वीरगळांच्या शोधात
आपल्या पुण्याजवळच्या बाणेर गावात एक टेकडी आहे. त्या टेकडीत प्राचीन लेणं आहे हे माहित होतं पण जायचा योग आला नव्हता. एकदा मात्र निघालोच. बाणेर गावातल्या हनुमान मंदिरापासूनच लहान बोळांतूनच लेणी मंदिरापर्यंत वर जायला पायर्या आहेत. एकाच अखंड कातळात खोदून काढलेलं हे शैव लेणं हे बहुधा ९/१० व्या शतकातलं असावं. त्या लेण्यात आणि लेण्यांबाहेर काही वीरगळ पडलेले आहेत. बहुधा इथे पूर्वी लहानशी लढाई झालेली असावी. ह्या लेणीच्या बाहेरच एक बलीवेदी पण मिळाली. बलीवेदी म्हणजे बळी ज्या शिळेवर देतात तो दगड. ही एक लहानशी चौकोनी सपाट शिळा असून चारही कोपर्यांवर बकर्याची मुंडकी कोरलेली आहेत.
बाणेर वीरगळ
-
बलीशिळा
एकदा अंजनेरीला गेलो होतो. अंजनेरी नाशिकपासून साधारण १०/१२ मैलांवर. भल्यामोठ्या कातळकड्यावर निर्मिलेला अजस्त्र किल्ला आणि पायथ्याला गावात १६ प्राचीन मंदिरांचं संकुल. ह्या मंदिरांत असंख्य भग्नावशेष आहेत. आमलक, स्तंभांचे भाग, मूर्ती, वीरगळ इत्यादी. तिथेच आहे एक आगळावेगळा वीरगळ. आगळावेगळा असं म्हणण्याचं कारण वीरगळाच्या खालच्या पट्टीत एक वीर दुसर्या वीराचे केश धरुन त्याचं मस्तक धडावेगळं करताना दाखवलाय. पूर्वीच्या काळी युद्धांत मस्तकाचे केश धरुन सैनिक शत्रूंची मस्तके धडावेगळी करायचे हे टाळण्यासाठी म्हणून बहुतेकवेळा प्रतिस्पर्धी सैनिक मुंडण करुन युद्धात उतरायचे.
अंजनेरी वीरगळ
ह्या कोथळ्यातही बरेच वीरगळ आहेत. हया शिवाय वीरगळांसाठी सपाट केलेल्या कित्येक शिल्पविहिन शिळादेखील तिथे पडलेल्या आहेत. तिथे आहेत गोवर्धन वीरगळ. गोवर्धन वीरगळ म्हणजे गाईगुरे पळवण्यास आलेल्या चोरट्यांविरुद्ध्/शत्रूंविरुद्ध युद्ध करुन आपले बलिदान केलेल्या वीरांचे स्मारक. ह्या वीरगळआंमध्ये सर्वात खालच्या पट्टीकेवर मृत वीराच्या बाजूने गाईगुरे कोरलेली आढळतात. गोवर्धन वीरगळही बर्याच ठिकाणी आहेत. मी किमान ३० ते ४० तरी आतापर्यंत पाहिलेले आहेत.
कोथळ्याचा गोवर्धन वीरगळ
एकदा पूरच्या नारायणेश्वरास गेलो होतो. हे पूर म्हणाजे आताचे सासवडनजीकचे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे नारायणपूर. ह्या गावचा रामचंद्रदेव यादवाचा पूर शिलालेख प्रसिद्ध आहे. ह्या शिलालेखात रामदेवरायच्या दंडनायक बाईदेव व अजून कुण्या एका प्रधान सेनापतीचा उल्लेख आला असून हेमाद्री पंडिताला 'लोककर्माधिकारी' अर्थात लोकोपयोगी कामे करणारा म्हणून नियुक्त केले गेल्याचा उल्लेख आहे. प्रस्तुत लेख सध्या भारत इतिहास संशोधक मंडळात आहे. तर ह्या पुरात नारायणेश्वराचे यादवकालीन मंदिर असून त्याच्या पुढ्यातल्या रस्त्याच्या पलीकडे एका खोपटात व तिथेच एका शेतात अशा दोन सतीशिळा आहेत. ह्यातील एक सतीशिळा फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक.दोन नव्हे तर सतीचे तब्बल चार हात एकाच शिळेवर कोरलेले आहेत ह्यांखेरीज लढाईचे दृश्यही आहेच. कदाचित एकाच वेळी सती गेलेल्या अनेक स्त्रियांचे स्मारक म्हणून ही शिळा कोरलेली असावी.
