मी सुखाची भेट घेणे टाळतो ..
लेखनविषय:
वेळ दु:खाला दिलेली पाळतो
मी सुखाची भेट घेणे टाळतो
फारसे घडले नसावे कालही
मी उगाचच रात सारी चाळतो
ही फुलांची वाट आहे पण इथे
ऱोज एखादातरी ठेचाळतो
कोणते असते हवेमध्ये जहर
रंग प्रेमाचा कसा डागाळतो
केवढी जडशीळ दुनिया वाटते
देव जाणे कोण ही सांभाळतो
चालला असता तुझा साधेपणा
मी कुठे रंगारुपावर भाळतो
डॉ. सुनील अहिरराव
वाचने
8065
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मस्त!
क्या बात!!! वाह!!!
डॉ. साहेब... गजब लिहिलीये गजल!!!
Sandy
डाॅक्टरसाहेब!
@रातराणी, chandanesandeep ,बोका ए आझम
आभार मित्रहो __/\__
क्या बात! क्या बात!!
क्या बात
सुंदर गज़ल. शेवटच्या शेराचे बाकीच्या गज़लेशी असलेला संबंध फारसा लक्षात नाही आला पण.
मतल्यातच षटकार लगावला आहे डॉ. साहेब.
ही फुलांची वाट आहे पण इथे
ऱोज एखादातरी ठेचाळतो
केवढी जडशीळ दुनिया वाटते
देव जाणे कोण ही सांभाळतो
वरील दोन शेरही कातिल.
मजा आ गया..
मस्त....
""फारसे घडले नसावे कालही
मी उगाचच रात सारी चाळतो""
""केवढी जडशीळ दुनिया वाटते
देव जाणे कोण ही सांभाळतो""
सुंदर.....
Wahhh
मस्तच
@पैसा,मित्रहो, एस, कानडाऊ योगेशु,वेल्लाभट,एक एकटा एकटाच
__/\__
अंदाज आवडला, येऊद्या अजून!
काही समजली नाही,
कुणी रसग्रहण करेल काय
In reply to काही समजली नाही, by स्पा
प्रेमभंग / काडीमोड
कविता.
मस्त कविता
मस्त!