पॉर्नची गरज आहे का?
पॉर्नची गरज आहे का?
या धाग्याचे मुळ अर्थात अदिती ताइंच्या धाग्यात आहे.
पॉर्न म्हणजे अश्लील साहित्य असे मराठी शब्दकोषात भाषांतर आहे. यात साहित्य म्हणजेच पुस्तके, चित्रे , चित्रफिती आणी चित्रपट असे सर्व साहित्य अध्याहृत आहे.
संस्कृती रक्षक लोकांच्या दृष्टीने "हा" अब्रम्हण्यम असा शब्द आहे. याची गरजच काय पासून यावर संपूर्ण बंदी असावी असे मानणारे लोक आहेत आणी पॉर्न हे सर्व वय, भाषा आणी धर्मियांना सदा सर्वकाळ खुले आणी फुकट असावे असे मानणारा गट हि आहे.
काहींच्या मते हे अब्रम्हण्यम नसले तरीही निरर्थक आहे आणी याची गरज नाही.
सत्य कदाचित या सर्वांच्या मध्ये आहे.
बासनात गुंडाळून माळ्यावर ठेवण्याच्या विषयाचा वैद्यकीय दृष्टीने आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.
अश्लील साहित्याची गरज पडते(च) का? आणि पडत असल्यास का पडते?
पहिली गोष्ट म्हणजे सेक्स हा विषय मध्य युगापासून गुपचूप अंधारात करण्याचा (किंवा उरकण्याचा) झाला आहे. यामुळे पौगंडावस्थेत आपल्या लैंगिकतेचा खरा शोध तरुण किंवा तरुणींना कसा आणि कुठे घ्यायचा हे समजेनासे होते. याची सुरुवात चावट विनोदातून होते.
त्यातून बायकांची परिस्थिती "कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली" अशी असते. करावेसे/ पाहावेसे/ ऐकावेसे तर वाटते पण चार चौघात बोलायला लाज वाटते आणि ते पाहताना पकडले गेलो तर आपल्या अब्रूचे धिंडवडे निघतील अशी भीती. थोड्या फार प्रमाणात हीच स्थिती पुरुषांची असते.
अश्लील साहित्य म्हणजे काय? हे काही त्रिकालाबाधित सत्य नव्हे.
म्हणजे जी गोष्ट आज बोलली जाऊ शकते तीच एके काळी अशक्य होती. म्हणजे एके काळी एखाद्या मुलीचा हात सुद्धा हातात घेणे "अब्रम्हण्यम' आणि अश्लील होते. त्यानंतर जोडप्याने मिठी मारणे किंवा चुंबन घेणे हे अब्रम्हण्यम होते. तेंव्हा कमी कपडे घालणे हे फक्त खलनायिका किंवा नायकीण करत असे. आता सिनेमात नायिका जे तोकडे कपडे घालतात ते काही काळापूर्वी सिनेमात वेश्यासुद्धा घालणे अशक्य होते. थोडक्यात काल जे अश्लील होते ते आज राजरोस/ समाजमान्य असू शकते.
मग या अश्लील साहित्याची गरज आताच जास्त का वाटते किंवा आताच जास्त का दिसू शकते? (हा संदर्भ मुख्यत्वेकरून भारताबद्दल आहे.)
काही दशकांपूर्वी मुलगे आणि मुलींची वयात होण्यापूर्वीच आणि स्त्रीपुरुष संबंध काय हे समजण्यापूर्वीच लग्ने होत. त्यामुळे या "विषया"विषयी नाविन्य राहत नसे. शिवाय तेवढे साहित्य सहजपणे उपलब्ध नव्हते आणि असले तरी ते समाजमान्य नव्हते. समाजात दांभिकपणा पण बराच होता.आज नाही असे म्हणवत नाही. अश्लील साहित्य सहज उपलब्ध नव्हते पण बहु भार्या अंगवस्त्र, देवदासी सारख्या प्रथा असल्याने श्रीमंत लोकांना हे सर्व उपलब्ध होते. मात्र स्त्रियांची कुचंबणाच होती.