पूरची सतीशिळा
भर उन्हाळ्याचे दिवस. साधारण एप्रिल महिन्याची अखेर. उन्ह अगदी रणरणतं. अशा तापत्या दुपारी पेडगावला गेलो होतो पेडगावची ती पहिली भेट. नंतर तीनचार वेळा पुन्हा पुन्हा पेडगावला जाऊन आलो. पेडगावला विस्तीर्ण भुईकोट आहे. सध्या पुर्ण भग्न झालेला. औंरंगजेबाचा सरदार बहादुरखानाने बांधलाय. किल्ल्याचा कोट शिल्लक आहे. आतमध्ये मात्र बांधकामे हुडकावी लागतात. किल्ल्यात फिरणे तसे धोक्याचे कारण सगळीकडे वेड्या बाभळीचे जंगल माजलंय. ह्याच पेडगावच्या बहादूरगडात संभाजी महाराजांना हात लाकडांना बांधून आणि विदुषकाची टोपी घालून औरंगजेबाने मिरवत आणलं होतं, नंतर येतेच राजांचे डोळे काढले होते. तर ह्या पेडगावातच पाच यादवकालीन मंदिरे आहेत. ती पण एकापेक्षा एक सरस आणि अतिशय शिल्पसमृद्ध अशी. ह्या मंदिरांवरुन येथे पूर्वी यादवांचं मोठं ठाणं असावं असं वाटतं. तसंही इथल्या आजूबाजूच्या परिसरात भीमेकाठी असंख्य मंदिरे आहेत. तर पेडगावला अशी सरस पाच मंदिरे असूनही वीरगळ मात्र मला एकच दिसला, येथेच एक सतीशिळाही आहे.
पेडगाव वीरगळ
लोणीभापकरच्या जवळच पांडेश्वर हे गाव. तिथून सुमारे १०/ १२ किमी अंतरावर. येथेही एक प्राचीन मंदिर शिवाय असंख्य वीरगळ आहे. मात्र येथे वेगळाअच वीरगळ आहे तशा प्रकारचा मी इतरत्र कुठेही पाहिलेला नाही. तो आहे वाघाशी लढून मृत झालेल्या वीराचा. ह्या वीरगळाच्या मधल्या पट्टीत वीर वाघाशी झुंज घेताना दाखवलाय.
पांडेश्वरचा आगळा वेगळा वीरगळ
आता मध्ये मागच्या पावसाळ्यात किकलीला गेलो होतो. किकली मंदिराबदल आणि तिथल्या वीरगळांबद्दल मी लिहिलेलंच आहे. किकली हे जणू वीरांचंच गाव- वीरगळांचंच गाव. सुमारे दोनशेच्या आसपास वीरगळ किकलीत आहेत ते अगदी कुठेही सापडतात. घराच्या भिंतीत चिणलेले, मंदिरांपाशी, विहिरीपाशी, पारावर, अगदी गटारावर देखील.
किकलीचे वीरगळ
ह्याच अमूतेश्चर मंदिराच्या आवारात एक गधेगाळसुद्धा आहे. गधेगाळावरील शिलालेख पूर्णपणे झिजल्याने वाचता येत नाही, शिवाय ह्याचे वाचन पूर्वीही कधी झाले नाही मात्र हा लेख अमृतेश्वर मंदिराला दिलेल्या दानाबद्दलचा असावा व ह्या दानाचा लोप करणार्यांविषयी शापवाणी कोरलेली असावी हे निश्चित.
