तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा

सनईचौघडा काथ्याकूट
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.
तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
वर्गीकरण
वर्गीकरण

362 टिप्पण्या 97,945 दृश्ये

Comments

अभ्या.. नवीन

In reply to by प्रचेतस

मग नाहीतर काय. त्यांची जलयुक्त शिवाराची योजना चालूच असते. कुठे दुष्काळ, कुठे बांध याचे अडाखे चुकत नाहीत त्यांचे कधी. खरं जग अनुभवलेला मानूस त्यो. नमस्कार करतो हं नाखुकाका. ;)

अभ्या.. नवीन

In reply to by कपिलमुनी

ध्नयवाद कम्म्या. तू बी जरा फॅट कमी केला तर बुलेट शोभेल राव तुला. सध्या हार्लेडेव्हिडसन गेलाबाजार ट्रायम्फ घ्यावीस ही नम्र विनंती. . . ए क्सलं भारी नं. तू मला अजून भारी म्हण मीपण अजून काय काय सांगीन हं. .

बबन ताम्बे नवीन

In reply to by तुषार काळभोर

"सेम अ‍ॅज खेडूत" लिहीलेत मग वय का २० ने वजा केले? ते नसते तर तुमचा अंदाज माझ्याबाबतीत अगदी अचूक आला असता. नुसते "सेम अ‍ॅज खेडूत" लिहीले असते तरी चालले असते. फक्त मिशी बारीक नाहीय. टिळक्/आगरकर छाप आहे :-)

सनईचौघडा नवीन

अजुन थोडे आठवलेले लोक्स गणपा:- वय ४० च्या आसपास. चेहर्यावर नेहमी त्रासिक भाव मलाच का बरे फोटु दिसत नाहीत म्हणुन. पेहराव चाळीतले लोक घालतात तसा नाडीवाला लाईनीचा लेंगा आणि वर पांढरा सदरा , डोक्यावर बावर्ची टोपी. मिसळलेला काव्य प्रेमी:- ३० ते ३२ वय बारिक चौकड्यांचा शर्ट , हातात पेन आणि कागदाचा तुकडा, खूंट वाढलेली दाढी, चेहर्यावर कधी शांत तर कधी रोमँटीक भाव . पालखीचा खंडोबा:- हातात पेन आणि कागदाचा तुकडा , वय ४० च्या आसपास चेहर्यावर नेहमी उदास किंवा दु:खद भाव. पियुशा:- अल्लड अवखळ २५ ची तरुणी. गहु वर्णी, स्मार्ट , जिन्स टी शर्ट पेहरावातली. चिगो:- जबाबदारीची जाणीव असलेला माणुस , मध्यम बांधा, व्यवस्थित कडक इस्त्रीतले कपडे, वय साधारण ३५ च्या पुढे.

चिगो नवीन

In reply to by सनईचौघडा

चिगो:- जबाबदारीची जाणीव असलेला माणुस , मध्यम बांधा, व्यवस्थित कडक इस्त्रीतले कपडे, वय साधारण ३५ च्या पुढे.
चारातले तीन अंदाज चुकलेयत.. इस्त्रीतल्या कापडांबद्दल थोडंफार सहमत व्हावंं लागतंय, कारण की ऑफीसात भोकांचा टी-शर्ट घालून जाता येत नाही.. ;-) असो.. धागा जबरा आहे तुमचा..

रमेश भिडे नवीन

काही मिपाकरांच्या ओळखी करुन दिल्याबद्दल सनईचौघडे वाजवून आभार मानावेसे वाटत आहेत. -काही खरे काही खडे आम्ही सगळेच रमेश भिडे

सनईचौघडा नवीन

तीन तासात शंभर झाले त्या बद्दल मिपाकरणींचे आभार. सर्व मिपाकरणीना पिरातै तर्फे पुढिल अनाहिता कट्यात एक एक आईस्क्रीम. वेन्जॉय.

