एकट्याने रात हि पेलावी कशी
एकट्याने रात हि पेलावी कशी
चांदण्याची बरसात झेलावी कशी
भारलेला अंधार रातराणीच्या गंधाने
मंतरले मन एका विदेही स्पर्शाने
क्षणांची माया हि तोडावी कशी
एकट्याने रात हि पेलावी कशी
चांदण्याची बरसात झेलावी कशी
लागता लागेना काळजाचा ठाव
दूर दूर कुठेतरी सखयाचा गाव
धुक्यातली वाट हि चालावी कशी
एकट्याने रात हि पेलावी कशी
चांदण्याची बरसात झेलावी कशी
उधाणली स्वप्ने भावनांना पूर
दिसेना काठ कुठे डचमळे ऊर
हृदयाची नाव पार लागावी कशी
एकट्याने रात हि पेलावी कशी
चांदण्याची बरसात झेलावी कशी
वाचने
3450
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
प्रतिक्रिया
कविता आवडली.
आपला हात जगन्नाथ म्हणावे आणि पेलावी बिनधास्त :)
In reply to आपला हात जगन्नाथ म्हणावे आणि by मराठी कथालेखक
:):)
In reply to आपला हात जगन्नाथ म्हणावे आणि by मराठी कथालेखक
हाहाहा..
In reply to आपला हात जगन्नाथ म्हणावे आणि by मराठी कथालेखक
आवरा :)
आवडली!
Sandy
धन्यवाद, एस आणि संदीप !
:))
In reply to पेलणे ह्या शब्दाचा वाक्यात उपयोग बघुन ड्वॉळे पाणावले :)) by ईश्वरसर्वसाक्षी
बाकी 'पेलावी' हा शब्दप्रयोग फारच तीव्र कुचंबणा दाखवतोय... ;)
In reply to बाकी 'पेलावी' हा शब्दप्रयोग by विजय पुरोहित
हा शब्द वापरावा कि नाही हा प्रश्न मलापण पडला होता. अजूनही बदलायचा विचार करतो आहे.
In reply to पेलणे ह्या शब्दाचा वाक्यात उपयोग बघुन ड्वॉळे पाणावले :)) by ईश्वरसर्वसाक्षी
हाहाहा
कविता चांगली आहे पण प्रत्येक कडव्यामागेः
एकट्याने रात हि पेलावी कशी
चांदण्याची बरसात झेलावी कशी
याऐवजीः
एकट्याने रात हि पेलावी कशी
एवढाच भाग सुटसुटीत वाटतोय असे मला तरी वाटते.
In reply to कविता चांगली आहे पण प्रत्येक by विजय पुरोहित
मान्य
कविता आवडली
भन्नाट.
आवडली!
मंतरले मन एका विदेही स्पर्शानेएकटा आहे आणि हा दुसरा देह स्पर्श कुठुन आला?
In reply to भन्नाट. by कानडाऊ योगेशु
अहो विदेही म्हटलंय की त्यांनी...
म्हणजे कल्पनेत प्रेमालाप चालू आहे. समजून घ्या की राव! तुम्हाला नं सगळं physicalच लागतं!!!
In reply to भन्नाट. by कानडाऊ योगेशु
विदेही = non physical!
रात्री झोपेची गोळी घेउन टाकायची, रात्र कशी सरेल पत्ताच लागणार नाही.
In reply to रात्री झोपेची गोळी घेउन by कविता१९७८
चांदण्याची बरसात मिस करायची नाही ना पण ! प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
कविता आवडली.
>>>>दूर दूर कुठेतरी सखयाचा गाव
कविता कोण म्हणतंय नक्की? एकटा की एकटी की एकट्या चे इंटरेस्ट वेगळे आहेत? सखयाचा गाव म्हणजे सखीचा गाव नाही????? काय चाललंय काय नक्की?
In reply to >>>>दूर दूर कुठेतरी सखयाचा by वैभव जाधव
कविता सूफी आहे. 'तो' जो सर्वांचा सखा आहे त्याच्याबद्दल आहे…
सर्वांना धन्यवाद !
कविता आवडली.