रतनवाडी गधेगाळ
शिलाहार केशिदेवाचा अक्षी गधेगाळ
मध्ये खिद्रापूरला गेलो होतो. तिथले महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि शिल्पकलेने समृद्ध असलेले कोपेश्वर मंदिर तीन चार वेळा पाहिलेले आहे. तिथल्या सुदर मूर्तींसारखेच सुंदर तिथले वीरगळही. मी आतापर्यंत पाहिलेला लेख असलेला एकमात्र वीरगळ हा तिथल्या मंदिराच्या ओसरीत भिंतीत बसवलेला आहे. लेख असलेले इतरही वीरगळ आहेत पण ते मात्र कर्णाटकात. महाराष्ट्रातला हा पाहिलेला मी एकमेव. ह्या लेखही महत्वाचा. भोजराजा दुसरा ह्याचा सेनपाती बम्मेश ह्याचा हा वीरगळ. हा बम्मेश महापराक्रमी यादवसम्राट सिंघण दुसरा ह्याचेबरोबर झालेल्या युद्धात वीरगतीस प्राप्त झाला. अतिशय देखणा असा हा वीरगळ. ह्याच मंदिराच्या आवारात अजून दोन तीन वीरगळ आहेत.
कोपेश्वराच्या ओसरीतील भिंतीत असलेला एक वीरगळ
In reply to माझे चार आणे by स्पा
In reply to (एक तर आमचा प्रतिसाद आधीच by अस्वस्थामा
In reply to औंध म्युझियमच्या दारातदेखील by अजया
In reply to हो. by प्रचेतस
In reply to वल्ली एकदा जाऊन ये त्या भागात by स्पा
आतापर्यंत समजत होतो की रानडुकराने शिकाय्रावर उलट हल्ला केलेलं शिल्प असावं परंतू लेख वाचल्यावर कळलं की हा शिल्पपट दान आणि गद्धेगाळ आहे.लोकांनी त्यावर तेल ओतून पुजा केल्याने झिजला आहे.
नकाशाचा स्क्रीनशॅाट
गद्धेगाळ co ordinates long N,lat E
19.21098897, 73.09291282
In reply to आमच्या घराजवळ पुर्वी एक तलाव by कंजूस
In reply to ग्रेट. by प्रचेतस
In reply to ग्रेट. by प्रचेतस
In reply to @ प्रचेतस शिलालेख जमेल तेवढा by माहितगार
In reply to तसे बरेच मार्ग आहेत. खर्चिक by अभ्या..
In reply to आणि त्यातही बर्याचदा असे by बॅटमॅन
किंवा चक्क गायबही होतो...हम्म प्रचेतस यांच्या लेखातही ह्या शिला अनपेक्षीत ठिकाणी दिसल्याचे उल्लेख आहेत. गायब होण्यावरून आठवले कोकणातल्या समुद्र किनार्यावरील एका ऐतिहासिक किल्ल्यातून बर्याच तोफा गायब झाल्या आहेत अशी बातमी चार सहा महिन्या पुर्वी कुठल्याशा कोपर्यात वाचली. इतर बातम्यांच्या गदारोळात बातमी कुठेशीक हरवून गेली या शिल्पांच्या नशिबी बातम्या सुद्धा नाहीत :(
In reply to आमच्या घराजवळ पुर्वी एक तलाव by कंजूस
In reply to काही प्रश्न by चांदणे संदीप
१) 'वीरगळ' ह्या शब्दाची व्युत्पत्ती?वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाच्या स्मरणार्थ घडवलेली शिळा म्हणजेच वीरगळ. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एखाद्या वीरपुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला, गाईगुरांना पळवून लावणार्यांपासून त्याचे संरक्षण केले, दरोडेखोरांकडून गावाचे संरक्षण केले आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राणोत्क्रमण झाले तर त्याचे स्मारक ऊभारण्यात येई. उभट, आयताकृती दगड, त्याच्या चारही बाजूंना चौकटी कोरलेल्या, वर घुमटी अशी याची रचना. चारी बाजूंच्या चौकटींमध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले, एका चौकटीवर आडवा पडलेला वीर आणि घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले अशी यांची सर्वसाधारण रचना.