बोका-ए-आझम नवीन

In reply to by सनईचौघडा

मिपाचे बखरकार हेमंतभौ लाटकर यांनी निर्माण केलेला युगप्रवर्तक शब्द आहे तो. त्याबद्दल आम्ही सगळेच त्यांना थँक्स अ लाट म्हणतो! ;)

नाखु नवीन

शतका निमित्त धागाकर्ता आणि हातभार सदस्याचाही पाचव्या कोनाड्यात अंकशास्त्रावरून भविष्य (तुमचा भाग्यांक काय सांगतो) ही पुस्तीका,एक हेल्मेट आणि बुवांकडून अत्मशांती साठी दणदणीत ३३% टक्के सवलतीचे कूपन देऊन करण्यात येत आहे. हंगामी सचीव जेपी संचालीत लगोलग सत्कार समिती. अखिल मिपा सत्कार महा(न्)मंडळ अंकीत.

सूड नवीन

In reply to by पैसा

तोंड झाकलेलं कधी असतं म्हणे? मिशी अगदी उघडपणे कळत असते. आता काय काय समानतावादी बायकांना असते थोडीशी मिशी म्हणून लोक दुर्लक्ष करतात इतकंच!! =))

पियुशा नवीन

धाग्याच्या न स.चो. च्या फास्तेट शतक पुर्ती निमित्त स्रुजा काकी आनी रेवती आज्जी ह्यान्च्यातर्फे मी धाग्या कर्त्याचा एक पुस्पगुछ देउन स्त्कार करत आहे हो ............

पिलीयन रायडर नवीन

In reply to by विशाखा राऊत

कालच मी आणि स्रुज चारधामचं बुकिंग करुन आलोय.. रेवाक्का आणि अजया आल्या की जाऊ चार म्हातार्‍या फिरायला आता..

त्रिवेणी नवीन

प्रियांका तै ना भेटले आहे पण विशाखा तै तुम्ही इकडे येवून पण आमच्यासाठी वेळ काढत नाही सो तुम्ही ४० वर्षांच्या असाल असा अंदाज करते.

इरसाल नवीन

वर प्रतिसादात आलेल्या यच्चयावत इस्त्री आयडीज ह्या फक्त आणि फक्त ५०+ इतुके वयवर्ष अस्लेल्या आहेत.........हुकुमावरुन ( मला हे माहित आहे खात्रीशीर रित्या)

स्वामी संकेतानंद नवीन

काय ती हौस लोकांना अंदाज बांधण्याची!! नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा मेरी कमेंट ही मेरी पह्चान है, गर समझ आए

पिलीयन रायडर नवीन

In reply to by स्वामी संकेतानंद

तुम्ही... उंच.. बारिक.. चष्मा.. रंग उजळ.. मिश्किल भाव असलेला चेहरा.. थोडा गबाळा अवतार.. केस वाढलेले (हिप्पी नाही, पण अगदी चापुन चोपुन टाईप पण नाही..)

महासंग्राम नवीन

In reply to by स्वामी संकेतानंद

अंगावर भगवी कफनी, बारीक केलेलं केस, डोळ्यांवर बारीक गोल काड्यांचा चष्मा एका हातात रुद्राक्षाची माळ , तर दुसर्या हातात अँड्रॉईड वर मिपा सुरू

बोका-ए-आझम नवीन

मिपाकरांपैकी एकही अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. अजया, अत्रंगी पाऊस, स्पार्टाकस, आनंद मोरे, प्रास, विमे, मृत्युंजय, मस्त कलंदर आणि निखिल देशपांडे एवढ्या मिपाकरांना प्रत्यक्षात भेटलोय. फोनवर क्लिंटन (आता गॅरी ट्रूमन), विजुभाऊ, नाद खुळा, विशाल कुलकर्णी, मुक्त विहारी, सुबोध खरे, उमा@मिपा आणि विशाखा पाटील एवढ्यांशी बोललोय. रामदासना प्रत्यक्ष भेटू शकलो नाही पण एका सेमिनारमध्ये प्रेक्षक म्हणून होतो. फोटो ब-याच जणांचे पाहिलेत. अगदी शंभर टक्के अपेक्षेप्रमाणे असलेले म्हणजे बॅटमॅन आणि कॅप्टन जॅक स्पॅरो.

