दरवर्षी नागपुर मध्ये वर्षभर काम करुन थकलेल्या आमदारांची हिवाळी अधिवेशन नामक सुट्टी सुरु झाली की 'स्वतंत्र विदर्भाची' मागणी जोर धरते, तशी यावर्षीही ती 'नागपुरी संत्री' खाण्यासाठी सुरु झाली. यंदा मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने या मागणीला जरा भलताच जोर आलेला दिसतो, खुद्द मुख्यमंत्र्याची भूमिका स्वतंत्र विदर्भाची असली तरी यावेळी त्यांनी चकार शब्द काढला नाही. पण त्यांच्या पाठिंब्याने महाधिवक्ता झाले श्रीहरी अणे यांंच्या तोंडून ते बोललेच, आणि लोकसत्तेने ही अग्रलेखातून त्याचीच री ओढत स्वतंत्र विदर्भाचे गाणे गायले आहे. विदर्भाच्या बाबतीत कायम अनुशेषाचे रडगाणे गाईले जाते पण इतके वर्ष अनुदान देवून सुद्धा अनुशेष भरून निघत नसेल तर हां विदर्भातल्या पुढाऱ्यांचा सपशेल पराभव आहे. आणि अनुदानातून मिळालेल्या पैश्यातून नेमकी कोणाची घरे भरली याचा नेमका शोध घेणे गरजेचे ठरेल. आता प्रश्न येतो मुळात स्वतंत्र विदर्भाची गरज काय आणि कोणाला, तसे पाहता विदर्भ वेगळा झाला तर इथल्या नागरिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडेल असे दिसत नाही. सध्या संयुक्त महाराष्ट्रातात पूर्ण खाता येत नसल्याने वेगळा विदर्भ पाहिजे एकदा का वेगळा विदर्भ भेटला की सगळी पॅकेज अनुदान या बोक्यांच्या घशात जायला मोकळी अशी शंका घेण्यास वाव आहे. विकासाच्या नावाखाली स्वतंत्र विदर्भाची मागणी कारणाऱ्यानी आतापर्यंत विदर्भाचा विकास का झाला नाही, ते स्वतः कुठे कमी पडले याचे आत्म परीक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे. नाहीतर पुढचं अधिवेशन आहेच आंदोलन करायला.
वाचने
35419
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
महाराष्ट्राचा आर्थिक कणा
+१११११
In reply to महाराष्ट्राचा आर्थिक कणा by मार्मिक गोडसे
नक्की उत्पादन देणारे
In reply to महाराष्ट्राचा आर्थिक कणा by मार्मिक गोडसे
यावर
In reply to नक्की उत्पादन देणारे by कपिलमुनी
- सर्वप्रथम उसाच्या उत्पादनाला खूप पाणी लागते. दुष्काळी प्रदेशात पाणी कमी असताना ते पाणी या उत्पादनावर वळवले जाते.
- काहीही झाले तरी जीवनावश्यक असल्याने भारतात व बाहेर साखरेच्या किमती फारशा वाढत नाहीत. त्यामुळे उस उत्पादन क्षेत्राला जगवायला राज्य सरकारला भयंकर अनुदान द्यावे लागते.
- वर्षानुवर्षे अनेक साखर कारखाने केवळ सरकारी वरदहस्तामुळे जगू शकले. त्यांची कर्जे किती वेळा माफ झाली याची गणतीच नाही. शेवटी राज्य सरकारचीच आर्थिक अवस्था अवघड झाल्यावर कारखाने सरकारी मदतीवर कृत्रिमरित्या जगवण्याचे प्रमाण कमी झाले.
साखरसम्राट ही उपहासात्मक उपाधी याच पार्श्वभूमीमुळे निर्माण झाली. मिपावरचे या क्षेत्रातले जाणकार याबाबत अधिक नेमकेपणाने लिहू शकतील.सहमत,
In reply to यावर by श्रीरंग_जोशी
ते तर आहेच
In reply to सहमत, by संदीप डांगे
सहकारी साखर
In reply to ते तर आहेच by श्रीरंग_जोशी
उसाचे भाव, त्याला लागणारे
In reply to सहकारी साखर by मार्मिक गोडसे
उसाचे भाव, त्याला लागणारे
In reply to सहकारी साखर by मार्मिक गोडसे
पैसे
In reply to यावर by श्रीरंग_जोशी
एक प्रश्न… तज्ञांनी प्रकाश
तीन लाख कोटीचे कर्ज आहे
In reply to एक प्रश्न… तज्ञांनी प्रकाश by चिनार
असहमत
In reply to तीन लाख कोटीचे कर्ज आहे by सुबोध खरे
जर तर ला अर्थ आहे का?
In reply to असहमत by श्रीरंग_जोशी
जेवढा उचलावा लागेल तेवढा
In reply to जर तर ला अर्थ आहे का? by सुबोध खरे
जितका खर्च झाला असेल तितकाच..
In reply to जर तर ला अर्थ आहे का? by सुबोध खरे
या मत मतांतराच्या
स्वतंत्र विदर्भाला पाठींबा
बाकी जगात चालतात ती आंदोलनं
निषेधास अनुमोदन...
In reply to बाकी जगात चालतात ती आंदोलनं by चिनार
निषेधास अनुमोदन...
In reply to बाकी जगात चालतात ती आंदोलनं by चिनार
वर्षानुवर्षे तेच ते मुद्दे
साहेब
In reply to वर्षानुवर्षे तेच ते मुद्दे by ए ए वाघमारे
भाऊ
In reply to साहेब by सुबोध खरे
अगदी हाकलूनच द्यायला पाहीजे
In reply to वर्षानुवर्षे तेच ते मुद्दे by ए ए वाघमारे
दिलाय न विदर्भाचा मुख्यमंत्री