आता बदलत्या काळानुसार लग्ने उशिरा होत आहेत. मुलगे कमवायला लागेपर्यंत आणि मुली वयात येउन काही वर्षे जाईपर्यंत लग्न होत नाही. परंतु आजही विवाहपूर्व संबंध हे भारतीय समाजाला अमान्य आहेत. विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण तर जबरदस्त असते. या लैंगिकतेला वाट देण्याचे काम अश्लील साहित्य करते.पण एक तर हि गोष्ट चोरून करावी लागते किंवा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागते.
या साहित्याचा अविवाहित स्त्री किंवा पुरुषांना आपल्या भावना मोकळ्या करण्याच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो.
पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत असे ठाकूर साहेब त्या धाग्यात म्हणतात
पण त्यानी लिहिले आहे ती म्हणजे उ. झाकीर हुसेन आणि पं. शिवकुमार शर्मा यांची मैफिल आहे. दोघेही दिग्गज आणि समसमा असतात.
प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अर्धवटराव आणि आवडाबाई यांची मैफिल असते. दोघांच्या तारा जुळून येण्यास फार कष्ट लागतात. लग्न झाल्यावर चार गुलाबी दिवस संपले कि व्यवहार सुरु होतो. अर्धवट रावांना आवडाबाईचे आणि आवडाबाईना रावांचे "गुण" दिसायला लागतात. मग घरातील कामातून वेळ काढून प्रणय फुलवायचा तर दोघांच्या तर एकत्र जुळल्या पाहिजेत. अभियांत्रिकी भाषेत सांगायचे झाले तर पुरुष पेट्रोल इंजिन सारखे असतात चावी दिली कि चालू. तर स्त्रिया म्हणजे टर्बो चार्जड डीझेल इंजीनासारख्या असतात. पहिल्यांदा ग्लो प्लग लावून इंजिन गरम करायला लागते आणि मग इंजिन सुरु झाले तरीही टर्बो चार्जर १८०० आर पी एम येईपर्यंत चालू होत नाही. पण एकदा टर्बो चार्जर चालू झाला कि मग इंजिन पूर्ण ताकदीने वेग घेते.म्हणजेच स्त्रियांचा आणि पुरुषांचा उद्दीपित होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो.
वंध्यत्व या विषयात काम करीत असल्याने बर्याच वेळेस या प्रश्नाशी संबंध येतच असतो. मुल होण्यासाठी विशिष्ट वेळेत(२४ तासात) संबंध ठेवणे आवश्यक असते. तेंव्हा रुग्ण पुरुष बर्याच वेळेस अशी तक्रार करताना आढळतात कि डॉक्टर मला तिच्याबद्दल आकर्षण वाटत नाही.( लिंग उत्थान होत नाही ERECTILE DYSFUNCTION--ED). काही लोकांनी हे पण सांगितले कि "सर बायकोच्या जवळ गेलो तर ती थंड गोळ्यासारखी पडलेली असते. तिच्या घामट गार अंगाला हात पण लावावासा वाटत नाही". हे जरी आपल्याला विचित्र वाटत असेल तरीही जर तो माणूस तुम्हाला त्याच्या भावना सांगत असेल तर ते सत्य मानायलाच लागते.अशा माणसाना मग तुम्ही पॉर्न पहा आणि लगेच संबंध ठेवा असे सुचित करावे लागते. ज्यावेळेस माणूस शुक्राणू दान करतो किंवा शुक्राणू तपासणी केली जाते अशा लैब मध्ये बंद खोलीत कुणी पाहत आहे अशा परिस्थितीत पुरुषांना लिंग उत्थान होणे कठीण जाते. अशा ठिकाणी मग अश्लील साहित्य प्रकार उपलब्ध करून द्यावे लागतात.
नवरा बायको मध्ये बर्यापैकी समन्वय असेल तरीही विशाल किंवा विराट महिला असेल तर पुरुषाला आकर्षण कमी होते हि वस्तुस्थिती आहे. बर्याचशा या स्थूल महिला PCOS या आजाराच्या बळी असतात ज्यामुळे त्यांना मुल होत नसते. त्यांना वजन कमी करायला सांगूनहि बर्याच वेळेस ते कमी होत नाही. मग तो नवरा काय करणार? त्याला तर सांगितल्या दिवशी संबंध ठेवणे आवश्यक असते. आणी हे फार यांत्रिक होत जाते. ( एखाद्या कवीस सांगणे कि आत्ता तू उगवत्या सूर्यावर कविता कर).
