तुझे मजवरी भाळणे ते अवेळी
लेखनविषय:
काव्यरस
या आधीच्या कवितेच्या वेळी पैसाताईने तक्रार केली की विशालकडून अशा कवितेची सवय नाही. ;) त्यामुळे ही भुजंगप्रयात वृत्तातली गझल :)
तुझे लाघवी बोलणे ते अवेळी
तुझे विभ्रमी हासणे ते अवेळी
जसे पावसाचे अकाली बरसणे
तुझे आर्जवी वागणे ते अवेळी
लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने
तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी
सखे आप्त एकांत हा फक्त माझा
तुझे मजवरी भाळणे ते अवेळी
नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती
तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी
मिटे आसही या क्षणी ऐहिकाची
तुझे मंद घोटाळणे ते अवेळी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा
वृत्त : भुजंगप्रयात
वाचने
10215
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
छान आहे, गंमत म्हणजे मना सज्जना भक्तिपंथेची जावे या चालीवर पण बसतेय!
मनाचे श्लोक पण भुजंगप्रयात मध्येच आहेत का?
सखे आप्त एकांत हा फक्त माझा
तुझे मजवरी भाळणे ते अवेळी इथे "त"ची पुनरावृत्ती मस्तच झालेली आहे. त्याला अनुप्रास म्हणतात नं?
In reply to छान आहे, गंमत म्हणजे मना by मांत्रिक
होय.
In reply to छान आहे, गंमत म्हणजे मना by मांत्रिक
तुझे मजवरी भाळणे ते अवेळी इथे "त"ची पुनरावृत्ती मस्तच झालेली आहे. त्याला अनुप्रास म्हणतात नं?
चला मेहनत कामी आली तर.. हो, अनुप्रासच. धन्यवाद. :)झकास! फर्मास!
तिसरे कडवे फारच छान!
धन्यवाद मंडळी :)
फार आवडली कविता.
खूप छान कविता. आवडली.
जनरली मी कविता वाचत नाही, पण ही वाचली आणि आवडली सुद्धा !
वा वा!!
वा! मस्तच.
सुंदर कविता!
नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती तुझे स्पर्शही भासणे ते अवेळीअप्रतिम!
कविता छान आहे !!!!
मस्त
मसत् कविता
_/\_
अप्रतिम!
@लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने
तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी >> अप्रतीम
@मिटे आसही या क्षणी ऐहिकाची
तुझे मंद घोटाळणे ते अवेळी >> सल्लामच..
================
या जब्बरदस्त रचनेबद्दल माझ्याकडून एक रंगावली
या रचनेलाच भेट


In reply to @लपे चंद्र मेघांमध्ये by अत्रुप्त आत्मा
मनःपूर्वक आभार गुरुजी _/\_
सर्व प्रतिसादकांचे खुप खुप धन्यवाद :)
केवळ अप्रतिम ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aashiqui Mein Teri... ;) :- 36 China Town
किती सुंदर! मस्त!
आता कसं छान वाटलं!!
कधी कधी ना कविता मुक्तपणे सुचत जाते, जसे मिसळलेला काव्यप्रेमी तसेच लिहितो. पण तुझी मागची कविता पूर्ण मुक्तछंदातही नव्हती. त्यामुळे कल्पना उत्तम होती तरी जरा "समथिंग मिसिंग" वाटत होती. आता काय तक्रार नाय भावड्या!
मस्तच. ये आगई विशालदा स्टाईल कविता :)
मिका कुठेय आणि चाणक्य्/गणेशा दिसेनात. शशक महापूरात हे फिरकेनात की काय मिपावर.
साशंक नाखु
स्वगतः विशाल्या जबरदस्त.(आहेस तरूण पण लिहितो धीरगंभीराशयी)
आवडली..
काय सुरेख..!!
सतत याच ओळी आठवायचा प्रयत्न करतोय कालपासनं...बहुतेक पाठही होतील एक दोन दिवसात.
धन्यवाद...!!
मस्त गझल आहे
वा!
अशी कौतुके ना कधीही अवेळी
नसे शब्द गोंजारणे ते अवेळी
कुणी कौतुके देत शाबासकीही
मनाचेच शेफ़ारणे ते अवेळी
मन:पूर्वक आभार मंडळी ! _/\_
सुरेख कविता .
वा वा जियो….
जल्ला आपल्याला कवितेतली कवडीची अक्कल नाही तरी वाचुन प्रचंड आवडले ह्यात काय ते समजा
तुमच्या कवितेतील शब्दरचना भावनांना सुरेख रूप देतात.
लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी
सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी__/\__
मनःपूर्वक आभार मंडळी !
आवडली रे गझल! :-)
स्वगतः मागे बरेच दिवस फिरकला नव्हतास ना मिपावर राघवा.. त्याचेच हे फळ.. बरेच वाचायचे राहून गेलेले दिसतेय.. :(
मस्त गझल/कविता! कवितेतलं काहीही कळत नाही पण ही कविता आवडली!
आहाहाहा...
स्मृतींचे मनी जागणे ते अवेळी..! :-)
छान आहे, गंमत म्हणजे मना