मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विटाळ

पालीचा खंडोबा १ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काचेच्या काळ्या, आरसा नसलेल्या तावदानी फक्त तुझाच चेहरा दिसतो जन्मजात जार तू जारिणीचा संग करतो ! देऊनी माझ्या कळीला फुलाची भूल, काय साधलेस सांगताना जरा शहारते कौमार्याच्या गळी माळलास कामाग्निचा अंगार ! कौमार्याच्या अनवट क्षणी तू शिलगवलास वासनेचा कोळसा माळती माझ्या कुंताली कौमार्ययोग्या आरसा ! कातरवेळी, कुवारवेळेस मी मागते कुकवाचा जोगवा गारठधूक्यात दडल्या चंद्रास माझा विटाळ देईल सांगावा ! तुझ्या परतवाटेस मी फासला शेंदुर गोठणबिंदू गाठणा-या बेवारशी रात्रीस शरीरी पेटे अंगार ! कोवळ्या आर्द्र बोटानी मी चाळवते निखारे उरलेत माझ्या भोगल्या शरीरी रासवटलेले तुझे शहारे ! विजयकुमार.................. 23 / 11 / 2008

वाचन 2405 प्रतिक्रिया 0