बायका सुद्धा आपल्या गैर/ विचित्र समजुती आणी पूर्वग्रह घेऊन आलेल्या असतात. बायकांनी संबंधात सुख शोधणे चूक आहे किंवा जे काय करायचे ते पुरुषांनीच करायचे असते आणी बायकांनी थंड पडून राहायचे.
अशी जर स्त्री एखाद्याला बायको मिळाली( दुर्दैवाने याचे प्रमाण खूप जास्त आहे)तर त्या माणसाने कुठे जायचे? स्त्री थंड पडून असेल तर पुरुष तणावाखाली असतो आणि मग त्यातून शीघ्र पतन( premature ejaculation) होते. अशा स्त्रिया नंतर तक्रार करताना आढळतात कि यांना माझ्यात रसच नाही.किंवा अशा बायका नवर्याला टोचून बोलताना दिसतात कि तुम्ही मर्दच नाही. अशा माणसांनी काय करायचे? बायकोच्या जवळ गेले तर थंड गोळ्याशी शृंगार करणे कठीण. शिवाय मानसिक तणावामुळे शीघ्रपतन होईल हि भीती. अशा दुहेरी तणावात असलेला माणूस जेंव्हा पॉर्न पाहतो तेंव्हा त्याला आपल्याला (ERECTILE DYSFUNCTION--ED) नाही हे तर कळून येते. अर्थात याला PARTNER SPECIFIC ERECTILE DYSFUNCTION म्हणतात.
बर्याच वेळेस बरेच दिवस संबंध न ठेवण्याने नवरा बायकोतील संबंध ताणले जातात. त्यात बायको संशयी असली तर तिला सारखे वाटत असते कि पुरुष असून संबंध ठेवायला नाकारतो म्हणजे दुसरीकडे कुठे तरी जाऊन "हलका" होऊन येत असेल. असे होऊ नये म्हणून मग माणसे पॉर्न बघून उत्तेजित होऊन येतात. त्यामुळे संबंध ठेवणे सोपे जाते.
उलट एखाद्याची बायको जास्त सुंदर असेल किंवा वय झाले तरी आपला "फॉर्म" टिकवून असेल तर नवर्याला स्वतःला कठीण जात असेल तरी बायको "हातातून जाऊ नये "म्हणून तिला "सुखात" ठेवणे आवश्यक असते. नवरा आणी बायको यांच्या वयात फार जास्त अंतर असेल किंवा नवर्याला मधुमेह असेल तर त्यामुळेहि ERECTILE DYSFUNCTION होते अशा वेळेस पॉर्न पाहून उत्तेजित होता येते.
एक उदाहरण म्हणून-- मी मुंबईत मोठ्या रुग्णालयात पुरुष वंध्यत्व वर काम करीत असताना झैरे या आफ्रिकी देशातील एका टोळीचा ६० वर्षाचा प्रमुख ERECTILE DYSFUNCTION च्या इलाजासाठी आला होता. मी त्याला विचारले कि आता ६० वयाला तुम्हाला काय हवे आहे त्यावर त्याचे म्हणणे होते कि माझी चौथी बायको १८ वर्षांची आहे मी जर तिला "सुखात" ठेवू शकलो नाही तर ती मला सोडून जाईल. हे अर्थात टोकाचे उदाहरण आहे.
परंतु फार मोठ्या प्रमाणावर पुरुष लिंग उत्थान होत नाही हि तक्रार घेऊन येतात.यात हे कारण मानसिक आहे कि शारीरिक आहे हे जाणण्यासाठी त्यांना एक साधा प्रश्न विचारला जातो कि अश्लील साहित्य पाहिल्यावर लिंग उत्थान होते का? हे जर होत असेल तर तो प्रश्न बहुतांशी मानसिक असतो.
