मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकट्याने रात हि पेलावी कशी

पथिक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी भारलेला अंधार रातराणीच्या गंधाने मंतरले मन एका विदेही स्पर्शाने क्षणांची माया हि तोडावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी लागता लागेना काळजाचा ठाव दूर दूर कुठेतरी सखयाचा गाव धुक्यातली वाट हि चालावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी उधाणली स्वप्ने भावनांना पूर दिसेना काठ कुठे डचमळे ऊर हृदयाची नाव पार लागावी कशी एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी

वाचने 3450 वाचनखूण प्रतिक्रिया 23

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

विजय पुरोहित Wed, 05/04/2016 - 20:15
बाकी 'पेलावी' हा शब्दप्रयोग फारच तीव्र कुचंबणा दाखवतोय... ;)

विजय पुरोहित Wed, 05/04/2016 - 19:28
कविता चांगली आहे पण प्रत्येक कडव्यामागेः एकट्याने रात हि पेलावी कशी चांदण्याची बरसात झेलावी कशी याऐवजीः एकट्याने रात हि पेलावी कशी एवढाच भाग सुटसुटीत वाटतोय असे मला तरी वाटते.

कानडाऊ योगेशु Wed, 05/04/2016 - 21:27
भन्नाट. आवडली!
मंतरले मन एका विदेही स्पर्शाने
एकटा आहे आणि हा दुसरा देह स्पर्श कुठुन आला?

In reply to by कानडाऊ योगेशु

विजय पुरोहित Wed, 05/04/2016 - 21:29
अहो विदेही म्हटलंय की त्यांनी... म्हणजे कल्पनेत प्रेमालाप चालू आहे. समजून घ्या की राव! तुम्हाला नं सगळं physicalच लागतं!!!

वैभव जाधव गुरुवार, 05/05/2016 - 10:17
>>>>दूर दूर कुठेतरी सखयाचा गाव कविता कोण म्हणतंय नक्की? एकटा की एकटी की एकट्या चे इंटरेस्ट वेगळे आहेत? सखयाचा गाव म्हणजे सखीचा गाव नाही????? काय चाललंय काय नक्की?