मित्र/मैत्रीणी-ठेवलेली गमतीशीर नावं/त्यांच्या नावाचं केलेलं खोबरं
लेखनप्रकार
"णमस्कार्स लोक्स," - टारुची कृपा..ह..च घे रे..:)
बर्याच दिवसापासुन एक करमणुक प्रधान विषय डोक्यात घोळत होता...आज त्याला एक कारण मिळालं ते म्हणजे आमच्या एका मित्राच लग्न झालं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
तर आजचा विषय आहे..मित्र/मैत्रीणी आणि त्यांना ठेवलेली गमतीशीर नावं किंवा त्यांच्या नावाचं केलेलं खोबरं..कारणं काहीही असोत जसे..
१. काही सवयी,
२. रहाण्याची / दिसण्याची / खाण्याच्या सवयी/स्टाईल म्हणुया...
३. बोलण्याच्या तर्हा...इ.इ....
हे सगळं एका खास शैलीतुन आलं पाहिजे....म्हणजे मित्राचं/मैत्रीणीचं नाव नसलं तरी चालेल पण गमतीशीर नावं किंवा त्यांच्या नावाचं केलेलं खोबरं आणि ते का आलं त्याचं २-३ वाक्यात कारण (मजेशीर शैलेतुनच अर्थात...टीका नको)...
तर करा सुरुवात...
मी माझ्यापासुन सुरुवात करतो...
लहानपनापासुन मला माझं कट्टा टोळकं "मुसा" म्हणत कारण माझ्या पहिल्या नावात मु आणि आडनावात सा आहे म्हणुन..
असाच एक मित्र ज्याला आम्ही "टोपड्या" म्हणत असु कारण हा कधीही पहा ह्याला एक वेगळ्या प्रकारची गोल टोपी घालायची सवय..यडं स्वतःच्या लग्नातसुद्धा टोपी घालायला निघालं होतं..
असाच एक "चोंग्या" ..त्याला चायनीज पोरी फार म्हणजे फारच आवडायच्या... ह्याला आम्ही "फवारा" पण म्हणायचो...गुटका खायची फार सवय याला...
असाच आमचा एक "नाना" ..त्याचं एकंदर व्यक्तिमत्व एकदम भारदस्त....
अजुन एक "लंगुर" ..ह्याला कुठेही बघा उडीमारायची सवय..गाडीवरुन/गाडीवर उडी मारुनच उतरणार/बसणार...
एक "मारामारी" होता...ह्याला चहा/कॉफी एकत्र करुन प्यायची सवय...
असाच एक "दत्तु" ...हा कायम एका साईडला निवांत बसलेला असायचा..काहीही गंध नसायचा कशाचाच...
असचं एक "गळू" ...ह्याला ज्या त्या मुलीला बघुन प्रेमाचं गळू व्हायचं....
असाच एक "कळकट" ...६-६ महिने कपडे धुवायचे नाहीत..एकदम फेकुन द्यायचे...
असाच एक "लेंगा" होता... ह्याला लेंगा फार आवडायचा...
असाच एक "तोता" ... नुसती बडबड..येड्यासारखी बडबड...ह्याला कधी कधी "कावरे" सुद्धा म्हणत असु
अजुन एक म्हणजे "चंबु".. ह्याला तोंडाचा चंबु करायची लहानपणापासुन सवय...
तर मंडळी तुम्हीही सांगा अशाच गमतीजमती...पण अट एकच...(जर तुमचे मित्र इथे असतील तर) त्यांना लागेल असं नको...टीका नको...मजेशीर/गंमत म्हणुनच चालेल....
तर मंडळी करा सुरुवात..सरत्या वर्षाच्या शेवटी भरपुर हसुया !!!!
वाचने
15640
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
'
भारी....
In reply to भारी.... by बिपिन कार्यकर्ते
.
In reply to भारी.... by बिपिन कार्यकर्ते
उच्च माणूस
आणखी एक
In reply to आणखी एक by नाटक्या
त्याला
माझा एक
आमचा पण एक - - - - -
आणखी काही.
काही नावे
पोत्यावरचं शहाळं
In reply to पोत्यावरचं शहाळं by ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहा
आणखी काही
In reply to आणखी काही by राघव
शिकवताना
In reply to शिकवताना by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाय हो..
In reply to शिकवताना by ३_१४ विक्षिप्त अदिती
असाच
In reply to आणखी काही by राघव
आमच्या
वाकडे
In reply to वाकडे by विनायक प्रभू
हे उत्तर तुम्हीच द्यायला हवे
माझ्या एका
गरिबान्ची
मस्त विषय
माझि हि एक
खावुन पीउन सुखी ग्रुप
ढ्ग्या
लै भारी इषय . .
आमच एक सर
वर्गात एक
शाळेतल्या आठवणी
आमचा मित्र
शाळेच्या आठवणी
आमचा एक
In reply to आमचा एक by दीपुर्झा
आणि तू ??
आमचाही हातभार!!
आमचाही हातभार!!
शाळा
कॉलेजचा एक
एक मुलगी
आमच्या
घ्या.
धागा
In reply to धागा by विसोबा खेचर
सी रामचंद्र
आमच्या
१३ क
In reply to १३ क by अनंत छंदी
थोड्क्यात..
In reply to थोड्क्यात.. by नाटक्या
१३-क
In reply to १३-क by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
माफ करा
आणखी काही
समीर