Skip to main content

< मिसळपावात... >

लेखक नीलमोहर यांनी सोमवार, 29/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
नेटावर जे नामी मोट्ठं संस्थळ आहे ना तिथे खूप वाचक असतात, जबर ट्यारपी मिळतो डुप्लिकेट आयडी तिथे पडीक असतात ते अगदीच पकाऊ असतात मला अशा सायटी आवडत नाहीत ऐसे खचाखच पाडलेले धागे बघितल्यावर मला भोवळ येते तैसे ज्ञानामृत पाजू संस्थळावर जिलबीबरोबर पिठल्याचा आस्वाद घेतल्यावर मला अशीच भोवळ आली होती तेव्हापासून पिठलं हा पदार्थ मी व्यर्ज केलाय जिलब्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते मग तीही मी कधी खात नाही गुगलवर फिरता फिरता 'त्या' साईटीकडे मी ढुंकूनही कधी पाहत नाही तिथले लेखन वाचतांना माझी मती कुंठीत झाली होती मग तिकडे मी कधी गेलोच नाही मा... वर जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही १९७७ मध्ये एकदा तेथील लिखाण वाचल्यावर ताप भरल्याचं चांगलच आठवतयं ते पान मात्र मी अजून जपून बुकमार्क करून ठेवलयं, मात्र ते कोणतं हे मी तुम्हाला सांगणार नाही आताशा या आठवणी मला जास्त करुन येत नाहीत कारण सध्या मी मिसळपाव वरच राहतो :) प्रे र णा
लेखनविषय:

वाचने 12764
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

मला अशा सायटी आवडत नाहीत ! ठळक शब्द सलग लिहिल्याबद्दल "चुलत" भावंडांकडून धन्य्वाद. किसमीस वाल्या सायपुर्ण कवीता देणार्या आणि अस्सल काव्य्लेणी लीलया पेलणार्या भाव विभोर विश्व गुरु चाहता संघ.

http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif सरस! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

भन्नाट !!! का कोण जाणे, या गमतीदार धाग्यानेही "उपक्रम" सारख्या बंद पडलेल्या गंभीर प्रकृतीच्या संकेतस्थळाची आठवण झाली. खुप चांगले लेखन व्हायचे तिथे.

In reply to by सतिश गावडे

उपक्रम बंद झालं??? तर्रीच म्हटलं, आजकाल त्येचं नावगाव आमचं गुगलु दाखवत का नाही! :(

पेटलेल्या आहेत असे एक नम्र निरीक्षण आहे!

In reply to by बोका-ए-आझम

पेटलेल्या म्हणा.. मोकाट सुटलेल्या म्हणा.. ठिणगीला हवा घातली की जाळ तर होणारच.. मग ज्वाळा वाढल्या तर जवाबदार कोण ;) इथे माझे मला झेपेनासे झालेय काय चाललेय, झपाटल्यासारखे होतेय नुसते..

In reply to by नीलमोहर

मग 'पेटलेल्या' किंवा 'मोकाट सुटलेल्या' पेक्षा 'झपाटलेल्या' म्हणावे का ? =))

In reply to by सस्नेह

तसंही मिपाने झपाटलं आहेच, dual personality ची लक्षणे दिसतायेत असे psychiatrist बंधूराजांचे मत. आता यावर इलाज शक्य दिसत नाही. बादवे, अजून एक 'लेखन करा' ची टॅब ओपन आहे, वेट अ‍ॅन्ड वॉच ;)

In reply to by होबासराव

लोक असे भरीला पाडतात आणि मग म्हणतात ही नुसती विडंबनं पाडते. पण खरे सांगायचे तर ते साधेसरळ प्रामाणिक लेखन वाटले मला तरी, त्यात विडंबनास्पद काही जाणवले नाही.