वीरगळांच्या शोधात
आपल्या पुण्याजवळच्या बाणेर गावात एक टेकडी आहे. त्या टेकडीत प्राचीन लेणं आहे हे माहित होतं पण जायचा योग आला नव्हता. एकदा मात्र निघालोच. बाणेर गावातल्या हनुमान मंदिरापासूनच लहान बोळांतूनच लेणी मंदिरापर्यंत वर जायला पायर्या आहेत. एकाच अखंड कातळात खोदून काढलेलं हे शैव लेणं हे बहुधा ९/१० व्या शतकातलं असावं. त्या लेण्यात आणि लेण्यांबाहेर काही वीरगळ पडलेले आहेत. बहुधा इथे पूर्वी लहानशी लढाई झालेली असावी. ह्या लेणीच्या बाहेरच एक बलीवेदी पण मिळाली. बलीवेदी म्हणजे बळी ज्या शिळेवर देतात तो दगड. ही एक लहानशी चौकोनी सपाट शिळा असून चारही कोपर्यांवर बकर्याची मुंडकी कोरलेली आहेत.
बाणेर वीरगळ
-
बलीशिळा
एकदा अंजनेरीला गेलो होतो. अंजनेरी नाशिकपासून साधारण १०/१२ मैलांवर. भल्यामोठ्या कातळकड्यावर निर्मिलेला अजस्त्र किल्ला आणि पायथ्याला गावात १६ प्राचीन मंदिरांचं संकुल. ह्या मंदिरांत असंख्य भग्नावशेष आहेत. आमलक, स्तंभांचे भाग, मूर्ती, वीरगळ इत्यादी. तिथेच आहे एक आगळावेगळा वीरगळ. आगळावेगळा असं म्हणण्याचं कारण वीरगळाच्या खालच्या पट्टीत एक वीर दुसर्या वीराचे केश धरुन त्याचं मस्तक धडावेगळं करताना दाखवलाय. पूर्वीच्या काळी युद्धांत मस्तकाचे केश धरुन सैनिक शत्रूंची मस्तके धडावेगळी करायचे हे टाळण्यासाठी म्हणून बहुतेकवेळा प्रतिस्पर्धी सैनिक मुंडण करुन युद्धात उतरायचे.
अंजनेरी वीरगळ
ह्या कोथळ्यातही बरेच वीरगळ आहेत. हया शिवाय वीरगळांसाठी सपाट केलेल्या कित्येक शिल्पविहिन शिळादेखील तिथे पडलेल्या आहेत. तिथे आहेत गोवर्धन वीरगळ. गोवर्धन वीरगळ म्हणजे गाईगुरे पळवण्यास आलेल्या चोरट्यांविरुद्ध्/शत्रूंविरुद्ध युद्ध करुन आपले बलिदान केलेल्या वीरांचे स्मारक. ह्या वीरगळआंमध्ये सर्वात खालच्या पट्टीकेवर मृत वीराच्या बाजूने गाईगुरे कोरलेली आढळतात. गोवर्धन वीरगळही बर्याच ठिकाणी आहेत. मी किमान ३० ते ४० तरी आतापर्यंत पाहिलेले आहेत.
कोथळ्याचा गोवर्धन वीरगळ
एकदा पूरच्या नारायणेश्वरास गेलो होतो. हे पूर म्हणाजे आताचे सासवडनजीकचे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे नारायणपूर. ह्या गावचा रामचंद्रदेव यादवाचा पूर शिलालेख प्रसिद्ध आहे. ह्या शिलालेखात रामदेवरायच्या दंडनायक बाईदेव व अजून कुण्या एका प्रधान सेनापतीचा उल्लेख आला असून हेमाद्री पंडिताला 'लोककर्माधिकारी' अर्थात लोकोपयोगी कामे करणारा म्हणून नियुक्त केले गेल्याचा उल्लेख आहे. प्रस्तुत लेख सध्या भारत इतिहास संशोधक मंडळात आहे. तर ह्या पुरात नारायणेश्वराचे यादवकालीन मंदिर असून त्याच्या पुढ्यातल्या रस्त्याच्या पलीकडे एका खोपटात व तिथेच एका शेतात अशा दोन सतीशिळा आहेत. ह्यातील एक सतीशिळा फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक.दोन नव्हे तर सतीचे तब्बल चार हात एकाच शिळेवर कोरलेले आहेत ह्यांखेरीज लढाईचे दृश्यही आहेच. कदाचित एकाच वेळी सती गेलेल्या अनेक स्त्रियांचे स्मारक म्हणून ही शिळा कोरलेली असावी.
