विटाळ
लेखनविषय:
काचेच्या काळ्या, आरसा
नसलेल्या तावदानी
फक्त तुझाच चेहरा दिसतो
जन्मजात जार तू
जारिणीचा संग करतो !
देऊनी माझ्या कळीला
फुलाची भूल, काय साधलेस
सांगताना जरा शहारते
कौमार्याच्या गळी माळलास
कामाग्निचा अंगार !
कौमार्याच्या अनवट क्षणी
तू शिलगवलास
वासनेचा कोळसा
माळती माझ्या कुंताली
कौमार्ययोग्या आरसा !
कातरवेळी, कुवारवेळेस
मी मागते कुकवाचा
जोगवा
गारठधूक्यात दडल्या
चंद्रास माझा
विटाळ देईल सांगावा !
तुझ्या परतवाटेस
मी फासला शेंदुर
गोठणबिंदू गाठणा-या
बेवारशी रात्रीस
शरीरी पेटे अंगार !
कोवळ्या आर्द्र बोटानी
मी चाळवते निखारे
उरलेत माझ्या
भोगल्या शरीरी
रासवटलेले तुझे शहारे !
विजयकुमार..................
23 / 11 / 2008
वाचने
2407
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
असाच अपमान हो णार असेल तर ह्या पुढे मि कविता पोस्ट करनार ना हि
In reply to असाच अपमान हो णार असेल तर by पालीचा खंडोबा १
कविता पोस्ट करायची सक्ती केली आहे का कोणी?
जब्बर्दस्त.
:)
तुम्ही जर का कधी मराठी शब्द शिकविण्य साठी क्लास्सेस वगेरे सुरु केले तर पहिले नाव नोंदणी माझी कराल का प्लीज :)
In reply to खूपच जबर्दस्त .. by निनाव
×१
खंडोबा, टाकरे अजून कविता, हम है!
अश्लील , मसालेदार शब्द वापरून लिहिलेल्या अर्थहीन कविता . सं . मं. ने लक्ष घालावे. ह्या आईडीच्या सगळ्या कविता अश्याच प्रकारच्या आहेत . का रं बाबा ५ बायका कमी पडल्या का तुला ?
कविता अत्यंत दर्जेदार आहे
एक ही शब्द अनावश्यक नाही
अश्लील तर अजिबातच नाही
तुडतुडी यांचा प्रश्न अत्यंत अश्लील आहे
तुडतुडी यांचा अश्लील प्रश्न सं.मं. ने तपासावा
भरचौकात अनो़ळखी पुरुषाला असा प्रश्न विचारणे हे किमान आपल्या संस्कृतीत तरी शोभत नाही.
याने त्या पुरुषाला संकोच वाटतो लज्जा निर्माण होते
त्याचा एक प्रकार विनयभंग होतो.
मित्रा ह्या कवितेत कोणता अश्लील शब्द आहे ते मला कळेल का ? का आपले उगाच काहीही आरोप करणे हे आपले काम आहे ? आपणास मराठी शब्द कळतात का ? कोणता शब्द अश्लील शब्द ह्यात आहे हे दाखवा
सुंदर कविता,
आवडली
अत्यंत सुंदर कविता!
असाच अपमान हो णार असेल तर