कविता
लेखनविषय:
काव्यरस
तू म्हणतेस कवितेतल, तुला काही कळत नाही
पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही
हलकी हसतेस नजरेतून, अदा जीव घेवून जाते
मतल्यासह एक सुंदर, गझल सहज होवून जाते
ही बेहोशी सखे, कुठल्या मैफीलीत मिळत नाही,
अन म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही..
मुक्तछंदात बोलताना, गुंफून घेतेस सहज आर्या ,
तुझ्या मात्रा मोजताना, गाते अभंग माझी चर्या,
काय लघु, काय गुरु, हिशोब काही जुळत नाही,
पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही..
कविता म्हणजे काय ग, शहाण्यासारख वागायचं,
थोडं जगात सांगायचं , अन बराच मनात भोगायचं,
आपली कविताही कधी, आपल्यालाच कळत नाही,
पण म्हणून काही आपल, कविता होण टळत नाही..
- शैलेंद्र
वाचने
5761
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
सुरेख. खूप दिवसांनी आलास रे.
In reply to सुरेख. खूप दिवसांनी आलास रे. by प्रचेतस
धन्यवाद,
छान!
बर्याच दिवसांनी दिसलास
In reply to बर्याच दिवसांनी दिसलास by किसन शिंदे
वाचनमात्र होतो, आभार
अहाहा.
सुरेख कविता.
क्या बात शेलेन्द्र भाई
मस्त मस्त मस्त
सुंदर कविता !
धन्यवाद, डेडपूल, एकटा, स्पा,
आपली कविताही कधी, आपल्यालाच
सुरेख.
सुंदर !
क्या बात !
वा!
जबरदस्त
अतिशय सुंदर कविता!
सुरेख ...
एकदम ग्रेट.
खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे
सुरेख...
In reply to सुरेख... by विशाल कुलकर्णी
धन्यवाद विशाल
अर्रर्र कवितेवर दाद द्यायची राहीली.
तुम्ही दाद दिलीय असं समजूनच
In reply to तुम्ही दाद दिलीय असं समजूनच by शैलेन्द्र
तुम्ही दाद दिलीय असं समजूनच
सुंदर कविता
सुंदर कविता
मस्त कविता कविराज ...