मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझे मजवरी भाळणे ते अवेळी

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
या आधीच्या कवितेच्या वेळी पैसाताईने तक्रार केली की विशालकडून अशा कवितेची सवय नाही. ;) त्यामुळे ही भुजंगप्रयात वृत्तातली गझल :) तुझे लाघवी बोलणे ते अवेळी तुझे विभ्रमी हासणे ते अवेळी जसे पावसाचे अकाली बरसणे तुझे आर्जवी वागणे ते अवेळी लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे मंद घोटाळणे ते अवेळी लगावली : लगागा लगागा लगागा लगागा वृत्त : भुजंगप्रयात

वाचने 10213 वाचनखूण प्रतिक्रिया 36

मांत्रिक गुरुवार, 08/27/2015 - 11:03
छान आहे, गंमत म्हणजे मना सज्जना भक्तिपंथेची जावे या चालीवर पण बसतेय! मनाचे श्लोक पण भुजंगप्रयात मध्येच आहेत का? सखे आप्त एकांत हा फक्त माझा तुझे मजवरी भाळणे ते अवेळी इथे "त"ची पुनरावृत्ती मस्तच झालेली आहे. त्याला अनुप्रास म्हणतात नं?

In reply to by मांत्रिक

विशाल कुलकर्णी गुरुवार, 08/27/2015 - 17:39
तुझे मजवरी भाळणे ते अवेळी इथे "त"ची पुनरावृत्ती मस्तच झालेली आहे. त्याला अनुप्रास म्हणतात नं? चला मेहनत कामी आली तर.. हो, अनुप्रासच. धन्यवाद. :)

सटक गुरुवार, 08/27/2015 - 21:05
सुंदर कविता!
नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी
अप्रतिम!

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/27/2015 - 23:08
@लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी >> अप्रतीम @मिटे आसही या क्षणी ऐहिकाची तुझे मंद घोटाळणे ते अवेळी >> सल्लामच.. ================ या जब्बरदस्त रचनेबद्दल माझ्याकडून एक रंगावली या रचनेलाच भेट https://lh3.googleusercontent.com/-YzXige8P5PQ/T6pNbHu39gI/AAAAAAAABRo/DLE6g4pBVbo/s640-Ic42/Photo-0132.jpg

पैसा Fri, 08/28/2015 - 10:43
किती सुंदर! मस्त! आता कसं छान वाटलं!! कधी कधी ना कविता मुक्तपणे सुचत जाते, जसे मिसळलेला काव्यप्रेमी तसेच लिहितो. पण तुझी मागची कविता पूर्ण मुक्तछंदातही नव्हती. त्यामुळे कल्पना उत्तम होती तरी जरा "समथिंग मिसिंग" वाटत होती. आता काय तक्रार नाय भावड्या!

नाखु Fri, 08/28/2015 - 10:57
मिका कुठेय आणि चाणक्य्/गणेशा दिसेनात. शशक महापूरात हे फिरकेनात की काय मिपावर. साशंक नाखु स्वगतः विशाल्या जबरदस्त.(आहेस तरूण पण लिहितो धीरगंभीराशयी)

असंका Fri, 08/28/2015 - 11:29
काय सुरेख..!! सतत याच ओळी आठवायचा प्रयत्न करतोय कालपासनं...बहुतेक पाठही होतील एक दोन दिवसात. धन्यवाद...!!

अशी कौतुके ना कधीही अवेळी नसे शब्द गोंजारणे ते अवेळी कुणी कौतुके देत शाबासकीही मनाचेच शेफ़ारणे ते अवेळी मन:पूर्वक आभार मंडळी ! _/\_

राघव गुरुवार, 01/21/2016 - 20:25
आवडली रे गझल! :-) स्वगतः मागे बरेच दिवस फिरकला नव्हतास ना मिपावर राघवा.. त्याचेच हे फळ.. बरेच वाचायचे राहून गेलेले दिसतेय.. :(