सु.शिं.चे मानसपुत्र
येत्या काही आठवड्यात मी तुम्हाला सु.शिं.च्या मानसपुत्रांच्या काही खास गोष्टी सांगेन.
२ मानसपुत्रांच्या जन्मकथा, आणि ४ मानसपुत्रांची वैशिष्ठ्ये. ( अर्थात सु.शिं.नीच लिहिलेली)
आणि ब्लॅक किंगच्या गॅंगबद्दल पण (माझ्या आवडत्या मंदार कथा)
हे सर्व सु.शिं.नी आधीच सांगितले आहे. मी फक्त तुमच्या आठवणींवरून धूळ झटकायचा प्रयत्न करणार आहे. यात तुमचाही सहभाग अपेक्षीत आहे.
चला तर मग- आजची सुरूवात ’दारा बुलंद’ पासून-
कादंबरीतील नायक दारा ’बुलंद’ हे व्यक्तिमत्त्व वास्तव मुळीच नाही; आणि या नायकाकडून तसं असण्याची अपेक्षाही नाही-! कारण, ’असा माणूस अस्तित्त्वात असतो का?’ यापेक्षा माणूस कसा असावा याचा तो थोडासा अतिरेकी आदर्श आहे.
सत्य, न्याय, चांगुलपणा, शौर्य, बुद्धी, रंग-रूप... असा सर्व सद्गुणांचं उत्कृष्ट प्रतिक म्हणजेच- या कादंबरीतील नायक- दारा ’बुलंद’ -होय-!
जगांत थोड्या थोड्या प्रमाणात का होईना, जे सद्गुण निरनिराळ्या व्यक्तींमध्ये प्रत्ययास येतात, ज्या आदर्शामुळे आजही जगरहाटीचा समतोल साधला जातो,
तेच या प्रतिकात्मक नायकात अभिप्रेत धरले आहेत, इतकेच-!
-लेखक
(सन्नाटा- एकत्रित प्रथमावृत्तीमधून)
दारा बुलंद याची शरीरयष्टी हॉलीवूड नट स्टीव रीव्हज् यावरून बेतली आहे.
गोरा-पान चेहरा, पिंगट-घारे डोळे, सोनेरी केस, रूंद ’व्ही’ शेपमधील बॉडी... ही त्याची रूपवैशिष्ठये,
तगडे शरीर, चपळ हालचाली, शब्दवेधी, कुठल्याही प्रकारच्या लढाईला तयार असणारा, अगदी ’फ्री स्टाईल कुस्ती’ देखील... जैसलमेरच्या दरवेश्याकडून शिकलेल्या माकडाच्या करामती, ज्यात त्याच्या सुप्रसिद्ध ’माकड उड्या’ आहेत. सर्व तरूणींना आपला भाऊ आणि सर्व आयांना आणि बुजुर्ग व्यक्तींना आपला मुलगा असावा तर - दारा सारखा, इतका आदर्शवत तरूण. आपल्या जवानीत चंबळेचे खोरे आपल्या पराक्रमाने हादरवून टाकणार्या रिटायर्ड इन्स्पेक्टर ’हिंमत’चाचा बुलंद यांचा त्यांच्या मुशीतून कोरलेला हा अवघ्या २२-२५ वयाचा कोवळा मुलगा!
आणि त्याची गॅंग
मधुर- थोडासा बायकी दिसणारा, टोळीचा मेंदू म्हणलात तरी चालेल.
शीतल- गँगमध्ये थोडासा धाकटा, पण दाराचे वाक्य न् वाक्य मानणारा
बादल- टोळीचे काळीज, (माझा स्वत:चा सॉफ्ट कॉर्नर आहे बादलसाठी) दाराला देखील उचलून फेकू शकेल असा, दाराला तोडीस तोड, मानी, शूर, मिस्कील असा बाद्ल- (सु.शि. वाचकांच्या माहितीसाठी- दारा कथेत दोन बादल आहेत. शोधा पाहू त्या कथा. माहित असणार्यांसाठी नाहिये हा प्रश्न)
सलोनी- दाराची एकुलती एक बहीण, शूर, स्वाभिमानी, वेळप्रसंगी शत्रूची ४ हात करू शकेल अशी राजपूत तरूणी, तिचा मधुर हा वीक-पॉंईंट
तर सांगा कसा वाटला आजचा हा परिचयाचा कार्यक्रम?


वाचने
17207
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
मस्त! जरा मोठा भाग टाका मात्र
In reply to मस्त! जरा मोठा भाग टाका मात्र by DEADPOOL
नक्की.
मस्त!!!
नेमके त्याच कथेचं नाव आठवत
In reply to नेमके त्याच कथेचं नाव आठवत by प्रचेतस
कथेची नावे पुढील भागात देईन मी.
वाह!
