जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.
सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.
या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.
पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?
मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.
असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.
केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.
नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.
प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.
हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.
अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.
या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).
या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.
वाचने
207360
प्रतिक्रिया
893
मिसळपाव
प्रतिक्रिया
मनोजकुमारची अटक आआपने फारच सौम्यपणे घेतल्याचे दिसतेय
NDTV.. मग काय तर आम्हि पण बातम्या चिकटवणार
दिल्ली सरकारने पेट्रोल आणि डीझेल वरील VAT वाढवला
आधी
In reply to दिल्ली सरकारने पेट्रोल आणि डीझेल वरील VAT वाढवला by ट्रेड मार्क
बाकी देशभरात पेट्रोल च्या किमती कमी झाल्या
In reply to आधी by विकास
आआपचे प्रचारक श्री. रा. रा.
In reply to बाकी देशभरात पेट्रोल च्या किमती कमी झाल्या by ट्रेड मार्क
काही बातम्यांमध्ये सांगत आहेत
केजरीवालान्च्या धूर्तपणाला
In reply to काही बातम्यांमध्ये सांगत आहेत by नांदेडीअन
केजरीवालान्चा जनतेच्या
आपल्या माणसांची काळजी
आम आदमी पक्ष हे कॉन्ग्रेसचाच
In reply to आपल्या माणसांची काळजी by पुण्याचे वटवाघूळ
महिला आयोग अध्यक्ष नेमणूक
राबडी देवी बरी
In reply to महिला आयोग अध्यक्ष नेमणूक by पुण्याचे वटवाघूळ
हम्म
सतत रडत राहणारा माणूस
>>> आणि त्याच लोकशाहीतून हा
केजरीवाल आणि कांदा
केजरीवाल का हात बलात्कारियोंके साथ
नियमानुसार
In reply to केजरीवाल का हात बलात्कारियोंके साथ by गॅरी ट्रुमन
कर्ण
In reply to नियमानुसार by कपिलमुनी
भाषा सांभाळा
In reply to कर्ण by गॅरी ट्रुमन
आप समर्थक
In reply to भाषा सांभाळा by कपिलमुनी
मजाच म्हणायची
In reply to भाषा सांभाळा by कपिलमुनी
मुद्द्याचा बोला
In reply to मजाच म्हणायची by गॅरी ट्रुमन
शिफ्टिंग गोलपोस्ट?
In reply to मुद्द्याचा बोला by कपिलमुनी
या धाग्यावरचे तुमचे प्रतिसाद
In reply to शिफ्टिंग गोलपोस्ट? by गॅरी ट्रुमन
अगदी अगदी..
In reply to या धाग्यावरचे तुमचे प्रतिसाद by मोदक
इतर वेळेस इतर चमचे
In reply to शिफ्टिंग गोलपोस्ट? by गॅरी ट्रुमन
मुद्दा
In reply to इतर वेळेस इतर चमचे by कपिलमुनी
ख्या ख्या ख्या
A gem from BACHI KARKARIA
अवतारी महापुरूष श्री श्री
आआपची कार्यकर्ती
In reply to अवतारी महापुरूष श्री श्री by श्रीगुरुजी
आम आदमी सेना हा
In reply to आआपची कार्यकर्ती by कपिलमुनी
आआपची कार्यकर्ती
In reply to आम आदमी सेना हा by श्रीगुरुजी
त्यात खोटे काय? ती मूळची
In reply to आआपची कार्यकर्ती by कपिलमुनी
हास्यास्पद
In reply to त्यात खोटे काय? ती मूळची by श्रीगुरुजी
अहो, केजरीवालच खोटारडेपणासाठी
In reply to हास्यास्पद by कपिलमुनी
खोटारडेपणासाठी
In reply to अहो, केजरीवालच खोटारडेपणासाठी by श्रीगुरुजी
शाई फेकणारे आआपचेच आहेत.