ठाकूर साहेब म्हणतात "पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका"
असे नाही कारण सर्वांच्या बायका काही सनी लिओन नसतात.बायकोची फिगर ३४- २६-३६ हवी असते. पण असते मात्र ३२ -३६- ४० मग आपल्या बायको बरोबर शृंगार करताना लोक कल्पना विलासाचा आधार घेतात. आपण कोणत्याही नटीशी शृंगार करीत आहोत हि कल्पना करून त्यांना आणी त्यांची बायकोला जर आनंद मिळत असेल तर त्यात गैर काय? अर्थात याला पोर्नच पाहिजे असे नाही. दोन पेग दारू प्यायली कि लोकांचे विमान आकाशात तरंगायला लागते आणी कल्पनाविलास होऊ शकतो.
प्रत्यक्षात स्त्रिया कल्पना विलासात पुरुषांपेक्षा जास्त रमतात. त्यामुळे त्यांना पॉर्नची संबंध ठेवताना "आवश्यकता" भासत नाही. कारण एक तर प्रत्यक्ष संबंधात त्यांचा सहभाग हा सक्रीय नव्हे तर निष्क्रिय असला तरी चालू शकतो. शिवाय पूर्वग्रह आणी गैर समजुतींमुळे पॉर्न हे स्त्रीने पहायचेच नाही अशा पगड्याखाली असत्तात. परंतु प्रत्यक्ष शृंगार करताना डोळे मिटून आपण ह्रितिक रोषन किंवा जॉन अब्राहम बरोबर शृंगार करीत आहोत या कल्पना विलासात रमू शकतात. पण त्यांना विचारले तर ९० % स्त्रिया GUILT ( दोषित्व)मुळे आम्ही कल्पना विलासात रमतो हे अमान्य करतील.
१००% पुरुष पॉर्न बघतात आणी बहुसंख्य( कदाचित १००%)कल्पनाविलासात( FANTASY) रमतात तर बहुसंख्य( कदाचित १००% स्त्रिया कल्पनाविलासात रमतात हि वस्तुस्थिती आहे.
परंतु पॉर्नचे DECRIMINALISATION करणे आवश्यक आहे असे मात्र जरूर वाटते.
हा विषय फार गहन आहे आणी बरेच मुद्दे यात राहून गेले असतील. पण जशी चर्चा पुढे जाईल तेंव्हा आठवेल तसे मी त्यात भर घालेन.
वाचने
120353
वाचनखूण
प्रतिक्रिया
292
पण त्यानी लिहिले आहे ती
In reply to पण त्यानी लिहिले आहे ती by पिलीयन रायडर
@जमिनीवर काय घडते ह्याची
उत्तम लेख
डॉक्टर साहेब,
In reply to डॉक्टर साहेब, by कैलासवासी सोन्याबापु
मी वैद्यकीय अभ्यासक नाही हे प्रथम सांगतो
In reply to डॉक्टर साहेब, by कैलासवासी सोन्याबापु
अल्टरनेटिव न्यूरल पाथ तयार
In reply to अल्टरनेटिव न्यूरल पाथ तयार by सुबोध खरे
माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार.
उघडपणे चर्चिल्या न जाणा-या
जाम म्हंजे जाम आवडला
In reply to जाम म्हंजे जाम आवडला by चलत मुसाफिर
अगदी शुभेच्छा
उत्तम लेख.
डॉक्टर साहेब अत्यंत संतुलित मांडणी आवडली.
In reply to डॉक्टर साहेब अत्यंत संतुलित मांडणी आवडली. by मारवा
+१
In reply to डॉक्टर साहेब अत्यंत संतुलित मांडणी आवडली. by मारवा
सहमत आहे
रोजच्या जीवनाशी निगडित
In reply to रोजच्या जीवनाशी निगडित by डॉ सुहास म्हात्रे
सहमत आहे.
डॉ. रॉक्स!!
