करत नाहीत."
आता यात टोमना काय आहे? चांगली नवऱ्याची स्तुती ऐकून कॉलर ताठ करायची सोडून ही माझ्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघते आणि शेजारनीची तोंडभर हसून बोळवण करते. च्यामारी पैसे माझे, भेळपुरी माझी, घर माझं, फिगर माझी आपलं ते हे माझ्या बायकोची आणि हे कोण लोक काय म्हणतील म्हणून आम्ही भेळ खायची नाही. शुद्ध अन्याय आहे हा.
या काय म्हणतील अध्यायात अजून एक कष्टदायक प्रकार म्हणजे घरी कुणी येणं. तुम्हाला सांगतो माझी बायको लहान होती अगदी तान्ही तेव्हा रहायची त्या चाळीतल्या एक काकू त्यांच्या मावस भावाच्या मुलाच्या की मुलीच्या दिराच्या लग्नाला जवळच येणार आहेत म्हणल्यावर हिने सरळ घर स्वच्छ केले पाहिजे हा फतवा काढला. बरं आता त्या नक्की घरी येतो असंही काही म्हणाल्या नसताना एवढा त्रागा करून घर आवरायची काय गरज? पण काकू काय म्हणतील असं घर बघून हे पालुपद ऐकवत बायको घरभर फिरते आणि झाडू घेऊन मी मागे मागे. बरं यावर माझ्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना म्हणजे लग्नाच्या दिवशी काकुंचा फोन आला की सांगून टाकायचे जरा काम आलं म्हणून बाहेर आलोय. वेळ होईल थोडा. (तुम्ही निघा हे सबटायटल असतं या संवादाचं). अरे हाय काय नाय काय. बात खतम. पण नाही हा उपाय सुचेपर्यंत बायकोच्या डोक्यात स्वच्छता अभियानाचा किडा भिनलेला असतो त्यामुळे "बरं दिसतं काते" एवढ्या तीन शब्दात माझ्या सुपीक कल्पनेला नापाक केलं जात. काय म्हणतील नंतर बरं दिसतं काते आलं की तुमच्या डोक्यात धोक्याची घंटी वाजलीचं पाहिजे.
माझे कुणी नातेवाईक आले की काय होतं याचं वर्णन मी अजिबात करत बसणार नाही.
तर मुद्दा हा आहे की मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे असं कुठल्याशा पुस्तकात मी वाचलंय. तर अशा या प्राण्याने उठसुठ हा काय म्हणेल तो काय म्हणेल असं विचार करत बसण्यापेक्षा सरळ बस्तान बांधून हिमालयात जावे. त्यातल्या त्यात आजुबाजुला कमी मनुष्यप्राणी असतील अशा ठिकाणी जाऊन रहावे. हे मी माझ्या बायकोला तोंडावर नाही ना सांगू शकत. पण ते महत्वाचं नाही. मनातल्या भावना व्यक्त होणं महत्वाचं आहे. एक विनंती आहे माझ्या बायकोला यातलं काही कळू देऊ नका. अहो उद्या ती माझ्या गळ्यात पडून म्हणाली, "एवढी का मी दुष्ट आहे?" तर ... काय म्हणतील? बरं दिसतं काते?
वाचने
17782
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
लेख चांगला लिहिला आहे. काय
In reply to लेख चांगला लिहिला आहे. काय by कानडाऊ योगेशु
काय हे? खुसखुशीत नाय तर नाय
In reply to काय हे? खुसखुशीत नाय तर नाय by रातराणी
बरं हे घ्या... खिक्क!!!
हाहा
In reply to हाहा by चाणक्य
धन्यवाद! :)
हे हे हे !
In reply to हे हे हे ! by सस्नेह
चला आता मी डोळे मिटायला मोकळी
In reply to चला आता मी डोळे मिटायला मोकळी by रातराणी
एवढ्यात ? :)
In reply to एवढ्यात ? :) by सस्नेह
कायमचे नाय गो. उगी उगी :)
स्फुट आवडले....
In reply to स्फुट आवडले.... by ज्ञानोबाचे पैजार
वसुधैव कुटुम्बकम. त्यामुळे
तुम्हांला हे कसं काय लिहिता
In reply to तुम्हांला हे कसं काय लिहिता by एस
शमतहे! ऎलतीरावरून पैलतीरावरचे
In reply to शमतहे! ऎलतीरावरून पैलतीरावरचे by किसन शिंदे
खिक्क...कुच तो गडबड है
In reply to तुम्हांला हे कसं काय लिहिता by एस
काय नाय दुसरा चष्मा घातला ;)
खुसखुशीत! खिक्क!
आयडीशी विसंगत लिखाण . ;-)
असं आप्ल्याआपल्यातले
सुरुवात वाचून मला वाटलं एखादा
खिक्क असा प्रतिसाद देणाऱ्या
लिहिताना
In reply to लिहिताना by पैसा
आणि बायकोनेच लेख लिहून घेतला
In reply to आणि बायकोनेच लेख लिहून घेतला by टवाळ कार्टा
अर्रर्र
In reply to अर्रर्र by पैसा
डिक्टेट करून लिहून घेतला असेल
In reply to अर्रर्र by पैसा
डिक्टेट हा शब्द आधी डिटेक्ट
In reply to डिक्टेट हा शब्द आधी डिटेक्ट by कानडाऊ योगेशु
=))
In reply to अर्रर्र by पैसा
पैसा तै नी मला रातराणी तै
In reply to पैसा तै नी मला रातराणी तै by रातराणी
हीहीही!
In reply to हीहीही! by पैसा
तेच तर तुमच्या मनातला सौंशय
=))))) छान आहे डिक्टेशन ;)
रातराजातैंनी
In reply to रातराजातैंनी by बोका-ए-आझम
हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार
In reply to हीही हाच डुआयडी घेऊन लिहणार by रातराणी
बरं लिहीलंय,
In reply to बरं लिहीलंय, by नीलमोहर
तुम्ही क्लास घेणार का? ;)
In reply to तुम्ही क्लास घेणार का? ;) by टवाळ कार्टा
आं आं अच्चं नाय कलाचं,
In reply to बरं लिहीलंय, by नीलमोहर
अजून पर्यंत माझा एकही डूआयडी
In reply to अजून पर्यंत माझा एकही डूआयडी by रातराणी
पैज लावायला पाहिजे होती
हा हा हा सहिए
धन्यवाद!
खुसखुशीत!
कहानी
In reply to कहानी by नाखु
फारच कर्णमधुर दाद! :)
खुसखुशीत आणि खिक्क खुप झाल्या
In reply to खुसखुशीत आणि खिक्क खुप झाल्या by राजाभाउ
तुमचे स्पेशल आभार :)
खलास भावनाकथन ! कसली आर्तता
In reply to खलास भावनाकथन ! कसली आर्तता by वेल्लाभट
मला उनक मध्ये घेतल तर मी उनक
In reply to मला उनक मध्ये घेतल तर मी उनक by रातराणी
उनकसंस्थापक सध्ध्या सात्विक
एका गोष्टीच मला आश्चर्य वाटतं
ठीकठाक जमलाय. दुसरा कुणाचा
मस्त जमलाय !!!