अभ्या.. नवीन

In reply to by यशोधरा

हा ना. मल्टीप्लेक्सातल्या नुसत्या एका बटनावर टनाटना उडणार्‍या पापकारणाची आठवन झाली. आजकाल मज्जा येते ब्वा. एक बटन आणि टनाटना लाह्या, धागे भरुन खरडफळाभर पसरतात. ;)

भाते नवीन

दोन वर्षांपुर्वी पैसाताईने एका धाग्यावर प्रतिसादात सांगितले होते कि 'एक सोडून बाकी सगळ्या मिपा बायका तिशीच्या आतल्या आहेत.' आता ती एक कोण ते विचारू नका. दोन वर्षांपुर्वी तीस म्हणजे आता… जाऊ दे. खखोदेजा.

एस नवीन

In reply to by भाते

म्हणजे 'मिपा बायका' हा शब्द दोन वर्षांपूर्वीच शोधला गेलाय? आणि तोही लाटकरांकडून नाही? काय सांगता काय? बुडाली बघा संस्कृती!

मदनबाण नवीन

सचौ यांनी वयाची "ठिणगी" टाकुन "वणवा" पेटवलेला आहे... ;) का कुणास ठावुक हा आयडी कुठल्या कट्ट्यात भेटलाय का ? बाकी पिरा आरती मध्ये दंबुक शब्द वापरलेला पाहुन गडी पार मुरलेला वाचक आहे हे मात्र अगदी खात्रीने सांगु शकतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

मदनबाण नवीन

In reply to by पिलीयन रायडर

सचौ म्हणजे पम्या हो... अरे हो... च्यामारी हे आयडी बदलली मंडळी ओळखणे कठीण होत चाललयं हल्ली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari

बॅटमॅन नवीन

महा लोल धागा =)) बाकी
स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान.
ठ्ठो =)) =)) =)) अगदीच अ‍ॅक्युरेट बरं का =))

पिलीयन रायडर नवीन

In reply to by बॅटमॅन

हो..हो.. तू मात्र अगदी अवखळ तरुण हं..! अगदी एव्हरग्रीन, फ्रेश, हसतमुख, मिश्किल, एझी गोईंग, जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवलेला तरूण... जा खुश रहा.. ;)

बॅटमॅन नवीन

In reply to by पिलीयन रायडर

अगदी एव्हरग्रीन, फ्रेश, हसतमुख, मिश्किल, एझी गोईंग, जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवलेला तरूण...
सत्य वर्णन केल्याबद्दल धन्यवाद!

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

In reply to by बॅटमॅन

पिरातौ आणि ब्याट्याचं खोट्ट खोट्ट का होईना एकमत झालेलं पाहुन ड्वॉळे पाणावले, उर भरुन आला, नाक सुर्सु...असो.

स्रुजा नवीन

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुझं वय १२, काम : आईने दिलेला रुमाल घेऊन न जाणे आणि मग नाक सुंसुं करत बसणे ;)

एक एकटा एकटाच नवीन

सगळ्या मिपाकरांची ही आगळी वेगळी "अंदाज ओळख" आवडली. इतरांचे वयाचे अंदाज काहीही असोत पण मनाने मात्र सगळे मिपाकर हे अजुनही अवखळ तारुण्यातच आहेत. ही गोष्ट मात्र मान्य करायलाच हवी. एका चटपटीत मिसळी प्रमाणेच काहीसे आंबट गोड तिखट झणझणीत सगळ्या मिपांकराना माझ्या शुभेच्छा जियो मिपाकर

शान्तिप्रिय नवीन

अरेरे .... या अवखळपणापासून वाचलो मी. बरे झाले फोटो देउन टाकला दोन धाग्यात. त्या फोटो देण्याच्या घट्नेमुळेच हे महाभारत घडले असावे असे मला वाटते.

