मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नजरानजर अचानक

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
समजावले मनाला माझ्या कितीतरी मी हे पाहणे तुजकडे नाही बरे रे नेहमी.. का ऐकते न मन हे सांगीतले जरी मी वळुनी पुन्हापुन्हा का बघते तुलाच नेहमी.. गर्दी बघून तिकडे रुसतो मनी इथे मी एकांत पाहुनीया हसतो खुषीत नेहमी.. नजरानजर अचानक होतोच बावरा मी त्रेधा उडे कशी मग अवघड स्थितीत नेहमी.. .

वाचने 2835 वाचनखूण प्रतिक्रिया 12

विदेश Mon, 03/21/2016 - 07:20
आत्मबंध , भरत_पलुसकर , अभ्या.. , रातराणी .... प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

विदेश Tue, 03/22/2016 - 06:01
विवेकपटाईत - नंतरच्या दोन ओळीत उत्तर आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.