ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
===================================================================
ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! :
०१ : प्लोव्हरची महाभरारी... ०२ : महाभरार्यांबद्दल थोडेसे...
०३ : प्रवासी पक्षांची दिशादर्शक प्रणाली... ०४ : डोळे हे चुंबकीय गडे !...
०५ : बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात... ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
===================================================================
जोपर्यंत पक्षांचे डोळे त्यांचे गुपित आपल्यासमोर उघड करत नाहीत, तोपर्यंत हे खालचे गीत गाणे-ऐकणे इतकेच आपल्या हातात आहे ! :) ...
https://www.youtube.com/embed/yHxi1VtjyoE (यु ट्यूबवरून साभार)
"बगळ्यांची माळ" उर्फ अॅरो / व्ही फॉर्मेशन
अनेक प्रकारचे पक्षी आपल्या उड्डाणांसाठी अनेक तंत्रे वापरतात. जमिनीलगत तुलनेने कमी उंचीवरून, कमी अंतर उडत एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी थांबत थांबत जाणार्या पक्षांच्या आणि हजारो किमीच्या भरार्या मारणार्या प्रवासी पक्षांच्या उड्डाणाच्या गरजांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो हे सांगायला नकोच. अर्थातच त्या गरजांप्रमाणे, अनेक हजार किंवा लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत, दर पक्षीप्रजातीत तिच्या जीवनपद्धतीला उपयोगी उड्डाणाची एक किंवा अनेक पद्धती विकसित झालेल्या आहेत. पक्षांच्या भरारीच्या गरजेप्रमाणे त्यांच्या उड्डाणांच्या तंत्रातही अनेक फरक असतात. एकाच जागी वस्ती करणार्या आणि कमी अंतर थांबत थांबत ऊडणार्या स्थानिक पक्षांच्या उडण्यामागे मूळ हेतू अन्न शोधणे हाच असतो. अन्न राहण्याच्या जागेजवळ असल्याने त्यांना थोड्या वेळात अनेक दिवसांच्या अन्नाची बेगमी शरीरात भरून घेणे आवश्यक नसते. बरेच स्थानिक पक्षी छोटे-मोठे थवे करून उडतात. या एकत्रित उडण्यामागे इतर काही कारण असले/नसले तरी "थव्याच्या आकारामुळे शिकारी पक्षांपासून मिळणारी सुरक्षा किंवा एकीचे बळ" हेच मुख्य कारण असते. त्यांच्या थव्यांत एकत्रित उडण्यापलीकडे काही खास आकृतिबंध सहसा दिसत नाही. प्रवासी पक्षी मोठे थवे बनवून मार्गक्रमण करतात. त्यामागे थव्यामुळे मिळणारी सुरक्षा हे कारण आहेच. परंतु त्यांच्या महाभरार्यांसाठी ऊर्जेचे नियोजन हा मुद्दा कळीचा असतो आणि त्यासाठी प्रवासी पक्षांमध्ये अनेक उपयोगी जीवनपद्धती व शारीरिक बदल उत्क्रांत झाल्याचे आपण मागच्या भागांत पाहिले आहे. कितीही बलवान असला तरी एकांड्या पक्षाने हजारो किलोमीटरचे अंतर एकट्याने उडून जाणे केवळ अशक्यच आहे. त्यामुळेच प्रवासी पक्षी मोठमोठ्या थव्यांनी उडताना दिसतात. पण, शेकडो-हजारो किलोमीटर्सचे अंतर एका भरारीत उडून जाण्यासाठी केवळ बाह्यधोक्यांपासून सुरक्षा पुरेशी नसते. अर्थातच, त्यांच्यात संघाच्या एकत्रित ताकदीचा फायदा घेणारी (सहकारी तत्त्वावर चालणारी) अजून काही खास तंत्रे विकसित झालेली आहे. त्यापैकी एक अत्यंत आकर्षक तंत्र म्हणजे बाणाचे टोक किंवा व्ही आकृतिबंध (Arrow or V formation) उर्फ "बगळ्यांची माळ". हे तंत्र वापरून उडणार्या पक्षांचे दृश्य इतके मनोहर दिसते की जगभरच्या गद्य साहित्यात आणि विशेषतः काव्यात त्याचा अनेकदा उल्लेख केला गेला आहे ! याचे मराठीतले एक प्रसिद्ध उदाहरण खालच्या गाण्यात आहे...(गायक - वसंतराव देशपांडे; गीत - वा रा कांत; संगीत - श्रीनिवास खळे. यूट्यूबवरून साभार)