शब्दबम्बाळ नवीन

अरे काय हे! एका दिवसात २०० कडे वाटचाल... हल्ली डबल सेन्चुरी पण सहज होऊ लागलीये... एक से एक फलंदाज फोर्म मध्ये आहेत! :)

डॉ सुहास म्हात्रे नवीन

२०० झाले ! सनईचौघडा वाजवा रे वाजवा !

पिशी अबोली नवीन

हा हा हा..खूप भारी वर्णने. सगळे डोळ्यांसमोर उभे राहिले.. सनईचौघडा हे डोक्यावर पांढरी टोपी घालून गाल फुगलेले काळ्या वर्णाचे दिसत असतील असं वाटून गेलं.. ;)

भंकस बाबा नवीन

सडपातळ, केस उडालेले, टिपिकल मध्यमवर्गीय , नेहमी फॉर्मलमधे, अगदी डिट्टो दिलीप प्रभावळकरसारखे, पण हो रस्त्याने चालताना मागून कोणीतरी गचांडी धरील असा भाव तोंडावर बाळगणारे.४५ ते ५० वय संदीप डांगे, स्थूलपणाकडे झुकणारे, चश्मा तो पण चन्देरी किंवा सोनेरी काडयाच्या , हाफ शर्ट जीन्स पैन्ट, ३५ ते ४० वय

रेवती नवीन

हैला, हा धागा असल्याचे माहितच नव्हते. सगळे प्रतिसाद वाचले नाहीयेत. महादंगा झालाय हितं. सचौ, एकदाच भेटा! बघतेच आम्हालाला कोण पन्नाशीचं समजतय. अहो, आमची लग्नं विशीत झालियेत म्हणून संसाराची वर्षं जास्त वाटतात. शिवाय मिपा बायकांचं वय कायम सोळा असं एकदा दोनदा नव्हे तब्बल सव्वादोनवेळा सांगून झालय. भारतीय पेहेरावाला दिवाळी आणि दसर्‍याशिवाय हात लागत नाही. भारतात येताना आपण अज्जून कित्ती कित्ती भार्तीय आहोत हे लोकान्ला कळावे म्हणून पेहराव भारतीय असतो. हामेरिकेत जीन्स, शर्ट हा राष्ट्रीय पेहराव आहे. ;) चला, आता काशीला जाणे आले, पण त्याआधी उरलेले प्रतिसाद वाचून घेते. तरीही धन्यवाद. माझं वय किती? कुठं रहात असेल? कशी दिसत असेल? पेहराव कोणता असेल? असा विचार कोणी करेल हे अज्याबात एक्सपेक्टेड नव्हते. अगदी अर्धा टक्काही नाही. तरीही उल्लेख केल्याबद्दल खुदकन हसू आले हे मान्य करते.

पैसा नवीन

In reply to by पिलीयन रायडर

तो मिपावर येतानाच फ्रस्ट्रेटेड आहे हे लक्षात घेऊन जरातरी कनवाळुपणा दाखव! अगदीच बै हार्टलेस तुम्ही लोक!

पैसा नवीन

In reply to by पिलीयन रायडर

लहान पोरगं चिडून लाथा झाडायला लागलं की त्याला "अलेले शोन्या" म्हणतेस का "जा बस त्या कोपऱ्यात" म्हणतेस?

स्मिता. नवीन

In reply to by स्मिता.

माझा आधीचा प्रतिसाद २५०वा असल्याचं लक्षात आल्याने हा २५१वा खास माझ्या अभिनंदनाचा प्रतिसाद!