एक गैरसमज पॉर्न विषयी
खास स्त्रीयांसाठी बनवलेल्या
फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित
In reply to फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित by प्राची अश्विनी
@प्राचि अश्विनी ,तुमचे
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
काकासाहेब,
In reply to काकासाहेब, by संदीप डांगे
केंजळे जी
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
काकासाहेब केंजळे उर्फ नाना साहेब नेफळे
In reply to काकासाहेब केंजळे उर्फ नाना साहेब नेफळे by होबासराव
@संदीप डांगे,@ होबासराव, आपण
In reply to @संदीप डांगे,@ होबासराव, आपण by काकासाहेब केंजळे
काकासाहेब, जरा विदा काढा. मग
In reply to @संदीप डांगे,@ होबासराव, आपण by काकासाहेब केंजळे
नारायण दत्ता तिवारी, तहेलकाचा तरुण तेजपाल?
In reply to @संदीप डांगे,@ होबासराव, आपण by काकासाहेब केंजळे
!
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
काकासाहेब तुमचा हा प्रतिसाद
In reply to काकासाहेब तुमचा हा प्रतिसाद by डॉ सुहास म्हात्रे
सहमत.
In reply to सहमत. by संदीप डांगे
+1
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
@ काकासाहेब केंजळे ,
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
विनोद?
In reply to @प्राचि अश्विनी ,तुमचे by काकासाहेब केंजळे
काकासाहेब
In reply to फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित by प्राची अश्विनी
विशेषत; low income group.
In reply to विशेषत; low income group. by सूड
@ सूड,
In reply to @ सूड, by प्राची अश्विनी
प्रत्येक पुरुष( वय १५ ते ७५ )
In reply to प्रत्येक पुरुष( वय १५ ते ७५ ) by सुबोध खरे
सहमत.
In reply to प्रत्येक पुरुष( वय १५ ते ७५ ) by सुबोध खरे
माझा एक गम्तीशीर अनुभव
In reply to @ सूड, by प्राची अश्विनी
"पॉर्न बघणारा माणूस बलात्करी
In reply to "पॉर्न बघणारा माणूस बलात्करी by सूड
आता गंमत वाटेल...
In reply to फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित by प्राची अश्विनी
सुबोध'जी... अतिशय सुन्दर आणि
In reply to फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित by प्राची अश्विनी
पॉर्न बघण्यामुळे बलात्कारात
In reply to फार महत्त्वाचा आणि व्यवस्थित by प्राची अश्विनी
अपूरा तर्क
In reply to अपूरा तर्क by माहितगार
प्रतिसाद आवडला. अगदी
In reply to अपूरा तर्क by माहितगार
@ सूड,
चांगला धागा आहे.
सुबोधजी, धाग्याबद्दल धन्यवाद !
In reply to सुबोधजी, धाग्याबद्दल धन्यवाद ! by विवेक ठाकूर
ठाकूर साहेब,
In reply to ठाकूर साहेब, by डॉ सुहास म्हात्रे
सुहासजी,
In reply to सुहासजी, by विवेक ठाकूर
साहेब,
In reply to साहेब, by डॉ सुहास म्हात्रे
सुहासजी आणि सुबोधजी !
In reply to सुहासजी आणि सुबोधजी ! by विवेक ठाकूर
महत्वाचे : जीवनातली उत्त्तम
In reply to सुहासजी आणि सुबोधजी ! by विवेक ठाकूर
क्या बात हैं, सर..
वैद्यकिय असली तरी पोर्नची ही
In reply to वैद्यकिय असली तरी पोर्नची ही by संदीप डांगे
अत्यंत योग्य विचारसरणी !
In reply to अत्यंत योग्य विचारसरणी ! by विवेक ठाकूर
डांगे साहेब आणि ठाकूर साहेब
In reply to डांगे साहेब आणि ठाकूर साहेब by सुबोध खरे
तुम्हीच मागे एका धाग्यावर ही
In reply to तुम्हीच मागे एका धाग्यावर ही by संदीप डांगे
प्रस्तुत प्रतिसाद पुरुषांच्या
In reply to तुम्हीच मागे एका धाग्यावर ही by संदीप डांगे
संदीप, तुमच्या विचारसरणीला पुन्हा एकवार दाद देतो!
In reply to संदीप, तुमच्या विचारसरणीला पुन्हा एकवार दाद देतो! by विवेक ठाकूर
बाकी सर्व ठिक आहे. फक्त...