In reply to खोटारडेपणासाठी by कपिलमुनी
व्हिडीओ
In reply to शाई फेकणारे आआपचेच आहेत. by श्रीगुरुजी
ती मुलगी स्टेजवर
In reply to व्हिडीओ by कपिलमुनी
आप आणी आप सेना
In reply to ती मुलगी स्टेजवर by श्रीगुरुजी
अरे बस कर पगले...
In reply to आप आणी आप सेना by कपिलमुनी
सगळं अगदी तसंच आहे.
In reply to आप आणी आप सेना by कपिलमुनी
नसल्याचा पुरावा?
In reply to सगळं अगदी तसंच आहे. by श्रीगुरुजी
पुरावा
In reply to सगळं अगदी तसंच आहे. by श्रीगुरुजी
गुरुजी आणि केजरीवाल एकाच
In reply to पुरावा by कपिलमुनी
माझ्या उभ्या आयुष्यात मला
In reply to गुरुजी आणि केजरीवाल एकाच by संदीप डांगे
ती महिला आआपशी संबंधित आहे हे
In reply to पुरावा by कपिलमुनी
झोपेचे सोंग
In reply to ती महिला आआपशी संबंधित आहे हे by श्रीगुरुजी
अहो, ते दोन्ही एकच आहेत. जसा
In reply to झोपेचे सोंग by कपिलमुनी
बाजारगप्पा
In reply to अहो, ते दोन्ही एकच आहेत. जसा by श्रीगुरुजी
त्यांचे प्रतिसाद अन पोस्ट्स
In reply to बाजारगप्पा by कपिलमुनी
सेवा दल ई. गप्पा न सांगता
In reply to बाजारगप्पा by कपिलमुनी
एकाच पक्षातून
In reply to सेवा दल ई. गप्पा न सांगता by श्रीगुरुजी
आधीचे अनेक प्रयोग झालेल्या
In reply to एकाच पक्षातून by कपिलमुनी
पुरावा द्या
In reply to आधीचे अनेक प्रयोग झालेल्या by श्रीगुरुजी
त्यात काय गोल गोल फिरायचं? हा
In reply to पुरावा द्या by कपिलमुनी
गुर्जी, कपिलमुनी ह्यांचे
In reply to त्यात काय गोल गोल फिरायचं? हा by श्रीगुरुजी
याच "शाई रे शाई" या हातखंडा
In reply to गुर्जी, कपिलमुनी ह्यांचे by प्रचेतस
पुरावे द्या ना पण.
In reply to याच "शाई रे शाई" या हातखंडा by श्रीगुरुजी
नौटंकीतले सर्वजण एकाच पक्षाचे
In reply to पुरावे द्या ना पण. by प्रचेतस
तुम्ही स्वत: केलेल्या
In reply to याच "शाई रे शाई" या हातखंडा by श्रीगुरुजी
अगदी अपेक्षित प्रतिसाद!
In reply to तुम्ही स्वत: केलेल्या by कपिलमुनी
पुरावा द्याहो! बाकीचे नेहमीचे
In reply to अगदी अपेक्षित प्रतिसाद! by श्रीगुरुजी
या नौटंकीतील सर्वजण एकाच
In reply to पुरावा द्याहो! बाकीचे नेहमीचे by संदीप डांगे
म्हणजे जे पूर्वी झालंय तसंच
In reply to या नौटंकीतील सर्वजण एकाच by श्रीगुरुजी
केजरीवालांच्या बाबतीत तेच
In reply to म्हणजे जे पूर्वी झालंय तसंच by संदीप डांगे
म्हणजे उद्या कोणी त्यांना
In reply to केजरीवालांच्या बाबतीत तेच by श्रीगुरुजी
@ श्रीगुरुजी
In reply to म्हणजे उद्या कोणी त्यांना by संदीप डांगे
मोदींना परदेशात स्वत:ची
In reply to @ श्रीगुरुजी by मी-सौरभ
म्हणजे उद्या कोणी त्यांना
In reply to म्हणजे उद्या कोणी त्यांना by संदीप डांगे
अरे बास झाले. नाहीतर उजवीकडे
In reply to म्हणजे उद्या कोणी त्यांना by श्रीगुरुजी
त्यांच्या चेहर्यावरील लबाड
In reply to त्यात खोटे काय? ती मूळची by श्रीगुरुजी
गुरुजींना आमचे तुरीचे वरण
आता तुम्हि नुसतेच तुरीचे वरण देल ना भौ
भाकर देऊ पर ठेसा नाही भेट्न!!