मिंटी नवीन

यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. =)) =)) =)) मैय्या आता तुमा निलम ताईच म्हणणार..... ;)

मिंटी नवीन

In reply to by सूड

हो. २००९ नंतर मिपापासुन लांब होते...म्हणजे प्रतिसाद वगैरे देत नव्हते... फक्त वाचनमात्र होते... :)

विवेकपटाईत नवीन

आपण तर आपली ओळख स्वत: करून देतो, आमचे वय मानसिक अजूनही १०-१५ वर्षांचे आहे, आज हि वर्षातून एकदा तरी चिड़ियाघर बघायला जातो. (आत्ताच जाऊन आलो, उंदीर मांजरीची गोष्टीची प्रेरणा तिथलीच). टोम जेरी आणि शेरखान आपल्याला बुआ भारीच आवडतात.

सूड नवीन

In reply to by प्रचेतस

बुआ यमकं पण फार छान जुळवतात. त्यांचं इसवीसनपूर्व दुसर्‍या शतकात सातारा येथे केलंलं एक यमक तर फारच प्रसिद्ध आहे.

अभ्या.. नवीन

In reply to by प्रचेतस

बुवांकडे कविलोकांसारखी एक शबनम पिशवी आहे. एक लेदरची सॅक पण आहे. त्या सॅकचे बुवांना खूप कौतुक आहे. बुवांकडे दोन दोन स्मार्ट फोन आहेत. एकातून ते फक्त स्मायल्या टाकतात. बुवांची आल्टो ग्यासवर चालते.' ते कधी कधी पंपावर पण जातात.

अभ्या.. नवीन

In reply to by सूड

तो एका ग्यांगमध्ये डॉन बनायला गेला. रेस्ट इज हिस्ट्री म्यान....................जस्स्स्स फर्गेटिट यार.

होबासराव नवीन

In reply to by अभ्या..

बुवांची आल्टो ग्यासवर चालते.' ते कधी कधी पंपावर पण जातात. बाकि वेळेस आल्टो कशावर चालते मग ;)

अभ्या.. नवीन

In reply to by होबासराव

योग्य अनुयायी न मिळाल्याने त्यांनी गुंडाळली ती चळवळ. आता फुलपात्र चळवळ. बॅनर आलेत प्रिंटिंगला माझ्याकडे. "डोन्ट बी मेष्पात्र, बी अ फुल्पात्र" अशी स्लोगन आहे.

नाखु नवीन

In reply to by अभ्या..

"डोन्ट बी मेष्पात्र, बी अ फुल्पात्र" अशी स्लोगन आहे.
फुल्पात्र" शब्द एकत्र लिहिणे कारण याचे विंग्लेश भाषांतर केलेले बॅनर सन होजे आणी ग्वाटे मारू येथे देणे आहेत. शिवाय इतरांना (वारंवार) शिका येतात तश्या बुवांना यमक्या येतात हा मुलभूत फरक लक्श्यात घेणे.
योग्य अनुयायी न मिळाल्याने त्यांनी गुंडाळली ती चळवळ.
काहींनी बुवांचाच तांब्याच पळवायचा प्रयत्न केल्याने बुवांची "पंचाईत" झाली म्हणून ती चळवळ बंद झाली अशीही जालीय वर्तुळात काही व्यक्ती आणी वल्लींच मत आहे. खखो बुवा आणी परम शिष्य जाणे.

गवि नवीन

In reply to by सूड

शांत गरीब स्वभावाच्या,दिलदार, पापभीरु, मनमिळाऊ, कोणाच्या अध्यात ना मध्यात अशा बुवांचे अनेक दुष्टात्म्यांनी मार्केट स्टँड अप केलेले पाहून अगदी शेमच वाटली.

कॅप्टन जॅक स्पॅरो नवीन

In reply to by गवि

शांत गरीब स्वभावाच्या,दिलदार, पापभीरु, मनमिळाऊ, कोणाच्या अध्यात ना मध्यात
नक्की आपल्याचं बुवांबद्दलचं बोलताय ना तुम्ही? =))