In reply to बाकी सर्व ठिक आहे. फक्त... by संदीप डांगे
@ संदीप डांगे
In reply to @ संदीप डांगे by विवेक ठाकूर
उत्तर माहिती असतांना प्रश्न
In reply to उत्तर माहिती असतांना प्रश्न by संदीप डांगे
तसे असतील तर दाखवून द्यावेत ?
In reply to तसे असतील तर दाखवून द्यावेत ? by विवेक ठाकूर
आर्र्रारा... लैच कंफुजन है
In reply to आर्र्रारा... लैच कंफुजन है by संदीप डांगे
माझ्या विधानांसंबंधी तुमचा
In reply to माझ्या विधानांसंबंधी तुमचा by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसाद पटला. तुमची भूमिका
In reply to संदीप, तुमच्या विचारसरणीला पुन्हा एकवार दाद देतो! by विवेक ठाकूर
साधारण परिस्थितीत संभोगोत्सुक
In reply to तुम्हीच मागे एका धाग्यावर ही by संदीप डांगे
संदीप जी
मला वेश्यांचा अनुभव नाही पण जेवढे ऐकले, बघितले त्यावरून असे समजते की तिथेही सनी लियोन नसतात. (संपादित)तुमच्या वरील विधानाला काही आधार विदा आहे का ? सनी लियोनी ही कलाकार आहे पॉर्न चित्रपटात काम करते म्हणजे.....असेलच असा विचार करत असाल तर ठीकच आहेIn reply to संदीप जी by मारवा
सनी लियोन
In reply to सनी लियोन by पैसा
+१११११११११
In reply to सनी लियोन by पैसा
+१११११ सहमत.
In reply to +१११११ सहमत. by खटपट्या
प्रतिसादाला १११
In reply to संदीप जी by मारवा
मारवाजी,
In reply to तुम्हीच मागे एका धाग्यावर ही by संदीप डांगे
लठ्ठ लोकांना व्यायाम, योगासने
In reply to लठ्ठ लोकांना व्यायाम, योगासने by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब,
In reply to डॉक्टरसाहेब, by संदीप डांगे
तुम्ही 'असामान्य परिस्थितीत
In reply to तुम्ही 'असामान्य परिस्थितीत by सुबोध खरे
ओके. गॉट इट. मला वाटले होते
वाचतेय
पाेर्न विना प्रणय उत्कृट होऊ
पाॅर्न जास्त पाहिल्याने तेही पाहणे नकोसे वाटते.
मी पाहत नाही फक्त सांगतोय.
वोक्के काका
डॉक, या विषयावर आलेले आपले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्रमनोवस्था अत्यंत महत्त्वाची.
माहितीपूर्ण लेख आहे. धन्यवाद.
याच विषयावर थोडेसे...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्रIn reply to याच विषयावर थोडेसे... by मदनबाण
मदन बाण माहीतीपुर्ण प्रतिसाद आवडला
लेख आवडला!
मस्त धागा.....
आभार.
लेख आवडला. ह्या महत्वाच्या
माहितीपर लेख,
अतिशय चांगले विवेचन.
अर्थशास्त्रातला महत्वाचा -
In reply to अर्थशास्त्रातला महत्वाचा - by बोका-ए-आझम
सहमत
In reply to सहमत by चलत मुसाफिर
चलत मुसाफिर साहेब
In reply to चलत मुसाफिर साहेब by सुबोध खरे
बाकी सर्व ठिक आहे.
In reply to अर्थशास्त्रातला महत्वाचा - by बोका-ए-आझम
बोकोबा प्रतिसाद मार्मिक आहे
In reply to अर्थशास्त्रातला महत्वाचा - by बोका-ए-आझम
साशंकता
पॉर्न चे आपले दुष्परिणामही
In reply to पॉर्न चे आपले दुष्परिणामही by सुबोध खरे
सहमत. हाही प्रतिसाद आवडला.
उत्तम
धाग्यातले विचार आणि
In reply to धाग्यातले विचार आणि by गवि
उगीच विदा वगैरे गोळा करुन
In reply to उगीच विदा वगैरे गोळा करुन by विवेक ठाकूर
निष्कर्ष अजुन नाही आला मग तो निरुपयोगी कसा?
