मी सुखाची भेट घेणे टाळतो ..
वेळ दु:खाला दिलेली पाळतो
मी सुखाची भेट घेणे टाळतो
फारसे घडले नसावे कालही
मी उगाचच रात सारी चाळतो
ही फुलांची वाट आहे पण इथे
ऱोज एखादातरी ठेचाळतो
कोणते असते हवेमध्ये जहर
रंग प्रेमाचा कसा डागाळतो
केवढी जडशीळ दुनिया वाटते
देव जाणे कोण ही सांभाळतो
चालला असता तुझा साधेपणा
मी कुठे रंगारुपावर भाळतो
डॉ. सुनील अहिरराव
वर्गीकरण
मस्त!
क्या बात!!!
अफलातून!
@रातराणी, chandanesandeep
वाहवा!
सुंदर कविता
सुंदर गज़ल. शेवटच्या शेराचे
मतल्यातच षटकार लगावला आहे डॉ.
मस्त....
Wahhh
मस्तच
@पैसा,मित्रहो, एस, कानडाऊ
वाहव्वा!!
काही समजली नाही,
In reply to काही समजली नाही, by स्पा
संक्षेपित रसग्रहण
छान
मस्त कविता