चोरी
लेखनविषय:
न्हाव्याच्या परसातल्या
तुळशी वृन्दावनातील
देव चोरल्याबद्दल
तू मला कोंडून
मारले होतेस
मग दिवसभर
तू डोळे
पुसत राहिलीस
मी तुला
टाळत राहिलो
मध्यरात्री जाग आली तेव्हा
तुझा हात छातीवर
होता
अन्
पश्चातापचे भाव ठेवून
शांत चेह-याने तू
निजलेली !
मग अशीच तू कधीतरी
निजलीस न उठण्यासाठी
ओल्या डोळ्यानी
मी स्वत:ला कोंडून
घेतले
सा-या जगाला टाळत
मध्यरात्री जाग आल्यावर
दार तसेच बंद होते
अन् छाती उघडी
तुझा हात नसलेली
आता मला पुन्हा
चोरी करावीशी वाटत
आहे......
हाय ! पण मीच आज
कोंडलेला आहे !
विजयकुमार.........
११.०८.२००९, मुंबई
वाचने
3281
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
_/\_ विजय जी
वाह!!!!!!!!
मस्त!
जब्बरदस्त
मस्तच!!
जय मल्हार
सुरेख
न्हाव्याच्या परसातल्या
In reply to न्हाव्याच्या परसातल्या by माहितगार
हि कविता ह्याच सत्य घटनेवर
bhannat
छान
कविता आवडली ..
अफलातून!
In reply to अफलातून! by बोका-ए-आझम
फारच जिव्हारी लागणारी कविता!
खूप छान!
छान.
लहानपणी मी ही एका घरातल्या
सुरेख.