In reply to निष्कर्ष अजुन नाही आला मग तो निरुपयोगी कसा? by नया है वह
:-)
In reply to धाग्यातले विचार आणि by गवि
मला पण
माझ्या आवडत्या लेखिका इरावती
In reply to माझ्या आवडत्या लेखिका इरावती by Anand More
इरावती कर्वे ना सलाम
In reply to इरावती कर्वे ना सलाम by चौकटराजा
काही मुद्दे त्यांचे तर बरेच
लेख आवडला.
चर्चा आवडली
उत्तम लेख !
पोर्नऐवजी समर्थ पर्याय उपलब्ध
In reply to पोर्नऐवजी समर्थ पर्याय उपलब्ध by टवाळ कार्टा
लेख उत्तम असल्याची पावती
In reply to लेख उत्तम असल्याची पावती by टवाळ कार्टा
टवाळा आवडे पोर्न
In reply to टवाळा आवडे पोर्न by Anand More
i like erotic porn...so? what
In reply to i like erotic porn...so? what by टवाळ कार्टा
no point … समर्थ रामदास आज
In reply to no point … समर्थ रामदास आज by Anand More
चील :)
काही गोष्टी महत्त्वाच्या
In reply to काही गोष्टी महत्त्वाच्या by सुबोध खरे
सहमत. प्रतिसाद आवडला.
अगरबत्ती प्रणय वाले एक गोष्ट लक्षात घेत नाहीत.
In reply to अगरबत्ती प्रणय वाले एक गोष्ट लक्षात घेत नाहीत. by मारवा
चांगला मुद्दा दिलात मारवाजी,
In reply to अगरबत्ती प्रणय वाले एक गोष्ट लक्षात घेत नाहीत. by मारवा
उत्तम प्रतिसाद !
हनिमुन ला का जातात मग ? कारण एक वातावरण निर्मीती हवी असते.हा कळीचा प्रश्न आहे ! "मला अमुक आवडते, तमुक नाही" हे ठीक आहे. पण जेव्हा "मला अमुक अमुक आवडते आणि तेच सर्वोत्तम आहे. ते सोडून इतर काही आवडणारे सगळे तद्दन बिचारे व अज्ञानी आहेत" असा विचार ठाम होतो तेव्हा स्वमतांध अतिरेकाकडे वाटचाल सुरू होते. "जगातली सगळी माणसे एकाच साच्यातून बनवली जात नाहीत आणि एकाच साच्यात बसवताही येत नाहीत." हे पायभूत सत्य नीट न समजल्यानेच या जगातले बहुतेक गैरसमज जन्माला येतात.In reply to उत्तम प्रतिसाद ! by डॉ सुहास म्हात्रे
सुहासश्री, एकदा थांबतो म्हटल्यावर मग
अजिबात दांभिकता नसणारा
हा हा हा! मस्त धागा!
In reply to हा हा हा! मस्त धागा! by तर्राट जोकर
हा हाहा
हा लेख प्राचीनांचा लैंगिकते कडे बघण्याचा सुंदर दृष्टीकोण दाखवतो
यशोधर असे सांगतो की ज्या शय्येवर नागरक आपल्या पत्नीबरोबर शृंगार करतो त्या वापरलेल्या शय्येवर न झोपणे हा शिष्टाचार. ह्यासाठी दोन शय्यांची ही सोय. गणिकेबरोबरचा शृंगार झोपण्याच्याच शय्येवेर केलेला चालत असे. शय्येच्या मागे नागरकाच्या देवांच्या मूर्ति आणि रात्री वापरून उरलेला चंदनलेप, फुलांच्या माळा, मेण ठेवण्याचा करंडा, घामाचा वास येऊ नये म्हणून वापरायची सुगन्धी द्रव्ये, तमालपत्रे, तोंडाला वास येऊ नये ह्यासाठी मातुलुंग ह्या लिंबाच्या जातीच्या फळाची साले आणि खाण्यासाठी ताम्बूल - पानांचे विडे - ठेवण्यासाठी जडावाचे लहान मेज असावे. जमिनीवर मुखरस सोडण्यासाठी तस्त - पतत्ग्रह - असावे. भिंतीवर हत्तीच्या