मराठी टंकलेखन आणि कीबोर्ड लेआउट
- हा inscript वापरण्याआधी शिकवा लागेल. मला वाटते त्यासाठी स्वतंत्र कळफलक नसल्याने शिकतांना अडचणी येतील. जपानी कळफलक फोनेटिक असून वापरण्यास अत्यंत सोपा आहे. इंग्रजी येत असल्यास बाकी काही शिकण्याची गरज पडत नाही. तसेच notepad, word प्रत्येक ठिकाणी चालतो. तसेच उबुंतूवर सुद्धा marathi फोनेटिक कळफलक उपलब्ध आहे. तर विंडोसवर का नाही. ?
- हा inscript कळफलक कोण कोण वापरत ?
- मराठीत सर्व वापरू शकतील असा unicode कळफळक नाही का ? मी मकरंद गद्रे यांचा कळफलक वापरून बघितला पण तो खूप हळू चालतो. गूगल IME अजून वापरला नाही. तो offline वापरता येईल का ?
- समज मी दुसरा कोणता कळफलक वापरला तरी त्यामुळे encoding problems होऊन data loss होईल का ? तसेच दुसरा कळफलक unicode वापरेल का ? कारण याआधी कृतीदेव font नसल्याने भरपूर मनस्ताप झाल्याचा अनुभव आहे. unicode बद्दल तर शंकाच शंका आहेत.
In reply to मिपावरचे मराठी लेखन by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
"समज मी दुसरा कोणता कळफलक वापरला तरी त्यामुळे encoding problems होऊन data loss होईल का ?युनिकोडचा उद्देशच encoding problems कमी करण्याचा आहे त्यामुळे युनिकोडाचा कोणताही कळफलक वापरला तरी सहसा प्रॉब्लेम यावयास नको. अर्थात आधी ट्रायल एरर करुन खात्री करुन घ्यावी. ३)
...गूगल IME अजून वापरला नाही. तो offline वापरता येईल का ?होय मागेतरी डाऊनलोड करावयाची सोय उपलब्ध होती, सद्यस्थिती विषयी तुम्हाला गूगल शोध घ्यावा लागेल. पण तुम्हाला मिपामुळे सवय असल्यामुळे तुर्तास हा पर्याय अधिक उत्तम वाटतो. २) हा inscript कळफलक कोण कोण वापरत ? मी वापरत नाही मागे मी केलेल्या सर्वे नुसार साधारणतः ४ ते ६ टक्के लोकच इन्स्क्रीप्ट वापरतात. लर्नींग कर्व मोठा असतो सिडॅक्च्या संस्थळावरुन टायपिंग प्रॅक्टीस ट्यूटोरीअल डाऊनलोड करता येते. अधिक वेग मिळण्याचा या मंडळींचा दावा असतो पण कोणत्याही तौलनीक टायपींग स्पर्धातून या दाव्यांची चाचपणी झालेली नसावी आणि लॉजीकवर व्यक्तिशः मला सिद्ध न केलेले दावे साशंकतायुक्त वाटतात. (-मला इनस्क्रीप्टपण जमते पण मी ते सरावात ठेवण्याचे टाळतो) १)
..तसेच उबुंतूवर सुद्धा marathi फोनेटिक कळफलक उपलब्ध आहे. तर विंडोसवर का नाही. ?माझ्या माहिती प्रमाणे विंडोसवरपण उपलब्ध आहे. अर्थात मी स्वतः अद्याप वापरले नसल्यामुळे इतरांकडून माहिती करुन घ्यावी इनक्रीप्ट आणि आयएमई दोन्हीची माहिती देणारे सुशांत देवळेकरांचे युट्यूब बर्यापैकी माहितीपूर्ण आणि उपयूक्त ठरावेत असे वाटते. (चुभूदेघे)
In reply to -सर्वप्रकारच्या by माहितगार
इनक्रीप्ट आणि आयएमईदोन्हीही शालेय अभ्यासक्रमात दहाविच्या वर्गात असावे, शिक्षक आणि मुलांना येण्याबद्दल खात्रीने सांगता येणार नाही पण त्यांच्या आयसीटीच्या पुस्तकातही या विषयावर माहिती मिळावी.