बाकी ओळख छान . फक्त
सर्व तरूणींना आपला भाऊ आणि
In reply to सर्व तरूणींना आपला भाऊ आणि by भाऊंचे भाऊ
ब्लाईंड स्पॉट
In reply to ब्लाईंड स्पॉट by अजिंक्य विश्वास
ठीक आहे भारत हां एक मुक्त देश आहे
In reply to ठीक आहे भारत हां एक मुक्त देश आहे by भाऊंचे भाऊ
ह्यात मी सु.शि. महान ठरवायचा अजिबात प्रयत्न करत नाही.
In reply to ह्यात मी सु.शि. महान ठरवायचा अजिबात प्रयत्न करत नाही. by अजिंक्य विश्वास
आंधळि भक्ती म्हणतात ती हिच
In reply to आंधळि भक्ती म्हणतात ती हिच by भाऊंचे भाऊ
वास्तव
In reply to वास्तव by अजिंक्य विश्वास
जे वर लिहलय
In reply to जे वर लिहलय by भाऊंचे भाऊ
तरी पण सांगा तर खर
In reply to तरी पण सांगा तर खर by महासंग्राम
अमर विश्वास
In reply to अमर विश्वास by भाऊंचे भाऊ
ते तर सु.शि. पण कबूल करतात की राव.
In reply to ते तर सु.शि. पण कबूल करतात की राव. by महासंग्राम
एखादे पात्र एखाद्या परदेशी
In reply to एखादे पात्र एखाद्या परदेशी by भाऊंचे भाऊ
खिक्क.
In reply to खिक्क. by प्रचेतस
खिक्क. खिक्क. खिक्क.
In reply to एखादे पात्र एखाद्या परदेशी by भाऊंचे भाऊ
सिरसली
In reply to सिरसली by भाऊंचे भाऊ
गॉलम गॉलम...
In reply to गॉलम गॉलम... by प्रचेतस
वन ट्रोल एट अ टाईम
In reply to वन ट्रोल एट अ टाईम by भाऊंचे भाऊ
नाही, आपला वाद आपणाशीच चालला
In reply to नाही, आपला वाद आपणाशीच चालला by प्रचेतस
नाही हो मिपाने अपडेट करायची सोय दिली नसल्याने
In reply to नाही हो मिपाने अपडेट करायची सोय दिली नसल्याने by भाऊंचे भाऊ
हे असंय ब्वा तुमचं,एकतर
In reply to हे असंय ब्वा तुमचं,एकतर by प्रचेतस
सुशिं चे चाहते असंणे म्हणजे
In reply to सुशिं चे चाहते असंणे म्हणजे by भाऊंचे भाऊ
आधी तुम्ही फॅन फिक्शन कन्सेप्ट आधी डोक्यात फिक्स करून घ्या बुवा
In reply to आधी तुम्ही फॅन फिक्शन कन्सेप्ट आधी डोक्यात फिक्स करून घ्या बुवा by अजिंक्य विश्वास
आम्ही हिमेश रेशामिया टाकावु हीरो म्हणतच नाही
In reply to आम्ही हिमेश रेशामिया टाकावु हीरो म्हणतच नाही by भाऊंचे भाऊ
हा हा हा.
In reply to हा हा हा. by अजिंक्य विश्वास
ते टाकावु लिहित नाहित हो
In reply to सिरसली by भाऊंचे भाऊ
मिपाचा दर्जा
In reply to मिपाचा दर्जा by महासंग्राम
मी काय करावे काय नाही
In reply to मी काय करावे काय नाही by भाऊंचे भाऊ
सुरवात कोणी केली ते पहा
In reply to ब्लाईंड स्पॉट by अजिंक्य विश्वास
बाकीच्यांचं मरू दे हो.
In reply to बाकीच्यांचं मरू दे हो. by बोका-ए-आझम
मी सुध्दा अजून पूर्ण माहिती मिळवत आहे.
मंदार आणि रमी :)
आवडते लेखक
In reply to आवडते लेखक by जगप्रवासी
इन्स्पेक्टर मंदार नसून
In reply to इन्स्पेक्टर मंदार नसून by प्रचेतस
माफ करा
In reply to इन्स्पेक्टर मंदार नसून by प्रचेतस
सुशि काळाच्या पुढचे लेखक होते
मस्त रे अजिंक्या. (हायला माई
In reply to मस्त रे अजिंक्या. (हायला माई by अभ्या..
फेअरडील, डॉज, पोंटेक,
In reply to फेअरडील, डॉज, पोंटेक, by प्रचेतस
डॅमलिन
डॅमलर*
दारा बुलंद आणि सनी बुलंदच्या
सनी पटेल
In reply to सनी पटेल by सिरुसेरि
सनी पटेलच तो.
वा अजिंक्य,वेगळ्या आणि
Sushinchi pankhi :)
Lage raho Ajinkya...
कमिशनर मामा राहिले की
मंदारचे
आणि तो प्रिन्स नि त्याच्या
...