दाताच्या खुंटीवर - नागदन्त - गवसणीमध्ये घातलेली वीणा, चित्र काढण्याचा फलक, रंगांच्या कांडयांची गुंडाळी, एखादे पुस्तक आणि कुरण्टकाच्या फुलांच्या (Amaranth) माळा असाव्यात. कुरण्टकाची फुले शय्येवर वापरण्याचे कारण यशोधर देतो ते असे की ही फुले लवकर कोमेजत नाहीत. शय्येपासून फार दूर नाही असे अस्तरण जमिनीवर असावे आणि तेथे डोके टेकायला तक्के असावेत. फाशांनी खेळायचे आणि सोंगट्यांनी खेळायचे फलक असावेत. एका बाजूस विणण्याची आणि लाकडावर कोरीव काम करण्याची उपकरणे असावीत. बाहेरच्या बाजूस पोपट-मैना-सारिका अशा क्रीडापक्ष्यांचे पिंजरे असावेत. वृक्षवाटिकेमध्ये दाट सावलीच्या जागी अस्तरण घातलेला झोपाळा असावा.तेथून परतल्यावर ताम्बूलसेवन करावे, चन्दनाची उटी एकमेकांस लावावी आणि काही अल्पोपहार करावा. त्यामध्ये फळांचा रस, तळलेले पदार्थ, आंबवलेली तांदुळाची कांजी, मांसाच्या तुकडयांसह सूप, सुके मांस, साखरेसह संत्र्यासारखी फळे, इत्यादींचा समावेश असावा. नायकाने सहचरीसह सौधावर बसून चन्द्रप्रकाशाचा आनंद घ्यावा आणि ध्रुव, अरुन्धती, सप्तर्षि इत्यादि तारे ओळखावेत.पॉर्न सारख्या इतक्या "सोवळ्या
@संपादक मंडळ,
In reply to @संपादक मंडळ, by संदीप डांगे
@ संदीप डांगे
In reply to @ संदीप डांगे by मृत्युन्जय
परत तेच होतंय हो. सनी लियोन
चर्चेतला महत्त्वाचा सर्वोपयोगी मुद्दा !
In reply to चर्चेतला महत्त्वाचा सर्वोपयोगी मुद्दा ! by विवेक ठाकूर
प्रश्न सांगा, सोडवण्याचा
In reply to प्रश्न सांगा, सोडवण्याचा by संदीप डांगे
सुरेख स्टार्ट !
In reply to सुरेख स्टार्ट ! by विवेक ठाकूर
असो, थोडक्यात सांगतो
In reply to असो, थोडक्यात सांगतो by विवेक ठाकूर
सरजी, ह्याचे उत्तर तुम्हीच
In reply to सरजी, ह्याचे उत्तर तुम्हीच by संदीप डांगे
म्हणजे इतक्या महत्त्वाच्या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर नाही,
In reply to म्हणजे इतक्या महत्त्वाच्या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर नाही, by विवेक ठाकूर
ओके. धन्यवाद! अति होतंय.
In reply to म्हणजे इतक्या महत्त्वाच्या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर नाही, by विवेक ठाकूर
बाप रे शब्दछल
In reply to बाप रे शब्दछल by चैतन्य ईन्या
तुम्हाला त्यांनी केलेल्या शेरेबाजीचं काहीही वाटत नाही
In reply to तुम्हाला त्यांनी केलेल्या शेरेबाजीचं काहीही वाटत नाही by विवेक ठाकूर
हा निष्कर्श कुठून काढला?
In reply to तुम्हाला त्यांनी केलेल्या शेरेबाजीचं काहीही वाटत नाही by विवेक ठाकूर
निष्कर्ष
जयकांत शिक्रे
सरांचे नेहमीप्रमाणेच सुंदर
भेंडी...जे लोक म्हणतात पोर्न
In reply to भेंडी...जे लोक म्हणतात पोर्न by टवाळ कार्टा
लोकांना बाकीची पण कामं आहेत,
In reply to लोकांना बाकीची पण कामं आहेत, by सूड
तू गप्रांव