पूरची सतीशिळा
भर उन्हाळ्याचे दिवस. साधारण एप्रिल महिन्याची अखेर. उन्ह अगदी रणरणतं. अशा तापत्या दुपारी पेडगावला गेलो होतो पेडगावची ती पहिली भेट. नंतर तीनचार वेळा पुन्हा पुन्हा पेडगावला जाऊन आलो. पेडगावला विस्तीर्ण भुईकोट आहे. सध्या पुर्ण भग्न झालेला. औंरंगजेबाचा सरदार बहादुरखानाने बांधलाय. किल्ल्याचा कोट शिल्लक आहे. आतमध्ये मात्र बांधकामे हुडकावी लागतात. किल्ल्यात फिरणे तसे धोक्याचे कारण सगळीकडे वेड्या बाभळीचे जंगल माजलंय. ह्याच पेडगावच्या बहादूरगडात संभाजी महाराजांना हात लाकडांना बांधून आणि विदुषकाची टोपी घालून औरंगजेबाने मिरवत आणलं होतं, नंतर येतेच राजांचे डोळे काढले होते. तर ह्या पेडगावातच पाच यादवकालीन मंदिरे आहेत. ती पण एकापेक्षा एक सरस आणि अतिशय शिल्पसमृद्ध अशी. ह्या मंदिरांवरुन येथे पूर्वी यादवांचं मोठं ठाणं असावं असं वाटतं. तसंही इथल्या आजूबाजूच्या परिसरात भीमेकाठी असंख्य मंदिरे आहेत. तर पेडगावला अशी सरस पाच मंदिरे असूनही वीरगळ मात्र मला एकच दिसला, येथेच एक सतीशिळाही आहे.
पेडगाव वीरगळ
लोणीभापकरच्या जवळच पांडेश्वर हे गाव. तिथून सुमारे १०/ १२ किमी अंतरावर. येथेही एक प्राचीन मंदिर शिवाय असंख्य वीरगळ आहे. मात्र येथे वेगळाअच वीरगळ आहे तशा प्रकारचा मी इतरत्र कुठेही पाहिलेला नाही. तो आहे वाघाशी लढून मृत झालेल्या वीराचा. ह्या वीरगळाच्या मधल्या पट्टीत वीर वाघाशी झुंज घेताना दाखवलाय.
पांडेश्वरचा आगळा वेगळा वीरगळ
आता मध्ये मागच्या पावसाळ्यात किकलीला गेलो होतो. किकली मंदिराबदल आणि तिथल्या वीरगळांबद्दल मी लिहिलेलंच आहे. किकली हे जणू वीरांचंच गाव- वीरगळांचंच गाव. सुमारे दोनशेच्या आसपास वीरगळ किकलीत आहेत ते अगदी कुठेही सापडतात. घराच्या भिंतीत चिणलेले, मंदिरांपाशी, विहिरीपाशी, पारावर, अगदी गटारावर देखील.
किकलीचे वीरगळ
ह्याच अमूतेश्चर मंदिराच्या आवारात एक गधेगाळसुद्धा आहे. गधेगाळावरील शिलालेख पूर्णपणे झिजल्याने वाचता येत नाही, शिवाय ह्याचे वाचन पूर्वीही कधी झाले नाही मात्र हा लेख अमृतेश्वर मंदिराला दिलेल्या दानाबद्दलचा असावा व ह्या दानाचा लोप करणार्यांविषयी शापवाणी कोरलेली असावी हे निश्चित.
रतनवाडी गधेगाळ
शिलाहार केशिदेवाचा अक्षी गधेगाळ
मध्ये खिद्रापूरला गेलो होतो. तिथले महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि शिल्पकलेने समृद्ध असलेले कोपेश्वर मंदिर तीन चार वेळा पाहिलेले आहे. तिथल्या सुदर मूर्तींसारखेच सुंदर तिथले वीरगळही. मी आतापर्यंत पाहिलेला लेख असलेला एकमात्र वीरगळ हा तिथल्या मंदिराच्या ओसरीत भिंतीत बसवलेला आहे. लेख असलेले इतरही वीरगळ आहेत पण ते मात्र कर्णाटकात. महाराष्ट्रातला हा पाहिलेला मी एकमेव. ह्या लेखही महत्वाचा. भोजराजा दुसरा ह्याचा सेनपाती बम्मेश ह्याचा हा वीरगळ. हा बम्मेश महापराक्रमी यादवसम्राट सिंघण दुसरा ह्याचेबरोबर झालेल्या युद्धात वीरगतीस प्राप्त झाला. अतिशय देखणा असा हा वीरगळ. ह्याच मंदिराच्या आवारात अजून दोन तीन वीरगळ आहेत.
कोपेश्वराच्या ओसरीतील भिंतीत असलेला एक वीरगळ
In reply to माझे चार आणे by स्पा
(एक तर आमचा प्रतिसाद आधीच
In reply to (एक तर आमचा प्रतिसाद आधीच by अस्वस्थामा
लोल
भारीच
औंध म्युझियमच्या दारातदेखील
In reply to औंध म्युझियमच्या दारातदेखील by अजया
हो.