२) नक्की कोणत्या काळात ह्यांची निर्मीती सुरू झाली?ही प्रथा किमान दोनहजार वर्षे तरी जुनी असावी. अगदी सातवाहनकाळापासून वीरांच्या स्मरणार्थ शिळा घडवणे सुरु झाले असावे पण ह्याला माझ्याजवळ तसा पुरावा नाही. मात्र ढोबळमानाने चालुक्यांपासून ह्या शिळांची सुरुवात झालेई असवी असे म्हणता येते. म्हणजे साधारण १४०० वर्षे.
३) भारतात अन्यत्र कुठे-कुठे ही आढळतात?जवळपास संपूर्ण भारतात वीरगळ आढळतात. अगदी काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत. पण महाराष्ट्र आणि कर्णाटकात ते प्रचंड संख्येने आढळतात.
४) 'वीरगतीस प्राप्त होणारे वीर' या विषयाला केंद्रीत धरून असणारे हे वीरगळ निश्चीतच कुणाच्या वेदनेतून/कृतज्ञतेतून निर्मीले गेले असावेत. मग, ह्यांचे स्वरूप मर्यादित का राहिले? लेण्यांची भव्यता यांना का मिळाली नाही? कुठे असल्यास सांगावे.वीरगळ हे वीराच्या बलिदानासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच्या स्मरणार्थ घडवले गेलेत. आणि हे अगदी सामान्य जनतेने उभारलेले आहेत. लेणी आणि वीरगळ हा भिन्न विषय आहे. लेणी मुख्यतः वर्षावासात निवासासाठी उभारली तर वीरगळ केवळ स्मारक म्हणून.
५) एखादी प्रसिद्ध लढाई आणि तिचा पुरावा कुठल्या वीरगळाशी येऊन मिळतो का?हो. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील वीरगळ हा शिलाहार राजा भोज दुसरा ह्याचा सेनापती बम्मेशाचा आहे. देवगिरीचा यादवसम्राट सिंघण दुसरा ह्याने कोल्हापूर शिलाहारांचा संपूर्ण पराभव करुन त्यांचे राज्य बुडवले. ही लढाई खिद्रापूरच्या आसपास झाली. ह्यात भोज दुसरा पन्हाळ्यावर पळाला तर बम्मेश लढाईत मृत्यु पावला. बोरीवलीतील एकसर येथील दोन वीरगळ देवगिरीचा महादेव यादव आणि उत्तर कोकण शिलाहार सोमेश्वर दुसरा ह्यांच्यातील आरमारी संघर्ष दाखवतात. सोमेश्वराचा जमिनीवरील युद्धात पराभव झाल्याने घारापुरी बेटाचा आश्रय घेण्यासाठी तो समुद्रात पळाला महादेवाने तेथेही त्याचा नावांद्वारे पाठलाग करुन ही राजवट बुडवली. ह्या नाविक संघर्षाचे चित्रण तेथील वीरगळांवर झाले आहे.
६) हे सार्वजनिक भावनेतून घडवले जायचे कि वैयक्तिक कुणी आपल्यापुरते घडवून घेत?बहुधा दोन्ही प्रकारे.
७) ह्याच्या कारागिरांविषयी आणि त्यांच्या चालू पिढ्यांविषयी काही माहिती उपलब्ध आहे का?नाही. पण काही उत्कृष्ट वीरगळांवरची शिल्पे तत्कालीन राजांच्या पदरी असणार्या श्रेष्ठ शिल्पकारांनी कोरली आहेत असे म्हणण्यास वाव आहे.
८) सर्वात भव्य वीरगळ महाराष्ट्रात कुठे आहे?नक्की सांगता येणार नाही पण सर्वसाधारणपणे ह्यांची उंची ३/४ फूटांपासून ८ फूटांपर्यंत असते.
