छोटु
लेखनप्रकार
सकाळचे साडे सात वाजले होते. मी आणि चिरंजिव दोघेही जायच्या गड्बडीत होतो. बायकोने द्रोणाच्या इड्ल्या केल्या होत्या. बेल वाजली. मी टी पॉय वरचा ब्रेकफास्ट न आवरताच चुकुन दरवाजा उघडला. बघतो तर समोर दरवाजात शेजारीण उभी. बरोबर अडीच वर्षाचा छोटू. दरवाजा उघडताच छोटुने लगेच आक्रमण केले. आणि सोफावर विराजमान झाला. प्लेट मधील द्रोण बघताच 'माला पन पाय्जे' चा घोष सुरु झाला. बायको बाहेर आली. "एवढ्या सकाळी आजोबा जेवतात" शेजारणीने बॉम्ब टाकला. आता सहा द्रोण अधिक वाटीभर चटणी आणि चवीला सांबार व ताजे लोणी ह्याला काय जेवण म्हणतात. असो. बायकोने छोटुला सुद्धा एक द्रोण आणला. 'माला पण आजोबा एवदे पायजे' इती छोटू. (अरे बाबारे काका चालेल रे). मग वाटीभर साखरे वरुन सुरु झालेले संभाषण द्रोणाच्या इड्लीची पाक-कृती वर घसरले.
छोटू खाणे संपवुन घरभर फिरायला लागला. चिरंजीव अस्वस्थ. टी.वी वर १५ वर्ष संभाळलेली रोबोकॉप टॉय कार संकटात आलेली होती. मी त्याची मनःस्थिती बघुन छोटूचे लक्ष दुसरीकडे वळवले. लक्ष नाही बघुन कार बाजुला काढली. चिरंजीवांचा जीव सुखावला आणि तो कॉलेजला रवाना झाला.
आता संभाषण द्रोण कसे करायचे वर आले होते. बायकोने प्रॅक्टीकल सुरु केले. संध्याकाळी पाहुणे येणार होते म्हणुन मी जरा जास्तच पाने आणली होती. (भाजीचा फणसाची पाने).१५ मिनिटे झाली पण शेजारणीला काही द्रोण काही जमेना. हे सगळयाना जमेल असे नाही. इतक्यात छोटुने 'मम्मा माला सु झाली' असे म्हणत बोट वर केले. आणि लगेच आपली चड्डी काढुन माझ्यासमोर उभा राहिला. शेजारणीचा चेहेरा गोरामोरा झाला. मी छोटुला बाथरुम मधे नेले. कार्यभाग आटोपल्यावर त्याला बाहेर आणले. बाहेर आणुन चड्डी सुद्धा घातली. अचानक शेजारणीचा इडली मधला इंटरेस्ट संपला. छोटुला खसकन ओढून साखरेची वाटी तशीच सोडून ती बया घरी चालती झाली. जाताना " सॉरी आजोबा" असे अर्धवट वाक्य कानावर पडले.
बायकोने लगेच 'तुम्हाला पण उद्योग नाही हां" हा बाण मारला. शेजारणीला छोटूचा खुप राग आला होता हे कळाले. नंतर शेजारुन खुप मोठ्या मोठ्याने आवाज यायला लागले. छोटूचा रडण्याचा आवाज ऐकु आला. छोटुला बहुतेक मार पडला असावा.
त्यातली कानावर आलेली वाक्ये अशी. "लाज आणलीस तु मला" मुलाला
"तुम्ही काहीही शिस्त लावत नाही", " आतापासुन असे तर मोठा झाल्यावर काय करेल" "काय म्हणत असतील ते आजोबा."
मी काय म्हणणार. कशाला म्हणणार. कसली शिस्त. कसली लाज. च्या मारी मुलगा होता म्हणुन बरे. मुलगी असती तर काय केले असते देव जाणे.
ऑफिस मधे जाताना तो नवरा नावाचा बैल लिफ्ट मधे भेटला. त्याला म्हटले, काय, आज चहा नाही वाटते.
तो पण मला लगेच "सॉरी " म्हणाला. का कुणास ठाउक मला त्याची दया वाटली नाही.
कसली ओझी वहातात ही माणसे.
असल्या काल्पनिक ओझ्या खाली दबलेले हे पालक काय वारसा देणार आपल्या मुलाना.
त्या मुलाला इतक्या छोट्या वयात अपराधी पणाची भावना मनात रुजवुन (शिक्षा )देउन त्या शिकल्या सवरलेल्या गाढवीणीला काय मिळाले?
असा काय मोठा भुकंप झाला एवढ्या छोट्या गोष्टीसाठी हायपर व्हायला. छोटुला स्वःत च्या सेक्शुऍलीटी ची जाणीव अशा प्रकाराने.
जाता जाता: बैलाचे लै भारी हाल असतील बॉ. ऊठाबशा काढायला लावते की काय?
वाचन
8560
प्रतिक्रिया
41
कळले नाही...
समजवणे
>छोटुला
In reply to >छोटुला by लिखाळ
अगदी बरोबर
In reply to >छोटुला by लिखाळ
अगदि हेच मला म्हणायचे होते
लहान
अगदी बरोबर
'द्रोणाची इडली'
In reply to 'द्रोणाची इडली' by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
अति
In reply to अति by अनामिक
मस्त रे
In reply to अति by अनामिक
द्रोणाची इडली - इंस्टंट मिक्स
In reply to द्रोणाची इडली - इंस्टंट मिक्स by कोलबेर
लोणी
आमाला मूलं
In reply to आमाला मूलं by ब्रिटिश
बरोबर ! आणि
तात्पर्य :
In reply to तात्पर्य : by कोलबेर
लहान
हे काय
In reply to हे काय by बट्टू
अरे बाप रे!
In reply to हे काय by बट्टू
हम्म्म्...
डायपर /पॉटी ट्रेनिन्ग
In reply to डायपर /पॉटी ट्रेनिन्ग by मुक्तसुनीत
मला मुलं
In reply to डायपर /पॉटी ट्रेनिन्ग by मुक्तसुनीत
शहरी
In reply to शहरी by कोलबेर
रॅश बद्दल
In reply to डायपर /पॉटी ट्रेनिन्ग by मुक्तसुनीत
भारतात डायपर्स ही संकल्पना शहरी भागात बर्यापैकी रुळली आहे.
मोठी शंका
धन्यवाद आणि आणखी काही मुद्दे
In reply to धन्यवाद आणि आणखी काही मुद्दे by मुक्तसुनीत
पण त्याचा
In reply to पण त्याचा by कोलबेर
ह्यॅ काहीच्या काहीच हं!
सुन्न!!
In reply to सुन्न!! by पिवळा डांबिस
गेल्या काही दिवसात चिंचेचा फोक बर्याच वेळा
In reply to गेल्या काही दिवसात चिंचेचा फोक बर्याच वेळा by चतुरंग
आता करनार तरी काय वो!!
छोटुला
दूरान्वये...
इतक्या लहान मुलांना शी-शू सारख्या किरकोळ गोष्टीत
In reply to इतक्या लहान मुलांना शी-शू सारख्या किरकोळ गोष्टीत by चतुरंग
+१
अरे पण...
In reply to अरे पण... by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
फणसाच्या पानाच्या द्रोणात इडली वाफवायची
ते सोडा
वस्तुनिष्ट
शेजारी
आत्ता