In reply to हो. by प्रचेतस
वल्ली एकदा जाऊन ये त्या भागात
In reply to वल्ली एकदा जाऊन ये त्या भागात by स्पा
व्हय. जाऊ आपुन.
सुरेख अभ्यासपूर्ण लेख
अह्हा...
आमच्या घराजवळ पुर्वी एक तलाव
In reply to आमच्या घराजवळ पुर्वी एक तलाव by कंजूस
ग्रेट.
In reply to ग्रेट. by प्रचेतस
हा "गाळ" बघून शनि
In reply to ग्रेट. by प्रचेतस
@ प्रचेतस शिलालेख जमेल तेवढा
In reply to @ प्रचेतस शिलालेख जमेल तेवढा by माहितगार
तसे बरेच मार्ग आहेत. खर्चिक
In reply to तसे बरेच मार्ग आहेत. खर्चिक by अभ्या..
आणि त्यातही बर्याचदा असे
In reply to आणि त्यातही बर्याचदा असे by बॅटमॅन
अवांतर
In reply to आमच्या घराजवळ पुर्वी एक तलाव by कंजूस
अरे तुम्ही तर माझ्याही आधी
लेख पार झिजलाय.पुर्वी यावर
काही प्रश्न
In reply to काही प्रश्न by चांदणे संदीप
धन्यवाद संदीप प्रश्नांबद्दल.
In reply to धन्यवाद संदीप प्रश्नांबद्दल. by प्रचेतस
सर तुस्सी ग्रेट हो!
In reply to सर तुस्सी ग्रेट हो! by चांदणे संदीप
रिपब्लिक ऑफ पुणे टाइम्स. दि.
In reply to रिपब्लिक ऑफ पुणे टाइम्स. दि. by अभ्या..
अगगागागा._/\_
In reply to रिपब्लिक ऑफ पुणे टाइम्स. दि. by अभ्या..
=))
In reply to =)) by चांदणे संदीप
मजसी
In reply to रिपब्लिक ऑफ पुणे टाइम्स. दि. by अभ्या..
ही थड़ी आणि ह्यातला क्रमांक
In reply to ही थड़ी आणि ह्यातला क्रमांक by अत्रुप्त आत्मा
कहर!
In reply to ही थड़ी आणि ह्यातला क्रमांक by अत्रुप्त आत्मा
अभ्या नी फोटु शॉप नी केलि
In reply to रिपब्लिक ऑफ पुणे टाइम्स. दि. by अभ्या..
सगळ्यात वरच्या चित्रात हा इसम
In reply to धन्यवाद संदीप प्रश्नांबद्दल. by प्रचेतस
आयुष्यातील प्रसंग
आज लेखाचा आस्वाद घेतला...
प्रचेतस याचे उत्तर देतीलच पण
In reply to प्रचेतस याचे उत्तर देतीलच पण by कंजूस
पैसे देऊन मृताच्या वारसाने
In reply to पैसे देऊन मृताच्या वारसाने by बॅटमॅन
इतकेच नव्हे तर दगडांच्या
लेख आवडल्या गेला आहे
सुरेख माहिती.
प्रचेतस वल्लीजी ,
अप्रतिम !
कारागिरांची नावे थोडी
ग्रेट
कुंजरगडाच्या पायथ्याला
In reply to कुंजरगडाच्या पायथ्याला by सतीश कुडतरकर
ही थडी आहेत.
In reply to ही थडी आहेत. by प्रचेतस
धन्यवाद
अतिसुंदर धागा
मुम्बई गोवा हायवे वर
In reply to मुम्बई गोवा हायवे वर by रिकामटेकडा
हो. सर्वच वीरगळ आहेत.
टाइम्स ऑफ इंडीयातला अशातला हा
In reply to टाइम्स ऑफ इंडीयातला अशातला हा by माहितगार
नाही हो. आत्ताच पाहिला.
दखल
In reply to दखल by अभ्या..
@आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा.>
In reply to @आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा.> by अत्रुप्त आत्मा
अरेव्वा!
In reply to अरेव्वा! by चांदणे संदीप
+१००
In reply to अरेव्वा! by चांदणे संदीप
+५००००००
In reply to दखल by अभ्या..
अभिनंदन.
In reply to दखल by अभ्या..
अरे वा! अभिनंदन! आता एकदा
अतिशय सुंदर सचित्र संकलन….
In reply to अतिशय सुंदर सचित्र संकलन…. by Anand More
मी टाकलाय फोटो इथे वर परंतू
हार्दिक अभिनंदन वल्ली.
खुप छान...
खुप छान...
सासवड अलीकडे 5 कि. मी. वर
परवा 18 तारखेला रविवारी
परवा 18 तारखेला रविवारी
वाईमध्ये जांभळी गावात दोन