मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चोरी

पालीचा खंडोबा १ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
न्हाव्याच्या परसातल्या तुळशी वृन्दावनातील देव चोरल्याबद्दल तू मला कोंडून मारले होतेस मग दिवसभर तू डोळे पुसत राहिलीस मी तुला टाळत राहिलो मध्यरात्री जाग आली तेव्हा तुझा हात छातीवर होता अन् पश्चातापचे भाव ठेवून शांत चेह-याने तू निजलेली ! मग अशीच तू कधीतरी निजलीस न उठण्यासाठी ओल्या डोळ्यानी मी स्वत:ला कोंडून घेतले सा-या जगाला टाळत मध्यरात्री जाग आल्यावर दार तसेच बंद होते अन् छाती उघडी तुझा हात नसलेली आता मला पुन्हा चोरी करावीशी वाटत आहे...... हाय ! पण मीच आज कोंडलेला आहे ! विजयकुमार......... ११.०८.२००९, मुंबई

वाचने 3281 वाचनखूण प्रतिक्रिया 18

नाखु गुरुवार, 12/24/2015 - 12:25
का रडिवतो भक्तांना !!! खंडुराया काही चुकलं माकल असलं तर सांग तसं ! पण असा तरास दिऊ नगं.. प्र,मात्र नाखु

माहितगार गुरुवार, 12/24/2015 - 12:31
सुरेख
... अन् पश्चातापचे भाव ठेवून शांत चेह-याने तू निजलेली ! ...
हाच स्पीड ब्रेकर खरा स्पीड ब्रेकर असतो तो कोणत्याही कायदा आणि नितीमत्तेच्या डोसांपेक्षाही अधिक परिणामकारक नाही का ?

माहितगार गुरुवार, 12/24/2015 - 12:35
न्हाव्याच्या परसातल्या तुळशी वृन्दावनातील देव चोरल्याबद्दल
तुळशी वृन्दावनातील, देव चोरल्याबद्दल हे समजले इथे कविने न्हाव्याचीच प्रतिमा का वापरली आहे ?

In reply to by माहितगार

पालीचा खंडोबा १ गुरुवार, 12/24/2015 - 12:58
हि कविता ह्याच सत्य घटनेवर आधारित आहे अशी चोरी माझ्याकडून झाली होती तीही आमावस्येला सत्यनारायण पूजेच्या दिवशी बाकी कविता काव्यांतरीत आहे

किसन शिंदे Sat, 12/26/2015 - 20:02
लहानपणी मी ही एका घरातल्या तुळशी वृंदावनातले देव चोरले होते आणि त्यानंतर आईने वळ उठेपर्यंत चोपला होता. कविता पोचली भो आतपर्यंत... _/\_