मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास २

कानडाऊ योगेशु · · जे न देखे रवी...
.. .. रात्रीच्या रेल्वे प्रवासात नेहेमीसारखेच तु लोअर बर्थवर व मी मिडल बर्थवर पडतो.. झोपायच्या आधी मी पुन्हा समोरच्या साईडबर्थवर पहुडलेले सुंदर प्रकरण किलकिल्या डोळ्यांनी बोगीच्या सरकारी मंद प्रकाशात.. न्याहाळण्याचा प्रयत्न करत असतो.. थोडा वेळ जातो आणि अचानक कबरीतुन एखादा खूनी हात वर यावा तसा... (आभार रामसे बंधु) तुझा हात येतो.. अन पाठोपाठ तुझा आवाज... ..अहो... झोपलात का? ...नाही? ...हात द्या हातात...! हे नेहेमीचेच असते! मी ही हातात हात देतो.. माझ्या बोटांशी लडिवाळपणे तू खेळत राहतेस.. थोडा वेळ जातो अन समजते.. मी तुझ्या प्रत्येक बोटांचे हलकेच चुंबन घेतो... मग तू हात खाली घेत म्हणतेस.. झोपा आता निवांत..आंणि सांभाळून.. नाहीतर खाली पडाल..! समोरचे सुंदर प्रकरण किंचित हसल्यासारखे वाटते..... बर्रर्रर्र ..माझ्या फोनवर मेसेज येतो.. ..ती झोपली...आता झोपा तुम्हीसुध्दा...! तेव्हाच इंजिनची शिटी वाजते... अन रेल्वेच्या खडखडात मला गडगडाटाचा भास होतो.. मला तिथे तेव्हा तू खरोखरच एखाद्या पल्लेदार प्रवासासारखी खूप खूप आवडतेस....! - कानडाऊ योगेशु (टू बी कंटीन्युड....) तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास १!

वाचने 3332 वाचनखूण प्रतिक्रिया 16

नाखु Wed, 04/27/2016 - 13:03
आता आगीन गाडीत पण ? तरी अजून बोट-बैलगाडी-चारचाकी-रिक्षा-दुचाकी-सायकल राहिले आहेत. याची नोंद घेणे. स्वगतः जबरा लिहितोय हा योग्या.

झेन Wed, 04/27/2016 - 17:25
मन वढाय वढाय उभया पिकाताल ढोर किती हाकल हाकलं फ़िरि येत पिकाव असं बाहिणाबाईंनी नेमक्या शब्दात सांगितल आहे.ते प्लेन, ट्रेन आणि बोट मधे पण लागू आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु गुरुवार, 04/28/2016 - 11:36
-दिलीप बिरुटे (सहप्रवासी)
आज मला "जिस स्कूल मे तुम पढते हो उस स्कूल के हम हेडमास्टर है!" हा डायलॉग खर्या अर्थाने समजला. ;)