In reply to आता तुम्हि नुसतेच तुरीचे वरण देल ना भौ by होबासराव
त्यैची असहिष्णुता साम्भायाले
In reply to भाकर देऊ पर ठेसा नाही भेट्न!! by कैलासवासी सोन्याबापु
समजा ठेच्याने वाढली सकाळची
In reply to त्यैची असहिष्णुता साम्भायाले by चिनार
आधी साधं वरण पचवा!! :D :D
In reply to समजा ठेच्याने वाढली सकाळची by श्रीगुरुजी
असहिष्णु प्रतिसाद!
In reply to आधी साधं वरण पचवा!! :D :D by कैलासवासी सोन्याबापु
:D :D असहिष्णु गुरूजी
In reply to असहिष्णु प्रतिसाद! by श्रीगुरुजी
मी असहिष्णु नाही आणि माझे
In reply to :D :D असहिष्णु गुरूजी by कैलासवासी सोन्याबापु
चेष्टा करतोय हो गुरूजी! आपण
In reply to मी असहिष्णु नाही आणि माझे by श्रीगुरुजी
बापू…
In reply to चेष्टा करतोय हो गुरूजी! आपण by कैलासवासी सोन्याबापु
धरा न मंग! तुम्हाले कोण मना
In reply to बापू… by चिनार
धरा न मंग!
In reply to धरा न मंग! तुम्हाले कोण मना by कैलासवासी सोन्याबापु
नाय पन तुमाले सांगा तं लागन
In reply to धरा न मंग! तुम्हाले कोण मना by कैलासवासी सोन्याबापु
कृपया हलके घ्या ऐवजी 'कृपया
In reply to बापू… by चिनार
चीमायबीन...बापु अन गुर्जीच
In reply to कृपया हलके घ्या ऐवजी 'कृपया by श्रीगुरुजी
(No subject)
चिकाटी
गुरूजींकडे पुरावा नाही
गुरुजी मिपावरचे केजरीवाल आहेत
In reply to गुरूजींकडे पुरावा नाही by कपिलमुनी
मी तुमच्याविषयी एकही वावगा
In reply to गुरुजी मिपावरचे केजरीवाल आहेत by संदीप डांगे
केजरीवाल ही शिवी आहे काय? मला
In reply to मी तुमच्याविषयी एकही वावगा by श्रीगुरुजी
केजरीवाल ही एक घाणेरडी शिवी
In reply to केजरीवाल ही शिवी आहे काय? मला by संदीप डांगे
केजरीवाल ही एक घाणेरडी शिवी
In reply to केजरीवाल ही एक घाणेरडी शिवी by श्रीगुरुजी
केजरीवालांवर शाई फेकणारी
In reply to गुरूजींकडे पुरावा नाही by कपिलमुनी
सर्वत्र उघड झाले
In reply to केजरीवालांवर शाई फेकणारी by श्रीगुरुजी
@ डांगे ब्वा अन कपिलमुनी
बरं बुवा. असहिष्णु तर
In reply to @ डांगे ब्वा अन कपिलमुनी by कैलासवासी सोन्याबापु
अजिबात नाही,
जबराट प्रतिसाद !!
In reply to अजिबात नाही, by कैलासवासी सोन्याबापु
अॅट बुल्ल्स आय!