लेखक व वाचक मंडळी या आकर्षक दृश्याच्या वर्णनावरच खूश होत असले तरी शास्त्रज्ञ तितक्यावरच समाधानी नव्हते. त्यांना "हे पक्षी असे आकार करून का उडतात ?" हा प्रश्न पडला होता. आणि त्याचे "त्या आकारामुळे मानवाला एक सुंदर दृश्य दिसते" हे उत्तर नक्की नाही हे स्पष्ट होते ! बगळ्याच्या माळेचे फायदे प्रवासी पक्षी असो अथवा विमान, त्यांच्या भरारीत ऊर्जा नियोजनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते, हे सांगायला नकोच. दोघांनाही उडताना हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहांची जितकी जास्त मदत मिळेल तेवढी ऊर्जेची बचत होईल, हे सांगायला नकोच. महाभरार्या घेणार्या पक्षांसाठी ऊर्जा नियोजनाचे महत्त्व इतके आहे की त्याचा प्रभाव प्रवासी पक्षांच्या केवळ वैयक्तिक उत्क्रांतीवरच नव्हे तर त्यांच्या प्रजातीच्या सामुदायिक (थव्याच्या जीवनप्रणालीच्या) उत्क्रांतीवरही दिसून येतो. उड्डाणात होणार्या पक्षाच्या पंखांच्या वरखाली हालचालीमुळे त्यांच्याभोवती हवेचे भोवरे निर्माण होतात. पंखांनी खाली ढकललेल्या हवेचा पंखांच्या तडक मागे एक प्रबळ अधोगामी (खाली जाणारा, downwash) प्रवाह निर्माण होतो. या प्रवाहात उडणार्या (मागच्या) पक्षाला तो प्रवाह त्याला खाली ढकलून त्याचे उडणे कठीण करतो. अर्थात, उडणार्या पक्षाच्या तडक मागे उडणे चांगले नाही. याविरुद्ध, उडणार्या पक्षाच्या दाबल्या जाण्यार्या पंखांच्या टोकाजवळून ऊर्ध्वगामी (वर जाणार्या हवेचा, upwash) प्रवाह तयार होतो. या प्रवाहात उडणार्या (मागच्या) पक्षाला अर्थातच मोफतची मदत मिळून त्याच्या ऊर्जेची बचत होते. अर्थात, उडणार्या पक्षाच्या पंखाच्या टोकांमागे उडणे फायद्याचे आहे.
पक्षांच्या माळेमागील वायुगतियामिक (aerodynamics)
बगळ्यांची माळ
अॅरो फॉर्मेशनमधे ऊडाण्यार्या विमानांच्या पार्श्वभूमीवर उडणार्या एकांड्या सीगलचे टिपलेले एक छायाचित्र
विविध प्रकारच्या अॅरो फॉर्मेशन्समधे ऊडणारी विमाने
नॉर्दर्न बाल्ड इबिस
लेखमालेतील सर्व फोटो लेखाखाली दिलेल्या यादीत उर्धृत केलेल्या जालावरील संदर्भलेखांतून किंवा इतर जलस्रोतावरून घेतलेले आहेत.
===================================================================
वाचने
9269
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
रोचक! माळफुलांमागील वैज्ञानिक सत्य उलगडून दाखवणारा लेख आवडला. पुभाप्र हेवेसांनल.
भन्नाट माहिती.
पक्ष्यांचे व्ही फॉर्मेशन केवळ प्रवासी पक्ष्यांच्याच नाही तर आपल्या अगदी नेहमीच्या जवळच्या पक्ष्यांतही दिसते.
चिंचवडच्या टेल्को मध्ये वटवाघळांची खूप मोठी वसाहत आहे. अक्षरशः हजारो भलीमोठी वाघळं आहेत. संध्याकाळी ६ च्या नंतर चिंचवडच्या आकाशात नजर टाकली तर कुणालाही ही हजारो वटवाघळं बाहेर पडून व्ही आकारात उडताना दिसतात.
