नजरानजर अचानक
लेखनविषय:
काव्यरस
समजावले मनाला
माझ्या कितीतरी मी
हे पाहणे तुजकडे
नाही बरे रे नेहमी..
का ऐकते न मन हे
सांगीतले जरी मी
वळुनी पुन्हापुन्हा का
बघते तुलाच नेहमी..
गर्दी बघून तिकडे
रुसतो मनी इथे मी
एकांत पाहुनीया
हसतो खुषीत नेहमी..
नजरानजर अचानक
होतोच बावरा मी
त्रेधा उडे कशी मग
अवघड स्थितीत नेहमी..
.
वाचने
2835
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
व्वाह! झकास कि हो.
लय भारी
मस्तच हो.
कविता आवडली! आन्खोकी गुस्ताखीया माफ हो आठवलं!
आत्मबंध , भरत_पलुसकर , अभ्या.. , रातराणी ....
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
कविता आवडली
हे पाहणे तुजकडे
नाही बरे रे नेहमी..
पुढे काय झाले .....
विवेकपटाईत -
नंतरच्या दोन ओळीत उत्तर आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मस्त
एक एकटा एकटाच -
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
सुरेख कविता!
पैसा -
प्रतीसाठी आभार !
In reply to धन्यवाद - by विदेश
प्रतिसादासाठी आभार !
व्वाह! झकास कि हो.