९) याविषयी सर्वसामान्यात इतके अज्ञान का असावे? म्हणजे, हे नक्की काय आहे? याविषयीची माहिती कुणी पुढच्या पिढीला (जसे की: सध्याच्या) का पोचवित नाही राहिले?काळाचा प्रभाव. दुसरे काय. पण आजदेखील अशा स्मारक शिळा बनवल्या जातात. इस्लामी राजवटीत वीरगळांची जागा थड्यांनी घेतली तर हल्लीच्या काळात मुखवट्यांनी. :)
१०) ह्यांना घडवण्यामागे नेमका हेतू काय होता?पहिल्याच प्रश्नात उत्तर आलेच आहे. एखादी भटकंती सोबतच करु आता.
In reply to धन्यवाद संदीप प्रश्नांबद्दल. by प्रचेतस
In reply to सर तुस्सी ग्रेट हो! by चांदणे संदीप
In reply to रिपब्लिक ऑफ पुणे टाइम्स. दि. by अभ्या..
In reply to रिपब्लिक ऑफ पुणे टाइम्स. दि. by अभ्या..
In reply to =)) by चांदणे संदीप
In reply to रिपब्लिक ऑफ पुणे टाइम्स. दि. by अभ्या..
अभ्या नी फोटु शॉप नी केलि कड़ी
कुडतरकरानी दिली मला थड़ी
आणि मोडली मग एकंदर ह्यांची घडी!
Llllllluuuuu
धन्यवाद हो सतीश कुडतरकर. :)In reply to ही थड़ी आणि ह्यातला क्रमांक by अत्रुप्त आत्मा
अभ्या नी फोटु शॉप नी केलि कड़ी कुडतरकरानी दिली मला थड़ी आणि मोडली मग एकंदर ह्यांची घडी!=)) =)) गुर्जीन्चा नाद नाय करायचा! ;) (केला नाद, झाला बाद!)
In reply to ही थड़ी आणि ह्यातला क्रमांक by अत्रुप्त आत्मा
अभ्या नी फोटु शॉप नी केलि कड़ी कुडतरकरानी दिली मला थड़ी आणि मोडली मग एकंदर ह्यांची घडी!आता मी जातो सासं-वडी आणि जेवायला आहे भात आणि कढी =))
In reply to रिपब्लिक ऑफ पुणे टाइम्स. दि. by अभ्या..
In reply to धन्यवाद संदीप प्रश्नांबद्दल. by प्रचेतस
In reply to प्रचेतस याचे उत्तर देतीलच पण by कंजूस
पैसे देऊन मृताच्या वारसाने वीरगळ घडवल्यावर कारागिराचे नकव कोरण्याचा प्रश्नच येत नाही.नोत नेचेस्सर्य. म्हणजे सामान्यतः हे बरोबर आहे पण काही ठिकाणी राजाने उभारलेल्या मंदिरातील मूर्तीखाली शिल्पकाराचे नाव आढळते. विशेषतः चालुक्य व होयसळ राजवटींमधील मंदिरांत. 'मल्लितमा' नामक होयसळ काळातील एक शिल्पकार बहुधा तेव्हाचा बर्निनी, रोदँ वगैरे असावा. किमान ३५-४० ठिकाणी त्याचे नाव कोरलेले सापडते.
In reply to पैसे देऊन मृताच्या वारसाने by बॅटमॅन
![]() |
| From Tivai, Taleran (Malshej) |
![]() |
| From Tivai, Taleran (Malshej) |
![]() |
| From Tivai, Taleran (Malshej) |
In reply to कुंजरगडाच्या पायथ्याला by सतीश कुडतरकर
In reply to ही थडी आहेत. by प्रचेतस
In reply to मुम्बई गोवा हायवे वर by रिकामटेकडा
In reply to टाइम्स ऑफ इंडीयातला अशातला हा by माहितगार
In reply to दखल by अभ्या..
In reply to @आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा.> by अत्रुप्त आत्मा
@आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.>> +१ आणि टाळ्याचा कडकडाट!
In reply to दखल by अभ्या..
In reply to दखल by अभ्या..
In reply to अतिशय सुंदर सचित्र संकलन…. by Anand More



(एक तर आमचा प्रतिसाद आधीच