In reply to भन्नाट माहिती. by प्रचेतस
धन्यवाद !
दीर्घपल्ल्याच्या उड्डाणांमध्ये, या फॉर्मेशनमध्ये होणारी "उर्जेची बचत" व "थव्यातील पक्षांनी ते करताना एकमेकाला केलेले सहकार्य" हे कळीचे मुद्दे असतात. याशिवाय, समुद्रावरच्या दीर्घसफरी करण्याच्या वेळेस ते जीवन-मरणाचे मुद्दे होऊ शकतात.
मोठ्या आकाराचे काही स्थानिक पक्षीही व्ही फॉर्मेशनने ऊडतात हे खरे आहे. उर्जा वाचवणे किंवा आळस करणे किंवा दुसर्याच्या श्रमाचा फायदा लुटणे ही काही मानवाची मक्तेदारी नाही ! हे प्राण्यांच्या (यात मानवसुद्धा आलाच) "दुधारी" हुशारीचेच लक्षण आहे ;) =))
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
अगदी अगदी =))
प्रत्येक भाग वाचनीय.
प्राणी-पक्षी ह्यांच्याविषयी वाचले की एकच समजते....."मानव हा पृथ्वीवरील सगळ्यात उपद्रवी जीव आहे."
In reply to दंडवत.... by मुक्त विहारि
मस्त
"मानव हा पृथ्वीवरील सगळ्यात उपद्रवी+लोभी जीव आहे."
सुंदर माहितीचा खजाना
In reply to सुंदर माहितीचा खजाना by जगप्रवासी
+१
पु. भा. प्र.
सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !
In reply to सर्व वाचकांसाठी आणि by डॉ सुहास म्हात्रे
पण काका लेख वाचून तर द्या सगळ्यांना आधीचा काय धन्यावादाची घाई करताय?
व्ही शेप प्रेमी
पैजारबुवा,
निसर्गाची अद्भुत किमया!!!
छान माहिती. धन्यवाद
तुमचा प्रत्येक लेख वाचनीयच असतो! खूप नवीन माहिती आणि अतिशय रोचक. त्यातून या वेळेस वाचता वाचता सुरेल पार्श्वसंगीताची देखील तुम्ही व्यवस्था केलीत!
पुढच्या लेखांच्या प्रतीक्षेत!
नाखु - तुमच्या प्रतिसादात एक दुरुस्ती करू का?
मानव हा पृथ्वीवरील एकमेव उपद्रवी+लोभी जीव आहे.
फारच मस्तं. पु.भा.प्र.
खूपच माहितीपूर्ण!
जबरदस्त लेखमाला
इतकी रंजक माहिती आहे ही......
अनेक गोष्टी माहिती नव्हत्या यातल्या. एरोडायनॅमिक्स वगैरे तर क्लासच.
धन्यवाद म्हत्रेकाका!
खूपच आवडली ही माहिती. तसे तुमचे सर्वच लिखाण आवडते.
वाचनखूण साठवण्याकडे आपोआपच हात गेला.
Sandy
वेगळाच धम्माल विषय. सर्व लेख आत्ताच वाचले.
एक प्रश्न आहे. पचनसंस्थेच्या घटलेल्या वजनाचे रूपांतर ऊर्जेत होते का? किंवा पचनसंस्थेचा काही भाग इंधनाचे कार्य करतो का?
एका अफलातून लेखमालेबद्दल धन्यवाद.
पुभाप्र.
In reply to व्व्वा ....... by सुधीर कांदळकर
धन्यवाद !
पचनसंस्था आकसू लागली की त्यापासून मिळणारी उर्जा अर्थातच वापरली जाते हे नक्की. ती साठवून मग उड्डाणाला वापरली जाते की सुरुवातीच्या उड्डाणासाठी तडक खर्च केली जाते याबद्दल माझ्या वाचनात काही आले नाही.
मात्र, त्या पचनसंस्थेच्या आकसण्यामुळे पक्षाच्या कमी झालेल्या दोन-पाच ग्रॅम वजनामुळे महाभरार्यांसाठी लागणार्या उर्जेमधे बचत होते हे नक्की.
धन्यवाद.
रोचक! माळफुलांमागील वैज्ञानिक