In reply to -सर्वप्रकारच्या by माहितगार
In reply to महाराष्ट्र राज्यसरकार by माहितगार
In reply to -सर्वप्रकारच्या by माहितगार
मी वापरत नाही मागे मी केलेल्या सर्वे नुसार साधारणतः ४ ते ६ टक्के लोकच इन्स्क्रीप्ट वापरतात. लर्नींग कर्व मोठा असतोम्हणूनच फार लोक inscript वापरतील यावर शंका आहे. आणि यामुळेच मी पर्यायाच्या शोधत आहे.
माझ्या माहिती प्रमाणे विंडोसवरपण उपलब्ध आहे. अर्थात मी स्वतः अद्याप वापरले नसल्यामुळे इतरांकडून माहिती करुन घ्यावीमला विंडोस किंवा गुगल किंवा भारत सरकार अशा स्रोतांकडून हवा आहे. त्यामुळे त्यात चुका कमी असतात किंवा नसतात आणि intergration चांगले असते.
In reply to inscript म्हणजे काय? by कंजूस
त्यामुळे युनिकोडाचा कोणताही कळफलक वापरला तरी सहसा प्रॉब्लेम यावयास नको.postgresql मधे गुगल कीबोर्ड मधून भरलेला देवनागरी युनिकोड डाटा व बराहा डायरेक्ट मधून भरलेला देवनागरी युनिकोड डाटा दिसायला सारखा दिसतो पण इन्डेक्सिंग करून सर्च करताना वेगवेगळी उत्तरे येतात. त्यामुळे कोणती तरी एकच पध्दत वापरा असे गिर्हाइकाला स्पष्टपणे सांगायला लागते.
हा inscript कळफलक कोण कोण वापरत ?
- मी वापरते
हा inscript वापरण्याआधी शिकवा लागेल.
- पहिल्यांदा वर्डमध्ये सगळी अक्षरं साधी आणि शिफ्ट की वापरून टाईप करून घेतली. एक दोन दिवसांत हात बसला. तुम्ही किती नियमित मराठी टंकलेखन करता त्यावर हात बसण्याचा वेग अवलंबून आहे.
- मिपावर इन्स्क्रिप्ट वापरून लिहिते. काही अडचण येत नाही.
In reply to हा inscript कळफलक कोण कोण by आतिवास
हा inscript कळफलक कोण कोण वापरत ?मीही वापरतो. मला व्यवसायात श्री लिपी आणि आयेसेम वापरावे लागते. श्रीलिपिसाठी डीओई हा जवळपास इन्स्क्रीप्ट लेआउट मी शिकलेलो होतो त्यामुळे लगेच जमला. माझ्या ऑफीसातली ऑपरेटर मुले ३ दिवसात फक्त एका कीबोर्ड लेआउटाच्या प्रिंटवरुन जोडाक्षरेसहीत इन्स्क्रीप्ट वापरायला शिकली. मराठी टायपिंगमधल्या जवळपास सार्या शक्यता इन्स्क्रीप्ट मध्ये शक्य होतात.
In reply to inscript कळफलकाचा उपयोग by शाम भागवत
In reply to मतांतरासाठी क्षमस्व by माहितगार
In reply to प्रत्यक्ष स्पर्धा हाच सिद्ध करण्याचा सर्वोत्कृष्ट उपाय असावा. by शाम भागवत
In reply to :) by माहितगार
हा कळफलक गोदरेज कीबोर्डला पर्याय म्हणून आलेला आहे. जे टंकलेखक आहेत त्यांचेसाठी हा उपयुक्त आहे. जलद टंकन करायला हा उपयुक्त आहे. मात्र त्यासाठी मुद्दामहून प्रॅक्टिस करायला लागते. एकदा जमायला लागल्यावर कळफलक लक्षात ठेवण्यासाठी डोक्याचा वापर कमी कमी होत जाऊन वेग वाढू शकतो. शेवटी निव्वळ प्रतिक्षिप्त क्रियेवर टंकन जमायला लागते.माझ्या पोस्टमधील ठळक केलेल्या वाक्यांचा संदर्भ सोडून माझी पोस्ट वाचल्यास तुम्ही काढलेले निष्कर्ष बरोबर येत आहेत.
In reply to थोडी सुधारणा करतो. by शाम भागवत
In reply to हम्म.. आपल्या पहिल्या दोन by माहितगार
In reply to तुम्ही गमभन वापरा किंवा किरण by पाषाणभेद
In reply to किरण पुर्वीतरी युनिकोडात by माहितगार
In reply to किरण फॉन्ट युनिकोडमध्ये by पाषाणभेद
In reply to मराठी by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
दोन प्रतिप्रश्न