In reply to अजिबात नाही, by कैलासवासी सोन्याबापु
केजरीवाल ह्यांचे नाव "शिवी"
In reply to अजिबात नाही, by कैलासवासी सोन्याबापु
केजरीवाल ही शिवी आहे की नाही
In reply to केजरीवाल ह्यांचे नाव "शिवी" by श्रीगुरुजी
केजरीवाल ही शिवी आहे की नाही
In reply to केजरीवाल ही शिवी आहे की नाही by संदीप डांगे
अनुमोदन +++११११
In reply to अजिबात नाही, by कैलासवासी सोन्याबापु
गुरूजी कोपरापासुन नमस्कार
आमचाही. _____________/\______
In reply to गुरूजी कोपरापासुन नमस्कार by कैलासवासी सोन्याबापु
छान
In reply to आमचाही. _____________/\______ by संदीप डांगे
पुरावा न देता
पुरावा पहिल्या दिवसापासून
In reply to पुरावा न देता by कपिलमुनी
तुमच्या शिवाय
In reply to पुरावा पहिल्या दिवसापासून by श्रीगुरुजी
या प्रसंगाची मालिका
In reply to तुमच्या शिवाय by कपिलमुनी
लक्षात येणे , स्पष्ट असणे
In reply to या प्रसंगाची मालिका by श्रीगुरुजी
वरील शाईप्रकरणातील घटना व
In reply to लक्षात येणे , स्पष्ट असणे by कपिलमुनी
पुरावा
असं कुणी म्हटलंय का?
In reply to पुरावा by ट्रेड मार्क
शाई फेकल्याफेकल्या लगेचच
In reply to असं कुणी म्हटलंय का? by संदीप डांगे
त्यांचे ते बिनबुडाचे आणि
In reply to शाई फेकल्याफेकल्या लगेचच by श्रीगुरुजी
म्हणजे काय?
In reply to त्यांचे ते बिनबुडाचे आणि by प्रचेतस
आरोप ओ.
In reply to म्हणजे काय? by श्रीगुरुजी
=)) =))
In reply to आरोप ओ. by प्रचेतस
कोणते आरोप बिनबुडाचे होते?
In reply to आरोप ओ. by प्रचेतस
आआपवाल्यांचे.
In reply to कोणते आरोप बिनबुडाचे होते? by श्रीगुरुजी
संपादक मंडळ
एक मजेशीर बातमी सापडली. अरूण
नथींग राँग.
In reply to एक मजेशीर बातमी सापडली. अरूण by श्रीगुरुजी
:
युगपुरुष कलियुगि हरीश्चंद्र
केजरीवाल टॉप ५० लीडर्समध्ये
टायपो झाला
In reply to केजरीवाल टॉप ५० लीडर्समध्ये by कपिलमुनी
दिल्लीत १ जानेवारी ते १५
In reply to केजरीवाल टॉप ५० लीडर्समध्ये by कपिलमुनी
या यादीतील जगातील ग्रेटेस्ट
In reply to दिल्लीत १ जानेवारी ते १५ by श्रीगुरुजी
युगपुरूषांचे दोन फोटो
कल्पना करा...
In reply to युगपुरूषांचे दोन फोटो by गॅरी ट्रुमन
त्या पन्नास प्रभावी व्यक्तीत फेकूशेट कुठेच नाहीत
=))
In reply to त्या पन्नास प्रभावी व्यक्तीत फेकूशेट कुठेच नाहीत by विवेक ठाकूर
गुलाम नं १ आणि गुलाम नं २ कोण ते.
हात धोना
युगपुरुष ह्यांना काल पुन्हा
'रोज मरे त्याला कोण रडे' अशी
In reply to युगपुरुष ह्यांना काल पुन्हा by होबासराव
जर्नेल सिंग विषयि माहित नव्हत
In reply to 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी by श्रीगुरुजी
जर्नेल सिंग विषयि माहित नव्हत
In reply to जर्नेल सिंग विषयि माहित नव्हत by होबासराव
आचार्य अत्रे उवाच--
In reply to युगपुरुष ह्यांना काल पुन्हा by होबासराव
Run with the hare and hunt with the hounds
अजून गंमत अशी की आता हे
In reply to Run with the hare and hunt with the hounds by गॅरी ट्रुमन