घोस्टहंटर-१
"व्हू आर यू?"
"युवर डेथ!"
तो खाली कोसळला!
"मनिष उठ!"
एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती.
ग्रेग मॉरिसन मर्डर केस!
सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत.
"झोपू दे मला!"
"अरे मूर्ख उठ!"
"मी केस सॉल्व करतोय."
एलिझाबेथ आता पूर्णपणे कंटाळली होती. कारण ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर राहणार होते. कीम्बहुना ग्रेगच्या मृत्युचे कारण तिथेच कळू शकत होते.
"मर तिकडेच!" एलिझाबेथ चिडली आणि रूमच्या बाहेर पडली.
ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर होते.ग्रेग यातील बऱ्याच जणांचा गुरु होता. सर्वप्रथम ब्रायन ओला ग्रेगला श्रध्दांजली वाहण्यासाठी उभा राहिला.
"ग्रेग माझा गुरु होता. पण याहून जास्त तो माझा मित्र होता. जगात यापेक्षा मोठा घोस्टहंटर होणार नाही, कीम्बहुना यापेक्षा चांगला माणूस होणार नाही!"
आळीपाळीने सर्वानी ग्रेगला श्रध्दांजली वाहिली. एलिझाबेथ अजूनही मनिषची वाट बघत होती.
थोड्यावेळाने एक कार तिथे येऊन थांबली.
मनिष कारमधून उतरला!
"सॉरी मला उशीर झाला. तुम्ही ग्रेगला पुरले?"
"अजून नाही." ब्रायन उत्तरला.
"ओके अजून इतकाही उशीर झाला नाही."
मनिष धावतच शवपेटीजवळ गेला.त्याने खिशातुन एक बाटली काढली, आणि ग्रेगच्या तोंडावर ओतली.
क्षणार्धात ग्रेग उठून बसला!
"वेलकम बॅक ग्रेग." मनिष म्हणाला.
"फ्रॉम डेथ!"ग्रेग हसत म्हणाला.
क्रमशः
वाचने
10426
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
इंटरेस्टिंग!
In reply to इंटरेस्टिंग! by एस
धँस!
हे घोस्ट हंटर म्हणजे काय
In reply to हे घोस्ट हंटर म्हणजे काय by अभ्या..
आपल्याकडे
धत्त ते रे की
In reply to धत्त ते रे की by नाखु
पुढचा भाग
In reply to धत्त ते रे की by नाखु
डांगे साय्बांचा प्रतीसाद
सुरुवात मस्तच झाली आहे .
In reply to सुरुवात मस्तच झाली आहे . by अद्द्या
अभी तो एंड बाकी है!
:)
चालू द्या
पुभाप्र
In reply to पुभाप्र by अजया
+१
पुभाप्र ..
पुभाप्र ..
धन्यवाद मंडळी!